ADVERTISEMENT
home / Diet
What to Eat Before and after Running

धावण्याआधी आणि नंतर काय खावं अथवा खाऊ नये

व्यायामामुळे शरीर फिट आणि निरोगी राहते. Vyayamache Mahatva | व्यायामाचे जीवनातील महत्त्व आणि फायदे यासाठी प्रत्येकाला माहीत असायला हवं. जर तुम्हाला दररोज वर्कआऊटसाठी फार वेळ काढता येत नसेल, तर कमीत कमी सकाळी अथवा संध्याकाळी चालणे, धावणे हे व्यायाम प्रकार जरूर करावे. सकाळी चालण्याचे अप्रतिम फायदे (Morning Walk Benefits In Marathi) अनेक आहेत. धावण्याची क्षमता ही सरावाने वाढत जाते. मात्र त्यासोबतच तुमचा आहारदेखील योग्य आणि संतुलित असायला हवा. कारण धावण्याचा व्यायाम करताना चुकीच्या वेळी आणि चुकीचे पदार्थ खाण्यामुळे दुष्परिणाम होऊ शकतात. यासाठी जाणून  घ्या ही माहिती यासोबतच जाणून घ्या आरोग्यदायी टिप्स मराठी | Health Tips In Marathi

धावण्याआधी खाद्यपदार्थ सेवन करणे योग्य आहे का

धावणे हा एक प्रकारचा व्यायाम आहे. यासाठीच व्यायामाआधी कमीत कमी दोन तास काही न खाण्याचा सल्ला दिला जातो. यासाठी सकाळी पहाटे उठून व्यायाम करणं नेहमीच फायद्याचं ठरतं. पण नेहमीच पहाटे धावण्यासाठी वेळ काढणं शक्य होईल असं नाही. तुम्ही संध्याकाळीदेखील धावण्याचा सराव करू शकता. मात्र अशा वेळी धावण्यासाठी तुमच्या शरीरात पुरेशी ऊर्जा असणं तितकंच गरजेचं आहे. म्हणून तुम्ही धावण्याआधी तीन ते चार तास आधी प्रोटीन, लो फॅट, सोडीयम, अॅंटि ऑक्सिडंट, प्रोबायोटिक्स असलेले पदार्थ खाऊ शकता. ज्यामुळे धावताना तुमचा स्टॅमिना नक्कीच वाढेल. केळं, ओट्स, पीनट बटर, दही, इलेक्ट्रॉलाईट अथवा पाणी, बीट, गाजरचा रस असे पदार्थ तुम्ही धावण्याआधी नक्कीच घेऊ शकता. मात्र पोटभरून अन्न अशा वेळी मुळीच सेवन करू नका. 

धावण्याआधी काय खाऊ नये

धावण्याआधी तीन ते चार तास काही पदार्थ खाण्यास काहीच हरकत नसली तरी, काही पदार्थ मात्र मुळीच खाऊ नयेत. कारण या पदार्थांमुळे तुमच्या धावण्याची क्षमता कमी होते. जसं की, मांस, मासे, सी फूड, एनर्जी ड्रिंक्स, स्टार्च असलेल्या भाज्या, चॉकलेट, कॉफी,फायबरयुक्त पदार्थ पचनासाठी जड असतात. असे पदार्थ धावण्यापूर्वी खाल्ल्यास तुमच्या शरीरावर ताण येतो आणि थकवा वाटू लागतो. 

धावण्यानंतर काय खावे आणि काय खाऊ नये

धावण्यामुळे तुमच्या शरीरातील खूप ऊर्जा खर्च झालेली असते. ज्यामुळे शारीरिक कार्य सुरळीत सुरू राहण्यासाठी शरीराला धावण्यानंतर काही खास पदार्थ खाण्याची गरज लागते. त्यामुळे धावून झाल्यावर एक तासाने तुम्ही कार्बोहायड्रेट असलेले पदार्थ, प्रोटीनयुक्त पदार्थ, जलयुक्त पदार्थ, इलेक्ट्रोलाईट्स अवश्य सेवन करावे. मात्र धावण्यानंतर कधीच सोडा असलेली पेय, डेअरी प्रॉडक्ट, फॅट्स, तळलेले चमचमीत पदार्थ, मद्यपान करू नये. 

ADVERTISEMENT
18 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT