दीपिका पादुकोण आणि प्रभास एका आगामी प्रोजेक्टच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. हैदराबादमध्ये शूटिंग सुरू असताना मंगळवारी दीपिकाची तब्येत बिघडली. तिच्या ह्रदयाचे ठोके अचानक वाढल्याने तिला त्वरित हॉस्पिटलमध्ये दाखल करावा लागलं. चेकअप आणि औषधोपचार झाल्यावर दीपिकाला घरी सोडण्यात आलं. दीपिकाला असा अचानक त्रास झाल्याने सेटवर सगळेच चिंतेत पडले. सगळ्यांनी देवाकडे दीपिकाची तब्येत सुधारण्यासाठी प्रार्थना सुरू केली. या प्रोजेक्टमध्ये दीपिका, प्रभास आणि अमिताभ बच्चन एकत्र काम करत आहेत. जेव्हा दीपिकाच्या तब्येतीबद्दल प्रभासला कळलं तेव्हा तोही चिंतेत पडला. मात्र त्याने लगेच असा एक निर्णय घेतला ज्यामुळे सगळीकडून त्याचं कौतुक होत आहे.
प्रभासने नेमका कोणता निर्णय घेतला
दीपिका आणि प्रभास दोघांमध्ये सेटवर एक महत्त्वाचा सीन शूट केला जाणार होता. मात्र दीपिकाची तब्येत बिघडल्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये जावं लागलं. त्यानंतर हॉस्पिटलमधून तिला घरी सोडण्यात आलं. मात्र प्रभासने तो सीन दीपिका पूर्ण बरी होईपर्यंत शूट करण्यास मनाई केली आहे. ती जेव्हा नीट बरी होईल तेव्हाच पुढचं शूटिंग करण्यात यावं अशी मागणी प्रभासने निर्मात्यांकडे केली. प्रभासने दीपिकाच्या काळजी पोटी स्वतःच्या शूटिंगच्या शेड्यूलमध्ये बदल केले. प्रभास साऊथचा एक लोपप्रिय स्टार आहे. त्याच्या शूटिंगसाठी डेट मिळणं सहज सोपी गोष्ट नक्कीच नाही. मात्र आपल्या सहकलाकारासाठी त्याने त्याच्या डेट्स अडजस्ट केल्या आहेत. प्रभासचं हे वागणं दीपिका आणि रणबीरसाठी नक्कीच कौतुकास्पद आहे.
कशी आहे आता दीपिकाची तब्येत
दीपिकाची तब्येत आता सुधारली आहे. मात्र तिला नेमकं काय झालं होतं हे समजू शकलं नाही. दीपिका आणि प्रभास पहिल्यांदाच एकत्र काम करत आहे. दीपिका आणि प्रभासला एकत्र पाहण्यासाठी चाहतेदेखील उत्सुक आहेत. त्यामुळे लवकरच दीपिकाची तब्येत सुधारावी आणि तिच्या शूटिंगला सुरुवात व्हावी अशी आशा व्यक्त केली जात आहे. या चित्रपटा व्यतिरिक्त दीपिका पठाण आणि फायटर या दोन चित्रपटात काम करत आहे. पठाणमध्ये तिच्यासोबत शाहरूख खान आणि जॉन अब्राहम आहे तर फायटरमध्ये ती ह्रतिक रोशनसोबत काम करत आहे.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक