मासिक पाळी, संभोग आणि गरोदरपणा या सगळ्यात महिलांना आपल्या प्रायव्हेट पार्ट अर्थात योनीमार्गाला खूप काही सहन करावे लागते. योनीविषयी माहिती आपल्या सगळ्यांना बऱ्यापैकी असते. योनीसंबंधित प्रत्येक महिलेला महत्त्वाच्या बाबी या माहीत असायलाच हव्यात. योनीला आराम मिळावा यासाठी अगदी परंपरागत एक प्रथा चालत आली आहे आणि ती म्हणजे व्हजायनल स्टिमिंग (Vaginal Steaming). यामुळे महिलांना योनीला आराम मिळतो. व्हजायनल स्टिमिंग म्हणजे योनीला वाफ देणे. यामुळे महिला प्रजनन प्रणाली आणि पेल्विक फ्लोर योग्य करण्यासाठी एक सौम्य आणि नैसर्गिक उपाय आहे. या पूर्वपरंपरागत चालत आलेल्या व्हजायनल स्टिमिंगमध्ये स्री रोगासंंबधित अनेक समस्या दूर करण्याची ताकद आहे. तसंच प्रसूतीनंतरही महिलांना त्रासातून मुक्तता मिळवून देण्यास याची मदत होते. काय आहेत याचे फायदे पाहूयात.
काय आहेत व्हजायनल स्टिमिंगचे फायदे
असे म्हटले जाते की, योनीला वाफ दिल्याने योनीची अधिक चांगली स्वच्छता राखली जाते. त्याशिवाय याचे अनेक फायदे आहेत –
- गर्भातून विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी आणि रक्त अथवा डिस्चार्ज स्वच्छ करण्यासाठी
- PH संतुलन प्रबंधित करण्यासाठी
- संक्रमणाचा उपाय करण्यासाठी
- योनीचा कोरडेपणा
- त्वचेचे हिलिंग होण्यासाठी
- हार्मोनल संतुलन होण्यासाठी, हार्मोनल सिस्टिम नियंत्रित करते
- प्रजनन क्षमता वाढवते
- मासिक पाळी नियमित करण्यासाठीही उपयोगी
घरी व्हजायनल स्टिमिंग घेण्याची पद्धत
व्हजायनल स्टिमिंगमध्ये पाण्याच्या एका स्टिमिंग पॉटवर तुम्हाला बसण्याची गरज आहे. यामध्ये तुळस, मेहंदी, वर्मवूड, मगवॉर्टसारख्या हर्बल वनस्पतींचा समावेश असतो. ज्या व्यक्ती व्हजायनल स्टिमिंगचा अभ्यास करतात त्यांच्या म्हणण्यानुसार, वनस्पती या योनीच्या उतकांमध्ये प्रवेश करून अनेक लाभ करून देतात. याची पद्धत म्हणजे –
- टबच्या दोन्ही बाजूला पाय फाकवून स्क्वॅट पोझिशनमध्ये तुम्ही उभे राहा
- कंबर आणि पाय झाकले जातील असा टॉवेल लपेटून घ्या. जेणेकरून वाफ सरळ योनीपर्यंत पोहचेल
- साधारण 20 – 60 मिनिट्स तुम्हाला वाफ घ्यायची आहे. पाणी थंड होईपर्यंत तुम्ही वाफ घेऊ शकता
- अनेक स्पा मध्येदेखील हे उपलब्ध आहे. पण अति गरम पाण्याची वाफ घेऊ नका हे लक्षात ठेवा
याचा खरंच उपयोग होतो का?
हे सांगण्यासाठी कोणतेही वैज्ञानिक प्रमाण अस्तित्वात नाही की, योनीला वाफ दिल्याने काही फरक पडतो. पण डॉ. जेन गुंटर यांच्या एका संकेतस्थळानुसार, वनस्पतीच्या वाफेच्या सहाय्याने योनीच्या शेवटी असणाऱ्या बंद गर्भाशय नाळेच्या माध्यमातून तुम्हाला गर्भाशयापर्यंत पोहचायचे असते. पारंपरिक चिनी अभ्यासानुसार याचा उपयोग करण्यात येत होता. तसंच प्रजनन प्रणालीशी संंबंधित समस्यांवर याचा चांगला उपयोग होतो असंही सांगण्यात येते.
काय आहेत दुष्परिणाम
योनी खूपच नाजूक आणि संवेदनशील असते. जास्त गरम पाण्यामुळे योनीमार्गाला त्रासही होऊ शकतो. त्यामुळे गरम पाण्याचा वापर करू नका. योनीमध्ये अधिक वाफ घेतली गेली तर यीस्ट इन्फेक्शन अथवा व्हजायनल इन्फेक्शन होणारे बॅक्टेरिया होतात. गरोदर महिलांनी मात्र अजिबात व्हजायनल स्टिमिंग घेऊ नका. यामुळे बाळाला त्रास होण्याची शक्यता असते. व्हजायनल स्टिमिंगसाठी कोणतीही मार्गदर्शन पत्रिका नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या जोखमीवर हे करू शकता.
तुम्ही व्हजायनल स्टिमिंगच्या आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि व्यवस्थित काळजी घेऊन नंतरच वाफ घ्या.