ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
मिळत असतील असे संकेत, तर ब्रा बदलायलाच हवी

मिळत असतील असे संकेत, तर ब्रा बदलायलाच हवी

ब्रा (Bra) दिसली की ती घ्यायचा मोह होतोच. पण अजूनही तितका बिनधास्तपणा महिलांमध्ये दिसून येत नाही. तुम्ही शेवटची ब्रा कधी खरेदी केली होती आठवतं आहे का? खरं तर आता कोरोना काळात (Coronavirus) गेले दोन वर्ष घरात बसून ब्रा ची गरज भासते आहे की नाही इथपासूनच सगळी सुरूवात आहे. पण तरीही आपण बाकी सगळ्या गोष्टींकडे लक्ष देतो. मग ब्रा कडे लक्ष देणेही तितकेच गरजेचे आहे. काही महिला नव्या ब्रा तेव्हाच खरेदी करतात जेव्हा पहिल्या ब्रा अगदी खराब होतात. पण तुम्हाला माहीत आहे का? आपली ब्रा आपण दर 6 महिन्याने तरी किमान बदलायला हवी. कारण ब्रा सतत घालून घालून सैल तर होतेच पण खराबही होते. काही ब्रा चे कप्स सैल होतात तर काहींचे स्ट्रॅप सैल होतात. काही ब्रा चा रंग निघून जातो. पण तरीही काही महिला तशाच या ब्रा घालतात. पण ज्याप्रमाणे इतर गोष्टींची एक्सपायरी डेट असते तशीच ब्रा ची देखील असते. तुम्ही कितीही नीट काळजी घेतली तरीही एका ठराविक कालावधीनंतर तुम्हाला ब्रा मध्ये बदल करावेच लागतात. तुम्हाला आम्ही काही संकेत देत आहोत, जेव्हा तुम्ही तुमची ब्रा बदलायचा हवी हे निश्चित आहे. 

प्रत्येक मुलीला माहीत असायलाच हवेत ‘हे’ 10 Bra Rules!

ब्रा चा मागील भाग सैल झाला असल्यास

ब्रा चा मागील भाग सैल झाला असल्यास

Freepik

ADVERTISEMENT

ब्रा चे हूक हे मागच्या बाजूला असतात. तुम्ही कितीही व्यवस्थित वापरले तरीही काही ठराविक कालावधीनंतर ब्रा चा मागचा भाग हा स्वाभाविक रूपाने खेचला जातो. असं जेव्हा होतं तेव्हा ब्रा व्यवस्थित फिट करण्यासाठी तुम्ही टाईटर साईडचा हूक लावता. पण यामुळे बस्टमध्ये सेट होणारा ब्रा चा बँड खेचला जातो. तसंच याचे इलास्टिक सैल होते. जेव्हा तुम्हाला असा सैलसरपणा जाणवू लागेल तेव्हा त्वरीत ब्रा बदलण्याची वेळ आली आहे हे समजून जा. त्यामध्ये वेळ काढू नका. 

कम्फर्टेबल आणि सेक्सी 5 ब्रा, प्रत्येक महिलेकडे असायलाच हव्या

स्ट्रॅप्स सैल झाले आहेत

स्ट्रॅप्स सैल झाले आहेत

Freepik

ADVERTISEMENT

तुम्हाला सतत स्ट्रॅप्स वर करावे लागत आहेत का? तुमच्या खांद्यावरून सतत खाली येत असेल तर तुम्हाला ब्रा बदलण्याची गरज आहे. कारण यामुळे तुमचे लक्षही सतत ब्रा च्या स्ट्रॅप्स खाली येण्यावर राहते. स्ट्रॅप्स ब्रा चे कप्स आणि बॅक या दोघांनाही व्यवस्थित सपोर्ट देते. त्यामुळे जर तुमच्या ब्रा चे स्ट्रॅप्स सैल झाले असतील तर तुम्ही ती त्वरीत बदलायला हवी. तसंच एक गोष्ट लक्षात ठेवा स्ट्रॅप्स तेव्हाच खांद्यावरून लवकर सैल होतात जेव्हा तुम्ही ब्रा चा चुकीचा आकार (size of bra) निवडता. त्यामुळे यावर नेहमी लक्ष ठेवा आणि योग्य आकाराची ब्रा निवडा. 

उन्हाळ्यात कम्फर्टेबल लुकसाठी वापरा अशा ब्रा

ब्रा च्या कप्स मध्ये बदल होणे

सतत ब्रा चा वापर केल्याने ब्रा च्या कप साईजमध्येही बदल होतो. बऱ्याचदा वजन वाढणे अथवा वजन अचानक कमी झाल्याने ब्रा घट्ट अथवा सैलसर होते. तुम्ही ब्रा घातल्यानंतर तुमच्या ब्रा च्या कप साईजमध्ये बदल जाणवायला लागता तर तुम्ही ब्रा बदलून टाकावी. तुमच्या कपड्यांमधून ब्रा चा आकार तसा वेगळा दिसून येतो आणि मग तुम्हालाच त्यामुळे लाज वाटण्याची शक्यता असते. त्यामुळे योग्य आकारासाठी तुम्ही ब्रा मध्ये नक्की बदल करून घ्या.

स्टिक ऑन ब्रा चे प्रकार आणि कशी घ्याल काळजी
 

ADVERTISEMENT

अंडर वायर खराब होणे

अंडर वायर खराब होणे

Freepik

स्तनांचा (Boobs) परफेक्ट आकार दिसावा यासाठी मुली सहसा अंडर वायर्ड ब्रा घालतात. पण या वायरमुळे अनेकदा त्रास होतो. तसंच सतत ही अंडर वायर्ड ब्रा घातल्याने त्याची वायरही खराब होते. तर बऱ्याचदा ही वायर बाहेर आल्याने टोचण्याचा त्रासही होतो. अशा स्थितीमध्ये तुमची ब्रा असेल तर तुम्ही ती शिवून न घालता नव्या ब्रा चा वापर करावा. अशी ब्रा शिवली तरीही त्याचा त्रासच होतो. त्यामुळे तुम्ही असा कोणताही उपाय न करता वेळीच ब्रा बदला. 

किती तऱ्हेच्या असतात ब्रा, जाणून घ्या कोणती ब्रा कधी वापरायची (Different Types Of Bra In Marathi)

ADVERTISEMENT

कपडा खराब होणे

तुम्ही कपडे कसे घालता आणि त्याचा वापर कसा करता, कसे धुता यावर ते किती टिकतील हे अवलंबून असते. तुम्हाला जर ब्रा चा कपडा खराब होऊ लागला आहे हे कळत असेल तर तुम्ही वेळीच ती ब्रा बदलून टाका. कारण त्या कपड्यातून निघणारे तंतू अथवा ती पूर्ण खराब होईपर्यंत वापरणे तुमच्या त्वचेसाठीही धोकादायक ठरू शकते. ब्रा चे पॅडिंग, इलास्टिक खराब होणे, सैल होणे या सगळ्या गोष्टी होत असतील तर तुम्ही ब्रा बदलायलाच हवी. तुमच्या शरीराच्या आणि स्तनांच्या योग्य आकारानुसारच तुम्ही ब्रा ची निवड करा. तसंच यापैकी कोणतेही संकेत तुम्हाला दिसले तर तुम्ही त्वरीत ब्रा बदला. 

You Might Also Like

Types of Bra in English

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

28 Jun 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT