home / Family
Funny Marathi Status

लोटपोट करतील मराठी कॉमेडी स्टेटस | Funny Status In Marathi Text

हल्लीच्या जगात सोशल मीडियाचं सगळं काही आहे बॉस… सगळं काही सोशल मीडियाचं झालं आहे. खास तुमच्यासाठीच आम्ही मराठीतील विनोदी स्टेटस विनोदी स्टेटस (Funny Status In Marathi), फनी कोट्स इन मराठी मुलांसाठी (Funny Quotes In Marathi For Boys), फनी कोट्स इन मराठी मुलींसाठी (Funny Quotes in Marathi for girls), मराठी कॉमेडी स्टेटस (Comedy Status Marathi), मित्रमैत्रिणींसाठी खास फनी एसएमएस (Funny Sms In Marathi For Friends), विनोदी शायरी मराठी (Marathi Shayari Funny), विनोदी मेसेजेस (Funny Messages In Marathi) शेअर करत आहोत. 

विनोदी स्टेटस (Funny Status In Marathi)

Funny Status In Marathi
Funny Status In Marathi

काहींची ओळखच असते ते त्यांनी ठेवलेले विनोदी स्टेटस. तुम्हालाही अशी ओळख हवी असेल तर शेअर करा हे मराठी कॉमेडी स्टेटस (Comedy Status Marathi)

 • स्त्रियांना त्यांचे वय विचारु नये…. पुरुषाला त्याचा पगार… आणि विद्यार्थ्याला त्याचे मार्क्स .. कारण त्याचा खूप त्रास होतो.
 • ज्या दिवशी विचार करतो की, आयुष्यात खूप काही तरी मोठं करायचं… नेमकं त्याच दिवशी घरातले दळण आणायला पाठवतात.
 • कितीही शिकलो तरी दरवाज्यावरील  Push आणि Pull वाचल्यानंतर काही सेंकद तरी विचार करतो…. अरे दरवाजा ओढायचा की, ढकलायचा. (Funny Status In Marathi)
 • शाळेतली एक आठवण… बाई मी खरचं घरचा अभ्यास केलाय.. पण श्या.. अभ्यास ज्यात केला ती वहीच घरी विसरलो.
 • चला सगळ्यांनी पटापट आपले Qualification सांगा.बघू कोण किती शिकलं आहे ते.
 • पाऊस कमी होण्याचे कारण आहे इंग्लिश मीडियम स्कुलची वाढती संख्या.. कारण ते येरे येरे पावसा ऐवजी rain rain go away असे मुलांना शिकवतात.
 • ती: तू काय करतोयस? मी: इंजिनीअरींग.. खाली काय बघता इज्जत वरच गेली आहे.
 • अवघड प्रश्न खूप अवघड प्रश्न… आज शाळेत काय शिकवलयं.
 • काही लोक इतके उतावळे असतात की, फळ्यावर बाईंनी शिकवल्यावर सगळं कळालं असं सांगतात. पण घरचा अभ्यास केला नाही की, कळलं नाही असे सांगतात.
 • जर तुम्हाला कोणी शिक्षण विचारुन जज करत असेल तर आताच दूर व्हा.. कारण उद्या रिझल्ट दाखवायची वेळ आली तर वांदे होतील. (Funny Status In Marathi)

वाचा – महिलांसाठी खास फॅशन कोट्स 

फनी कोट्स इन मराठी मुलांसाठी (Funny Quotes In Marathi For Boys)

Funny Quotes In Marathi For Boys
Funny Quotes In Marathi For Boys

मित्रांचे मजामस्ती तर सुरूच असते. कधी नाक्यावर तर कधी चहाच्या टपरीवर आणि मुख्य विषय असतो नोकरी नाहीतर छोकरी. मग तुमच्यासाठी खास फनी कोट्स (Funny Quotes In Marathi For Boys).

 • तू मला काहीही बोल चालेल फक्त महिन्याच्या शेवटी पगाराचा शिल्लक आकडा विचारु नकोस . इ.ति. मी
 • हल्ली 1 तारीख आली की, मला खूपच भीती वाटते.पगाराची नाही तर तो किती शिल्लक राहील याची
 • पगारदेवा नेहमीच ये ना रे भेटायला.. बरं वाटतं जाईल मला (funny quotes in marathi)
 • पगार असल्यावर असं वाटतं की, अपुनीच भगवान है… बाकी साला सब…. है
 • मुंबईत माणसं प्रवासाचा पगार घेतात, बाकी जॉब वगैरे सगळी अंधश्रद्धा आहे हो
 • जेव्हा आयुष्यात सगळे काही चांगले आहे असे वाटायला लागते… नेमकं तेव्हाच हेडफोनची एक बाजू वाजायची बंद होते.
 • पगार… आला … आला … आला… पगाराच्या दुसऱ्या दिवशी गेला रे सगळा पगार गेला
 • या महिन्यात मी saving करणार होतो… जाऊ दे आता पुढच्या महिन्यात करतो.
 • पगारवाढीचा प्रस्ताव बॉस काही केल्या स्विकारत नाहीए. म्हटलं आता स्टेटसच ठेवावं… पोट्याला दया आली तर ठीक
 • ये रे ये रे पैसा… जाऊ नको कुठेसा… सेल आला मोठा… पगार झाला खोटा
 • आज मेरा पास क्या हैं. हाय्यसाला … पगार.. दुसऱ्यादिवशी… आज मेरे पास सिर्फ कुछ चिल्लर है
 • यावेळी मी पगार आल्यावर सगळं घेणार.. पण पगार गेला कुठे?
 • मासे तरी गळाला लागतील.. पण हा पगार नाही… 
 • पगारावर बोलू काही.. जाऊ दे ना भावा यापेक्षा मोठं दु:ख माझ्या आयुष्यात नाही. (funny quotes in marathi)

वाचा – CID वरील मराठी जोक्स

फनी कोट्स इन मराठी मुलींसाठी (Funny Quotes in Marathi For Girls)

Funny Quotes in Marathi For Girls
Funny Quotes in Marathi For Girls

मुलींना पण बरेच व्याप असतात. त्यात मोठा व्याप म्हणजे नको त्या लोकांना आपल्या सोशल मीडियापासून दूर ठेवणं. अशा मुलींसाठी खास फनी कोट्स (Funny Quotes in Marathi For Girls).

 • चॅटींगला सेटींग समजू नकोस, फ्रेंडली आहे फ्लर्टी नाही. 
 • आज पण मी एकटीच आहे. नशीब खराब आहे, माझं नाही मुलांचं. कारण कोणताही मुलगा मला आजपर्यंत इंप्रेस करू शकला नाही. 
 • कोणाला येवो ना येवो पण स्वतःला पाहून मला मात्र पक्की हिरोईनवाली फिलींग येते. (marathi funny quotes)
 • नेहमी दिखाव्याच्या प्रेमाचाच आवाज असतो, खरं प्रेम तर इशाऱ्यांमध्येच अडकतं. 
 • आज तो वेडा मुलगा म्हणाला, तुला ही दुश्मनी महाग पडेल. मी पण म्हटलं स्वस्त तर मी काजळ पण नाही लावत. 
 • आजकाल लोक वफादार कमी आणि कलाकार जास्त व्हायला लागली आहेत. 
 • तू एवढा पण भारी नाहीयेस, फक्त माझ्या प्रेमाने तुला डोक्यावर चढवून ठेवलंय. 
 • मी खूपच खट्याळ मुलगी आहे. दिल नाही डायरेक्ट डोकं खराब करते. कळलं ना. जपून राहायचं. (marathi funny quotes)
 • मला आवडतात ती लोकं जी माझ्यावर जळतात. कारण आता सगळेच प्रेम करायला लागले तर नजर नाही का लागणार मला. 

वाचा – Marathi Caption For Instagram

मराठी कॉमेडी स्टेटस (Comedy Status Marathi)

Comedy Status Marathi
Comedy Status Marathi

आपला स्टेटस पाहून फक्त आपणच नाहीतर वाचणाराही हसला पाहिजे असं तुम्हालाही वाटतं का, मग शेअर करा हे मराठी कॉमेडी स्टेटस (Comedy Status Marathi).

 • वेळ खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे स्वतःचा नाही, दुसऱ्यांचा वाया घालवा. 
 • काही लोक इतकी परफेक्ट असतात की, त्यांच्या कौतुकासाठी शब्दही अपुरे पडतात. जसं की मी. 
 • ज्याला पटवण्यासाठी गिटार शिकले होते. आता त्याच्या लग्नात गिटार वाजवायचं आमंत्रण आलंय. 
 • मी तर कर्मच करत असतो माहीत नाही कांड कसं होऊन बसतं ते. (Comedy Status Marathi)
 • माणूस कितीही बिझी असला तरी त्याला मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट आल्यावर तो तिच्या प्रोफाईलची सीबीआय चौकशी पण करूनच घेतो. 
 • हे बघ जानू…बोलत जा…म्हशीसारख hmmm…नको करत जाऊस. 
 • काही मुलींकडे देवाने दिलेलं सर्वकाही है. फक्त माझा मोबाईल नंबर सोडून. 
 • आजच्या काळात फक्त कस्टमर केअरवालेच आहेत जे गरीबापेक्षा गरीब असणाऱ्यांना पण बोलताना आदर दाखवतात. 
 • फक्त दोनच गोष्टींनी बायकांचा मूड बदलतो. एक म्हणजे आय लव्ह यू आणि दुसरं म्हणजे 50 टक्के डिस्काउंट.
 • जगातील आनंद एकीकडे आणि फोनच्या 100 टक्के चार्ज असण्याचा आनंद एकीकडे. भारी वाटतं एकदम राव. (Comedy Status Marathi)

मित्रमैत्रिणींसाठी खास फनी एसएमएस (Funny Sms In Marathi For Friends)

Funny Sms In Marathi For Friends
Funny Sms In Marathi For Friends

सोशल मीडिया असो वा वॉट्सअॅप करणं असो मित्रांना विनोदी एसएमएस (Funny Sms In Marathi For Friends) तर हमखास पाठवले जातातच. मग तुम्हालाही हे विनोदी एसएमएस नक्कीच आवडतील.  

 • आज कबीर सिंह पाहिला.. एक तास रडलो… पण जेव्हा आपल्याला gf नाही हे कळलं तेव्हा 2 तास रडलो.
 • तू जर A फॉर  Attitude दाखववा.. तर मी B फॉर भाव देणार नाही.
 • जर तुमची आई तुम्हाला फोन खाली ठेव सांगत असेल तर ठेवत जा कारण आईच्या पायाशी स्वर्ग असतो असे म्हणतात. पण त्याच पायात चप्पलही असते.
 • असं म्हणतात, पोरगी हसली की फसली..इथे इतक्या पोरींना हसवून मोकळा झालो.. पण एकही नाही फसली.
 • आपण हुशार आहोत हे सिद्ध करता आले नाही तरी चालेल पण समोरचा वेडा आहे हे सिद्ध करता आले पाहिजे.
 • परफेक्ट जोडी ही फक्त चपलांची असते.उरलेल्या सगळ्या या अंधश्रद्धा आहेत.
 • गूण जुळले की लग्न होतं आणि अवगुण जुळले की, होते मैत्री
 • पोटाचा प्रश्न सुटला की, सुटलेल्या पोटाचा प्रश्न असतो.. शेवटी काय तर पोटाचा प्रश्न कायम राहतो.
 • लहानपणी मी single होतो. आता single लोकांचा अॅडमिन आहे.
 • नातेवाईक: मग पुढे काय करायचं ठरवलं आहे??
 • मी: सध्या काही नाही. पण तुम्ही गेल्यावर उरलेलं फरसाण खायचं ठरवलं आहे
 • हल्ली आमच्याकडे पाहुणचाराची एक वेगळीच पद्धत सुरु झाली आहे. बसा असं म्हणण्याआधी फोन चार्जिंगला लावायचा आहे का, असे विचारले जाते.

वाचा – कुटुंबातील प्रेमाचं समीकरण सांगणारे फॅमिली कोटस

विनोदी शायरी मराठी (Marathi Shayari Funny)

Marathi Shayari Funny
Marathi Shayari Funny

नुसता काय जोक मारायचा नाही का, त्याला शायरीचा अंदाज देता आला पाहिजे. तुम्हाला पण असं वाटतं का मग तुमच्यासाठी खास विनोदी शायरी मराठी (Marathi Shayari Funny). 

 • सिंगल असण्याचं दुःख नाही
  दुःख या गोष्टीचं आहे की,
  कोणी विश्वासच ठेवत नाही. 
 • बोर झाल्यावर मेसेज कराल तर रिप्लाय पण फ्री झाल्यावरच मिळेल. 
 • काही लोकांनी कितीही खाल्लं तरी जाडे होत नाहीत
  आणि काही लोकांनी ऑनलाईन पिझ्झा पाहिला तरी
  एक किलोने वजन वाढतं वाह देवा वाह….
 • सुंदर मुली जास्त शिकत नाहीत 
  कारण त्यांना माहीत असतं की, 
  जगातल्या एखाद्या कोपऱ्यात 
  एक तरी मूर्ख मुलगा त्यांच्यासाठी 
  डॉक्टर किंवा इंजीनियर बनत असतो.  
 • दुःखाला पण आधार कार्डाशी जोडलं पाहिजे
  ज्यांना एकदा मिळालं त्यांना पुन्हा मिळता कामा नये
 • हळद लावायच्या माझ्या वयात पोरी मला चुना लावून जात आहेत. हाय रे देवा वाचव. 
 • घाईच काम राक्षसाचं असतं ना, म्हणून मी झोपतेही उशिरा 
  आणि उठतेही उशिराच. 
 • आयुष्यात माझे तीनच नियम आहेत. आवेदन, निवेदन आणि तरीही नाही ऐकलं तर दे दणा दण. 
 • माझ्या शांततेला माझी कमजोरी समजू नका 
  मी मनातल्या मनात पण शिव्या देतो
  देशातले तरूण आता जागृत झाले आहेत. उठतील ब्रश करतील आणि वॉट्सअप सुरू करतील.

वाचा – बालपणीच्या मित्रासाठी मैत्री चारोळ्या

विनोदी मेसेजेस (Funny Messages In Marathi)

Funny Messages In Marathi
Funny Messages In Marathi

आता मित्र भेटल्यावर त्यांच्यासोबत तुम्हाला आलेले मेसेजेस तर शेअर केलेच पाहिजेत ना. मग तुमच्यासाठी खास विनोदी मेसेजेस (Funny Messages In Marathi)

 • आयुष्य खूप बोअरींग झालयं देवा…. उचल एकदा आणि नेऊन टाक एकदा गोव्याच्या बीचवर.
 • तुम्ही कुठेतरी खूप घाईघाईने बाहेर जाता आणि अचानक काळी मांजर समोरुन जाते…. याचा अर्थ काय? …त्या मांजरीला तुमच्यापेक्षाही जास्त घाई असते.
 • आळसाचे दुसरे नाव आहे ‘रविवार’ आणि अन्यायाचे दुसरे नाव ‘सोमवार’
 • हल्ली जरा प्राॅब्लेमच झाला आहे.  रात्री लवकर झोप येत नाही आणि सकाळी लवकर जाग येत नाही.
 • माणूस तीन गोष्टी कधीच लपवू शकत नाही. प्रेम .. खोकला आणि पापड खाण्याचा आवाज
 • आताच हाती आलेल्या माहितीनुसार मुंबईत wow how  romantic वरुन पाण्याची पातळी…आईशप्पथ केवढं ते पाणीवर गेली आहे… जरा जपून
 • आपण जसजसे मोठे होऊ लागतो. त्यावेळी कळायला लागतं की, झोपेपेक्षा महत्वाचं अस जगात काहीच नसतं.
 • ट्रेनच्या चौथ्या सीटवर बसणारी तिचं असतात. ज्यांना इतर बसलेल्या प्रवाशाचे सुख पाहवत नाही.
 • लग्नाच्या गाठी स्वर्गात जुळतात आणि हेडफोन्सच्या खिशात
 • सून आणि मान्सून यांची लोक खूप वाट पाहतात. पण आल्यानंतर सारखी चिडचिड करतात.
 • आयुष्यात सगळ्यांचे ऐका पण आठवडी सुट्टी मात्र स्वत:च्या मर्जीनेच घालवा
 • रविवारी झोपण्यात जितकं सुख आहे तितकं कदाचित कशातच नाही… पण होऊ दे झोप पूर्ण… घड्याळ बंद झोप सुरु
 • आठवडी सुट्टी पगारापेक्षाही क्षणिक आहे येते कधी जाते कधी कळतच नाही राव
 • शुक्रवार नवचैतन्य घेऊन येतो कारण दुसऱ्या दिवशी शनिवार जो येणार असतो.
 • सोमवारी ऑफिसला गेल्यानंतर किती जण weekend कधी यासाठी दिवस मोजतात??

वाचा – मित्रमैत्रिणींसाठी 15 चारोळी

23 May 2022

Read More

read more articles like this
good points logo

good points text