योगासने शारीरीक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात हे अनेकांना माहीत आहे. म्हणूच जगभरात आज लाखो लोक नियमित योगासनांचा सराव करताना आढळतात. पण योगासने फक्त प्रौढ व्यक्तींसाठी असतात अशी एक सामान्य समजूत आहे. लहान मुलांसाठी योगासने शिकणे कितपत योग्य आहे आणि त्यांना कोणत्या वयापासून योगासने शिकवण्यास सुरूवात करावी याची प्रत्येक पालकाला उत्सूकता असते. यासाठीच ही माहिती तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल
लहान वयात योगासन शिकणे योग्य आहे का
योगासनांचा सराव हा नेहमी लहान वयात करायला हवा. कारण तुम्ही जितके वयाने लहान असाल तितकं तुमचं शरीर अधिक लवचिक असतं. अशा वयात योगासनांची आदर्श स्थिती गाठणं सहज शक्य होतं. शिवाय लहानपणापासून योगासनांचा सराव केल्यास मोठे पणी शरीरातील लवचिकता कायम टिकून राहते. शिवाय प्रोढ वयात येणाऱ्या शारीरिक आणि मानसिक समस्यांना हाताळणे अधिक सोपे जाते. यासाठी लहान मुलांनी वयाच्या आठव्या वर्षापासून योगासनांचा सराव करण्यात काहीच हरकत नाही. मात्र त्यापेक्षा लहान मुलांना योगासने शक्यतो शिकवू नयेत. कारण त्याआधी मुलांचा मानसिक आणि शारीरिक विकास होत असतो. अशा वेळी कोवळ्या हाडांवर ताण येऊन त्यांना दुखापत होऊ शकते. यासाठी आठ वयापेक्षा लहान मुलांना कठीण आसनांचा सराव करण्याचा सल्ला दिला जात नाही. आठ वर्षापासून मुलांना योगासने शिकवावी पण कठीण आसने मात्र त्यांना बारा वर्षांनंतरच करण्यास द्यावी. यासाठी नेहमी तज्ञ्जांच्या देखरेखीखाली मुलांना योगासने शिकवावी.
लहान मुलांना कोणती आसने शिकवावी
आठ वर्षांनंतर मुलांना तुम्ही सूर्य नमस्कार, प्राणायम शिकवू शकता. कारण या वयात मुलांना तज्ञ्जांच्या सूचना समजणं आणि त्यानुसार आसन करणं शक्य असतं. आठव्या वर्षी मुलांच्या फुफ्फुसांचा योग्य विकास झालेला असतो, त्यांची प्रतिकार शक्ती वाढलेली असते, शरीरातील अनेक ग्रंथी विकसित होत असतात, स्मरणशक्ती वाढत असते त्यामुळे प्राथमिक योगासने आणि प्राणायम शिकण्यास मुलांचे हे वय योग्य ठरते.
लहान मुलांना योगासनांचा काय होतो फायदा
मोठ्या माणसांना जीवनात अनेक चिंता काळजीला सामोरे जावे लागते. त्यामुळे त्यांना योगासनांची गरज आहे असं आपल्याला वाटतं, मात्र लहान मुलंदेखील त्यांच्या वयानुसार चिंता काळजीत असू शकतात. आजकालच्या मुलांना अभ्सास, स्पर्धेचं सतत टेन्शन असतं. मागील दोन वर्षात कोरोनामुळे ऑनलाईन स्कुलमुळे मुलांच्या लठ्ठपणामध्ये वाढ झालेली आहे. मुलं खूप चिडचिडी आणि हट्टी झालेली आहेत. अशा काळात मन आनंदी आणि शरीर स्वस्थ असेल तर सर्व प्रकारच्या स्पर्धा आणि प्रशिक्षणासाठी ती तयार राहू शकतात. शाळा, कॉलेज, पिअर प्रेशर आणि पालकांची भीती या दृष्टचक्रामध्ये त्यांना योगासनांमुळे स्वतःचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य जपण्यास मदत होते. योगासनांमुळे मुलांची वाढ चांगली होते आणि ती सतत प्रसन्न राहतात. यासाठी योग्य वयातच मुलांना योगासने, प्राणायम, मेडिटेशनचा सराव करण्यास पालकांनी प्रवृत्त करायला हवं.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक