मैत्री (Friendship) हे असं नातं आहे जे आपण आपल्या मनाने जोडतो आणि कायम टिकविण्याचा प्रयत्न करतो. कोणत्याही नातेवाईकांपेक्षा आपले मित्रमैत्रिणी आपल्यासाठी खास असतात कारण त्याचं आपल्या आयुष्यात खूपच महत्त्वाचं स्थान असतं. पण कोणत्याही नात्यात जळणे अर्थात ईर्ष्या ही जी भावना आहे ती नक्कीच दुरावा निर्माण करण्यास कारणीभूत ठरत असते. रोमँटिक (Romantic) नात्यात ही भावना असणे साहजिक आहे. पण मैत्रीतदेखील ही भावना असू शकते. मैत्रीमध्ये मात्र ही भावना तुम्हाला जाणवत असेल तर तुम्ही वेळीच आपल्या मित्रमैत्रिणींशी बोलून हे संपवून टाकायला हवे. कारण यामुळे तुमची मैत्री संपण्याची भीती असते. तुमची मैत्री खराब होऊ नये यासाठी तुम्ही ईर्ष्येची ही भावना वेळीच संपवून टाकायला हवी. मैत्री हे असं नातं आहे जे सर्व नात्यांपेक्षा अनमोल असतं आणि ते टिकविण्यासाठी या गोष्टी करण्याची तुम्हाला गरज आहे. मैत्रीत मित्रमैत्रिणीबाबत जळूपणा वाटत असेल तर करा अशा पद्धतीने हँडल –
स्वीकारणे आहे आवश्यक
असूयेची भावना दूर करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा ही भावना आपल्यात आहे हे स्वीकारावे लागते. यामध्ये चुकीचे काहीही नाही आणि त्याचा राग स्वतःवर काढूही नका. तुम्ही स्वतःबाबत चुकीचा विचार करणे बंद करा. कारण तुम्ही जेव्हा तुमच्या कोणत्याही मित्रमैत्रिणीवर प्रेम करता तेव्हा अशी जळूपणाची भावना निर्माण होणे हे अगदी नॉर्मल आहे. तुमचा मित्र वा मैत्रीण तुमच्यापेक्षा अधिक कोणाजवळ जात असेल तरीही तुमची त्यांच्या मनातील जागा नक्कीच कधी कमी होणार नाही. तुम्ही जर तुमच्या मनातील ही भावना स्वीकारली तर ती दूर करतानाही तुम्हाला पटकन करता येते हे लक्षात घ्या.
जजमेंटल होऊ नका
आपली ईर्ष्या दूर करण्यासाठी तुम्ही तुमची नकारात्मक भावना सकारात्मक अजिबात मानू नका. तुम्हाला तुमच्या बेस्टफ्रेंडवर कितीही प्रेम असेल तरीही जर तुमच्या मित्रमैत्रिणी दुसऱ्यांसह बोलत असतील अथवा त्यांच्या आयुष्यात इतर कोणाला जागा असेल तर तुम्हाला त्रास करून घेण्याची गरज नाही. त्यांच्या मनात इतरही कोणाविषयीदेखील प्रेमाची आणि मैत्रीची भावना असू शकते हे तुम्ही लक्षात घ्या. समोरच्या व्यक्तीबाबत आपल्या मनात विचार करणे आणि समोरची व्यक्ती कशी वाईट आहे याचा विचार करू नका. सतत भावनात्मक विचार करण्यापेक्षा प्रॅक्टिकल विचार करायला शिका.
तुमची भीती काय आहे?
तुम्हाला नक्की कोणती गोष्ट त्रासदायक ठरत आहे याचा तुम्ही शांतपणे विचार करा. तुम्हाला तुमचा मित्र वा मैत्रीण दूर होईल असं वाटत आहे का? किंवा आपण जितके प्रेम आपल्या मैत्रिणीला वा मित्राला देतोय अथवा जितके प्राधान्य देतोय तितके आपल्याला मिळत नाही असं तुम्हाला वाटतंय का? याचे कारण काहीही असू शकते. त्यामुळे आधी आपण स्वतः आपल्या मनाशी नीट विचार करा आणि नंतरच आपल्या मित्रमैत्रिणीशी यासंदर्भात बोलून ही समस्या सोडविण्याचा प्रयत्न करा.
मित्रमैत्रिणींशी बोला
तुम्हाला जर तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवता येत नसेल. तर तुम्ही तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींशी बोला. सतत स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा जे काही तुमच्या मनात गैरसमज निर्माण झाले असतील ते सोडविण्याचा प्रयत्न करा. पण बोलताना ही गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या मित्रमैत्रिणीवर कोणताही आरोप तुम्ही करू नका अथवा रागाने त्यांच्याशी बोलू नका. यामुळे तुमची मैत्री खराब होऊ शकते. तुमचे मुद्दे व्यवस्थित त्यांना सांगा आणि त्यावर त्यांचे काय म्हणणे आहे तेदेखील व्यवस्थित ऐकून घ्या. तुम्हाला जे वाटत आहे असं काहीही नसण्याचीदेखील शक्यता असू शकते. आपल्या बेस्ट फ्रेंडवर सतत अधिकार गाजविण्यापेक्षा त्यांच्यासह आयुष्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न अधिक करा.
ईर्ष्या वाटणं हे स्वाभाविक आहे मात्र त्याचा तुमच्या मनावर अधिक परिणाम होऊ देऊ नका आणि वेळीच तुम्हाला याची जाणीव झाल्यावर थांबविण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमच्या मैत्रीवर याचा परिणाम होणार नाही.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक