ADVERTISEMENT
home / आरोग्य
what-is-vaginal-gas-and-how-can-you-prevent-vaginal-gas-in-marathi

पोटातच नाही तर व्हजायनामध्येही तयार होतो गॅस, काय आहेत कारणे

तुम्हाला कधी सेक्स करताना (Sex Activity) अथवा व्यायाम करताना अचानक व्हजायना (Vagina) मधून थोडासा गॅस निघून जाताना जाणवलं आहे का? जरी जाणवलं नसलं तरीही असं होतं. महिलांच्या योनीमार्गात व्हजायनल गॅस (Vaginal Gas) होणे ही अत्यंत सामाईक समस्या आहे. तुम्हालाही याबाबत जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही हे नक्की वाचायला हवे. व्हजायनल गॅसची नक्की काय कारणे आहेत आणि यापासून कशी सुटका मिळवावी याबाबत प्रत्येक महिलेला माहीत असायला हवे. व्हजायनल गॅस म्हणजे त्याला क्वीफ असेही म्हटले जाते. कधी कधी हे असं होणं महिलांसाठी लाज वाटण्यासारखंही ठरू शकतं. पण एक लक्षात घ्या हे अत्यंत सामाईक आणि नॉर्मल आहे. सर्वच महिलांसह हे असं होतं. हे बाकी काहीच नाही, याचा अर्थ शरीरात फसलेली हवा ही शरीराच्या आतून नाही तर बाहेरून येते. या हवेमध्ये कोणत्याही प्रकारचा दुर्गंध नसतो. ही समस्या बरेचदा सेक्स करताना अधिक प्रमाणात जाणवते. पण एक लक्षात ठेवा, यामुळे कोणत्याही प्रकारचा यौनसंबंधित आजार होत नाही. त्यामुळे घाबरून जाण्याची अजिबातच गरज नाही. पण याबाबत महिलांना माहीत असायला हवे. याबाबत आम्हाला इन्स्टाग्रामवरील be.bodywise या पेजवरून मिळाली. त्यामुळे तुम्हालाही याबाबत जागरूकता करून देणे गरजेचे आहे असे आम्हाला वाटते. 

व्हजायनल गॅस म्हणजे नक्की काय? (What is Vaginal Gas)

व्हजायनल गॅस तेव्हा होतो, जेव्हा शरीरात हवा अडकते आणि मग हळूहळू व्हजायनामार्फत ही बाहेर येते. तेव्हा ही हवा अचानक बाहेर येते. व्हजायना गॅस तेव्हा कळतं कारण याचा बरेचदा आवाजही होतो. पादल्याप्रमाणेच व्हजायनल गॅसचाही आवाज होतो. ही हवा योनीमार्गातून बाहेर येते आणि त्यावेळी योनीचे कंपनही होते. 

व्हजायनल गॅसची कारणे नक्की काय आहेत? (Reason of Vaginal Gas)

कधी कधी व्हजायनमध्ये सेक्स करताना अथवा काही गोष्टी करताना हवा प्रवेश करते आणि तिथेच अडकून राहते. याची काही नैसर्गिक कारणे आहेत ती जाणून घ्या – 

पेल्विक फ्लोरची परिस्थिती 

व्हजायना गॅस पेल्विक फ्लोर डिसफंक्शनची मुख्य लक्षण नाही. पण एका अभ्यासात सांगितल्याप्रमाणे, व्हजायनल गॅसचा सामान्य फ्लॅट्सप्रमाणे परिणाम असू शकतो. 

ADVERTISEMENT

सेक्सदरम्यान (During Sex)

योनीबाबत माहिती सर्वांनाच असायला हवी. तर मुख्यत्वे सेक्स करताना योनी गॅस होणे हे सामान्य आहे. योनीच्या आत आणि बाहेर पुरूषाचे लिंग जाताना जी गती असते, त्यादरम्यान कधी कधी हवा आत जाते आणि अडकते. त्यावेळी महिलांचे मसल्स हे ऑरगॅजममुळे तणावात असतात, त्यामुळे गॅस निघून जातो आणि योनीमार्गात बुडबुडे निर्माण झाल्याचा भास होतो. अशावेळी आवाजही येतो. यामध्ये लाजण्यासारखे काहीही नाही. हे अत्यंत नैसर्गिक आहे. 

हायजीन प्रॉडक्ट्स (Hygiene Products)

मासिक पाळी दरम्यान योनीमार्गात टॅम्पॉन आणि मेन्स्ट्रूअल कपसारख्या उत्पादनांचा वापर करण्यात येतो. हे घालताना हवा यामध्ये अडकते आणि जेव्हा हे बाहेर काढण्यात येते, तेव्हा स्ट्रेचिंग दरम्यान व्हजायनल गॅस बाहेर निघतो. 

तणावपूर्ण मसल्स (Stressed Muscles)

काही काम करताना अर्थात सेक्स करताना असो अथवा स्त्रीरोगतज्ज्ञांकडून योनीची तपासणी असो यावेळी पेल्विक मसल्सवर ताण येतो. यावेळी योनीमार्गात हवा जाऊन फसण्याची शक्यता असते. खोकताना आणि व्यायाम करतानाही मसल्स तणावग्रस्त होतात. हवा खाली आणि योनीमार्गाच्या बाहेर यावेळी जाण्यास मदत मिळते आणि हा गॅस बाहेर येतो. 

व्हजायनल गॅसपासून अशी मिळवा सुटका (How to Get Rid Of Vaginal Gas)

vaginal hygiene tips every woman should know in Marathi

अनेकदा व्हजायनल गॅस थांबविण्याचा कोणताही उपाय नसतो. तसंच त्याची काही आवश्यकतादेखील नाही. कारण यामुळे काही त्रास होत नाही. सामान्यतः व्हजायनल गॅसचे एकच लक्षण आहे की गॅस बाहेर येताना आवाज येतो. अन्यथा यामुळे कोणताही त्रास नाही. त्यामुळे यापासून सुटका करून घेण्यासाठी कोणत्याही वेगळ्या उपायांची गरज नाही. 

ADVERTISEMENT

लक्षात ठेवाः यामध्ये कोणताही त्रास करून घ्यायची अथवा चिंता करण्याची गरज नाही. हे कधीतरीच होतं, पण हे सतत होत असेल तर मात्र तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी वेळेवर संपर्क साधावा.  

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

07 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT