ADVERTISEMENT
home / अॅस्ट्रो वर्ल्ड
when-will-i-get-married-by-date-of-birth-numeric-horoscope-in-marathi

लग्न ठरण्यास येत असतील अडचणी, तर ज्योतिषशास्त्रानुसार सोपा उपाय

लग्नाच्या बाबतीत प्रत्येकाची स्वप्नं असतात. पण या स्वप्नांना तेव्हा भेग पडते, जेव्हा लग्नामध्ये अडचणी येणं सुरू होतं. अनेकदा मुलगा वा मुलीचे आई-वडील यांना वाटत राहातं की, मुलामध्ये अथवा मुलीमध्येच काहीतरी दोष असेल. पण असा विचार करणं चुकीचं आहे. अनेकदा कितीही प्रयत्न करून लग्न होत नसले आणि अनेक अडचणी येत असल्या तर नक्कीच आपल्या कुंडली ग्रहांमध्ये काहीतरी समस्या आहे असं ज्योतिषशास्त्रानुसार सांगण्यात येते. त्यासाठी तुम्ही योग्य मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. लग्न ठरण्यास अडचणी येत असल्यास, तुमच्या जन्मतारखेप्रमाणे तुम्ही कोणते उपाय करू शकता याबाबत या लेखातून थोडासा प्रकाश टाकण्याचा आमचा प्रयत्न आहे. हे तुम्हाला ज्योतिषशास्त्राचा आधार घेऊन आम्ही सांगत आहोत. याबाबत आम्ही ज्योतिषी शेफाली यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्याकडून अधिक जाणून घेतले. आपल्या नशिबानुसार लग्न ठरते आणि त्यासाठी योग्य माहिती खालीलप्रमाणे. 

उदा. तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 24 तारखेला झाला असेल तर तुमचा मुलांक ठरतो – 2 + 4 = 6. या क्रमांकानुसार तुम्ही अधिक जाणून घेऊ शकता. 

1 मुलांक असणाऱ्यांसाठी उपाय 

1 अंक असणाऱ्या व्यक्तींना कोणीही पटकन आकर्षित करून घेऊ शकत नाही. त्यामुळे त्यांच्या लग्नात अनेक अडचणी येतात. या व्यक्ती अत्यंत प्रॅक्टिकल असतात आणि कोणताही निर्णय घेताना वेळ लावतात. 1 अंक असणाऱ्या व्यक्तींसाठी 2, 4 आणि 6 हे मित्र अंक आहेत आणि यांच्यासह त्यांचे लग्न झाल्यास, अत्यंत चांगले वैवाहिक आयुष्य सरते. तर 7, 8 आणि 9 या अंकांसह या व्यक्तींचे जमत नाही. 
उपाय – तुम्हाला गुरूवारी श्री विष्णूला हळद अर्पण करणे फायद्याचे ठरते 

2 मुलांक असणाऱ्यांसाठी उपाय 

2 अंक असणाऱ्या व्यक्तींना कोणीही कधीही आवडू शकतं आणि कधी कधी कोणीही आवडत नाही. त्यामुळे या व्यक्तींच्या लग्नात अडचणी येतात. वास्तविक 2 अंक असणाऱ्या व्यक्तींना कोणत्याही व्यक्तीची एखादी गोष्ट आवडली नाही तर त्या व्यक्तीच्या कमतरता लगेच या व्यक्ती शोधायला सुरू करतात. 2 अंक असणाऱ्या व्यक्तींचे मित्र अंक आहेत 1,3 आणि 6 तर 5 आणि 8 अंक असणाऱ्या व्यक्तींबाबत या व्यक्तींनी अजिबात विचार करू नये. 
उपाय – शुक्रवारच्या दिवशी संतोषी मातेची पूजा करावी आणि 21 शुक्रवार उपवास करावा. 

ADVERTISEMENT

3 मुलांक असणाऱ्यांसाठी उपाय 

3 अंक असणाऱ्या व्यक्ती या स्वतःच्याच प्रेमात असतात आणि अत्यंत प्रॅक्टिकल असतात. स्वतःशिवाय अन्य कोणावरही या व्यक्ती कमी प्रेम करतात. या व्यक्तींचा स्वभाव हुकूमत गाजविण्याचा असतो आणि म्हणूनच यांना जोडीदार निवडताना अडचणींचा सामना करावा लागतो. 2, 6 आणि 9 हे मित्र अंक असून त्यांच्यासाठी या अंकाचे जोडीदार उत्तम ठरतात तर 1 आणि 4 अंकांच्या व्यक्तींपासून त्यांनी लांबच राहावे.  
उपाय – तुमच्या लग्नामध्ये अडचणी येत असतील अथवा उशीर होत असेल, तर 16 सोमवारचे व्रत करावे.

