आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात आपला रक्तदाब नियंत्रणात ठेवणे फारच कठीण आहे. केवळ धावपळीचं आयुष्यच नाही तर आपलं खाणंपिणंही अत्यंत चुकीचे असते. यामुळे उच्च रक्तदाब (High Blood Pressure) आणि लो ब्लड प्रेशर (Low Blood Pressure) असे दोन्ही आजार अनेकदा आता तरूणाईमध्येही आढळून येत आहेत. सहसा उच्च रक्तदाबाचा त्रास तरूणाईमध्ये जास्त दिसून येत आहे. यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक याचे प्रमाणही अधिक वाढले आहे. पण तुम्ही योग्य आहार घेतलात तर मात्र या आजारापासून तुमची सुटका होऊ शकते. अधिकांश लोकांना भात खाणे अधिक आवडते. पण वजनवाढीच्या भीतीने भात कमी केला जातो. मात्र तुम्हाला माहीत आहे का? रक्तदाबाचा त्रास असलेल्या रूग्णांनी कोणता तांदूळ खावा? तुम्हाला खायचा असेल तर योग्य तांदूळ निवडावा. याबाबत आम्ही अधिक माहिती या लेखातून घेऊन आलो आहोत. तुम्हीही या माहितीचा वापर करून आपल्या शरीराची योग्य ती काळजी घ्या.
रक्तदाबासाठी कोणता तांदूळ योग्य?
ज्या व्यक्तींना रक्तदाब आहे त्यांनी आठवड्यातून एकच वेळा पांढऱ्या तांदळाचा भात खावा. तर आपल्या आहारात या व्यक्तींनी ब्राऊन राईस (Brown Rice) समाविष्ट करून घेणे अतिशय चांगले ठरते. ब्राऊन राईसचे अनेक फायदे आहेत. तर या ब्राऊन राईसमध्ये मिनरल, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम याचे प्रमाण अधिक आहे. दरम्यान अभ्यासानुसार, ज्या पदार्थांमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते, ते शरीरामधून विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास अधिक मदत करतात. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. पांढरा भात खाल्ल्यामुळे ग्लुकोजची पातळी वाढते आणि रक्तदाब वाढतो. त्यामुळे रक्तदाबाची समस्या असणाऱ्या रूग्णांनी सहसा पांढऱ्या तांदळाचा भात खाणे टाळावे आणि ब्राऊन राईस खाण्याचा सल्ला देण्यात येतो.
ब्राऊन राईस आणि पांढरा तांदूळ फरक
तांदळामध्ये कार्ब्स आणि प्रोटीन आढळते. मात्र यामध्ये फॅटचे प्रमाण नसते. ब्राऊन राईसमध्ये धान्याची पोषक तत्वे आढळतात. वास्तविक ब्राऊन राईस शिजायला थोडा अधिक वेळ लागतो कारण याचे तांदूळ अधिक कडक असतात. तर पांढऱ्या तांदळावरून चोकर आणि जर्म्स काढून टाकण्यात येते. ज्यामध्ये अधिक पौष्टिक तत्व असतात. पण हे तांदूळ पटकन शिजतात. असं असेल तरीही ब्राऊन राईसमध्ये पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत अधिक पौष्टिक तत्व आढळतात.
ब्राऊन राईस खाण्याचे फायदे
- ब्राऊन राईसमध्ये मॅग्नेशियम आणि फायबरचे अधिक प्रमाण असते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत मिळते
- ब्राऊन राईसच्या सेवनामुळे हृदयसंबिधित आजाराचा धोका कमी होतो
- ब्राऊन राईसमध्ये अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे शरीरावर सूज येत नाही अथवा आल्यास, पटकन कमी होते
- तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही पांढऱ्या तांदळाऐवजी ब्राऊन राईसचा समावेश आहारात करून घ्या
रक्तदाब नियंत्रणात आणण्याची पद्धत
- तुम्हाला तुमचा रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही जास्वंदीच्या फुलाचा चहा बनवून प्यावा
- सकाळी रिकाम्या पोटी अर्धा चमचा धने पावडर खावी. यामुळे रक्तदाब नियंत्रणात येतो
- तुम्हाला हवं असेल तर झोपण्याच्या आधी तुम्ही अर्धा चमचा अश्वगंधा पावडर खावी. अथवा तुम्ही भाजलेली जिरा पावडरही खाऊ शकता. यामुळे रक्तदाब नियंत्रणात येण्यास मदत मिळते
रक्तदाबाचा त्रास असल्यास तुम्ही नक्की ब्राऊन राईस खावा. याचे फायदे आणि रक्तदाब कसा नियंत्रणात आणायचा हे आम्ही तुम्हाला सांगितले आहे. लेख आवडल्यास शेअर करायला विसरू नका.