लहान मुलांमध्ये आजकल चिडचिड, उगाच हट्ट करणे, एकलकोंडेपणा अशा समस्या अधिक जाणवू लागल्या आहेत. अशी लक्षणं त्याच्या भावनिक जीवनात चढ-उतार असण्याचे संकेत आहेत. लहान मुलं असो वा मोठी माणसं जेव्हा तुमच्या मनात विचारांचा, भावनांचा कल्लोळ असतो तेव्हा तो तुमच्या वागण्या-बोलण्यातून जाणवू लागतो. अशा स्थितीत तुमच्या मानसिक स्थितीचे परिणाम तुमच्या शारीरिक आरोग्यावरही होऊ लागतात. विषेश म्हणजे मोठ्याप्रमाणेच लहान मुलांमध्येही अशी लक्षणं सध्या मोठ्या प्रमाणावर जाणवत आहेत. मुलांच्या या भावनिक अवस्थेमागे अनेक कारणं अशू शकतात. मात्र त्याचा परिणाम त्यांच्या मनावर लहानपणीच खोलवर होतो. जर याबाबत पालकांनी योग्य ती दखल वेळीच घेतली नाही तर मुले मानसिक रूग्ण होऊ शकतात. यासाठीच पालकांनी वेळीच मुलांच्या मानसिक स्थितीकडेही लक्ष द्यायला हवं. तज्ञ्जांच्या सल्लानुसार पालकांना बऱ्याचदा जाणवत असतं की मुलांना मेंटल हेल्थ अथवा मानसिक थेरपीची गरज आहे का, मात्र त्यांच्या मनाला ही गोष्ट सहज पटत नाही. यासाठीच जाणून घ्या अशी कोणत्या गोष्टी आहेत जेव्हा तुमच्या लहान मुलांना समुपदेशनाची गरज असू शकते.
आत्मविश्वास कमी असेल
लहान मुलांना भविष्यात निरनिराश्या परिस्थितींचा सामना करावा लागणार असतो. आजकालच्या स्पर्धेच्या युगात अभ्यासाप्रमाणेच त्यांना इतर अॅक्टिव्हिटीजमध्येही अव्वल व्हायचं असतं. मात्र जर दैनंदिन गोष्टी करण्यामध्येही तुमच्या मुलांचा आत्मविश्वास कमी झाला आहे असं तुम्हाला वाटत असेल तर ही नक्कीच चिंतेची बाब आहे. कारण मुलं जेव्हा एखाद्या ताणाखाली असतात तेव्हा त्यांच्यामधील आत्मविश्वास कमी होतो. त्यांना इतर मुलांपेक्षा आपण कुठेतरी कमी आहोत असं वाटू लागतं. यासाठीच या गोष्टीकडे पालकांनी वेळीच लक्ष द्यायला हवं.
भविष्याबाबत नकारात्मक बोलत असतील
मुलांचे आयुष्य हे खरं तर आज उद्याची चिंता न करता आनंदाने जगावे असे असते. मात्र अशा स्वच्छंदी जगातही मुलांच्या मनात भविष्याबाबत चिंता अथवा नकारात्मक विचार असतील तर वेळीच सावध व्हा. परिक्षा, स्पर्धा अथवा मोठं झाल्यावर कोण होणार याची उत्तरे ती नकारात्मक देत असतील तर त्यांचा दृष्टीकोण बदलण्यााठी त्यांना समुपदेशनाची गरज आहे हे ओळखा. कारण त्यांच्या या विचार आणि स्वभावाचा त्यांच्या भविष्यावर नक्कीच परिणाम होऊ शकतो.
सतत निराश आणि उदास राहत असतील
जी माणसं नैराश्याच्या अधीन जातात त्यांच्यामध्ये निराशा आणि उदासिनता आढळते. कारण अशा लोकांना ती जीवनात सर्व गोष्टीत हरली आहेत अशी भावना मनात असते. एखाद्या स्पर्धा अथवा परीक्षेआधी जर तुमची मुलं आधीच मी हरेन अथवा नापास होईन असं बोलत असतील. तर तुमची मुलं डिप्रेशनमध्ये आहेत हे तुम्हाला मान्य करावं लागेल. त्यांच्या मनात असा विचार सतत येत राहिला तर त्यांचे मानसिक आरोग्य पूर्ण बिघडू शकतं. यासाठीच वेळीच त्यांना मदत करा आणि यातून सुखरूप बाहेर काढा.
भुक कमी झाली असेल
मुले सतत खेळत आणि मस्ती करत असतात. त्यामुळे मोठ्यांपेक्षा त्यांना जास्त भुक लागत असते. ज्यामुळे सतत मुलांना काहीतरी छान खाऊ हवा असतो. नको असलेला पदार्थ पाहिल्यावर अथवा असंच कधीतरी भुक न लागणं ही एक सामान्य गोष्ट आहे. मात्र जर तुमच्या मुलांना वारंवार भुक कमी लागत असेल अथवा जेवणाकडे त्यांचं पूर्ण दुर्लक्ष होत असेल तर याबाबत तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. कारण बऱ्याचा याचा सबंध मानसिक स्थितीशी निगडित असू शकतो. मानसिक स्थिती योग्य नसेल तर भुकेवर परिणाम होतो. अशा वेळी तुमच्या मुलांची मानसिक स्थिती सुधारण्यासाठी तुम्हाला थेरपीची गरज लागू शकते.
चांगली झोप येत नसेल
मोठ्यांपेक्षा लहान मुलं पटकन आणि जास्त वेळ झोपतात. सकाळी लवकर उठायला मुलांना अजिबात आवडत नाही. मात्र गेले काही दिवस तुमची मुलं कमी झोपत असतील तर हा चिंतेचा विषय असू शकतो. रात्री घाबरून उठणे, सतत वाईट स्वप्न पडणे, झोपण्याची भिती वाटणे ही नैराश्याची लक्षणे आहेत. जर तुमच्या मुलांना असा त्रास होत असेल तर त्यांना जबरदस्ती झोपवण्यापेक्षा त्यांना लवकरात लवकर थेरपी द्या.
फोटोसौजन्य –
अधिक वाचा –
लहान मुलांना वाचनाची गोडी कशी लावाल
ब्रेकअपमधून बाहेर पडण्यासाठी तुमच्या किशोरवयीन मुलांना अशी करा मदत