4 मुलांक असणाऱ्यांसाठी उपाय 

4 अंक असणाऱ्या व्यक्ती या प्रामाणिकपणावर जोडीदार शोधतात. तसंच तर या मुलांकाच्या व्यक्ती खूपच हुकूमत गाजविणाऱ्या असतात. 4 अंक असणाऱ्या व्यक्तीसहच तुम्हाला लग्न करायचे असेल तर अनेक अडचणी येतात. तर 1,2, 7 आणि 8 या मुलांकाशी तुमचे उत्तम जमू शकते. 
उपाय – 21 शनिवार तुम्ही तुमच्या डोक्यावरून 7 सुक्या लाल मिरच्या सरळ आणि उलट्या पद्धतीने ओवाळून रात्री चौकात फेकून द्याव्या. 

5 मुलांक असणाऱ्यांसाठी उपाय 

5 अंक असणाऱ्या व्यक्तींसाठी समोरची व्यक्ती दिसायला कशी आहे हे अत्यंत महत्त्वाचे असते. एखादी व्यक्ती दिसायला चांगली नसेल तर अशा व्यक्तींशी लग्न करण्यास या व्यक्ती तयार होत नाहीत. तसंच या व्यक्तींना लवकर कंटाळाही येतो. 5 आणि 8 या अंकांशी विवाह करणे योग्य ठरते. तर 2 अंक असणाऱ्या मुलांकाशी या व्यक्तींनी लग्न करू नये. 
उपाय – तुमच्या कुंडलीत शुक्र कमजोर असेल, तर वैवाहिक जीवनात यश मिळण्यासाठी शुक्र बलवान होण्यासाठी तुम्हाला उपाय करावे लागतील. 

6 मुलांक असणाऱ्यांसाठी उपाय 

6 अंक असणाऱ्या व्यक्तींकडे दुसऱ्या व्यक्तींना आपल्याकडे आकर्षित करण्याची ताकद असते. यांना प्रेम आणि शांतता प्रिय असते. या अंकाचे शत्रु नसतात. कोणीही यांच्या मनात भरलं तर त्या व्यक्ती त्यांच्यासाठी खास होतात. 
उपाय – लग्न होण्यात अडचणी येत असतील तर 5 नारळ शिवलिंगाला अर्पण करावे.

ADVERTISEMENT

7 मुलांक असणाऱ्यांसाठी उपाय 

7 अंक असणाऱ्या व्यक्तींना रोमँटिक जोडीदार आवडतात. त्यांना आपल्या लव्ह लाईफ अथवा वैवाहिक जीवनात कोणत्याही प्रकारचा तणाव आवडत नाही. त्यामुळे जोडीदार निवडण्याआधी या व्यक्ती अनेकांना पारखून आणि निरखून घेतात. लग्नासाठी 2 अंकाच्या व्यक्ती यांच्यासाठी योग्य आहेत आणि 9 अंकाच्या व्यक्तींसह अजिबात पटत नाही. 
उपाय – 2 अंकाच्या व्यक्ती यांच्यासाठी योग्य आहेत, 2 अंकचा चंद्र हा स्वामी आहे आणि त्यासाठी तुम्हाला चंद्र मजूबत करण्याची गरज आहे. 

8 मुलांक असणाऱ्यांसाठी उपाय 

8 अंक असणाऱ्या व्यक्ती अत्यंत भावुक असतात. लहानातील लहान गोष्टही त्यांना त्रास देते. तर अनेकदा काही व्यक्ती त्यांना समजून घेण्यातही चूक करतात. 8 अंक असणाऱ्या महिलांना लग्नापूर्वी आणि लग्नानंतरही अनेक कठीण परिस्थितींना सामोरे जावे लागते. 2 अंक सोडून इतर कोणत्याही अंकाच्या व्यक्तीसह या व्यक्ती लग्न करू शकतात. 
उपाय – नियमित तुळशीच्या झाडाला पाणी अर्पण करा

9 मुलांक असणाऱ्यांसाठी उपाय 

9 अंक असणाऱ्या व्यक्ती या हुकूमत गाजविणाऱ्या असतात आणि त्यांना समजून घेणाऱ्या व्यक्तींचा त्यांना शोध असतो. तसंच त्यांचा स्वभाव समजून घेणाऱ्या व्यक्ती त्यांना हव्या असतात. 9 अंकाच्या व्यक्तींसाठी 1 अंकाच्या व्यक्ती परफेक्ट मॅच आहेत. तर 9 अंक हा त्यांच्यासाठी खराब ठरू शकतो. 
उपाय – 9 अंकाचा स्वामी मंगळ आहे. कुंडलीमध्ये मंगळ असेल तर तुम्हाला त्यावर उपाय करणे गरजेचे आहे. 

टीप – आम्ही कोणत्याही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नाही. इतर शास्त्रांप्रमाणे ज्योतिषशास्त्रदेखील एक अभ्यास आहे आणि याआधारेच हा लेख लिहिण्यात आला आहे. आपल्या मनाप्रमाणे आपण याचा विचार करावा. 

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

04 Jun 2022
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT