‘सुंदरा मनामध्ये भरली’ (Sundara Manamadhe Bharli) ही मालिका वेगळ्या विषयामुळे आणि लतिका आणि अभ्या यांच्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या आवडीची मालिका होती. पण आता मालिकेत अचानक काही बदल झाले आहेत. मालिकेतील कामिनी हे पात्र अचानक गायब झाले आणि जेव्हा कामिनी परत आली तेव्हा ती भूमिका करणारी अभिनेत्रीच बदलली होती. पण हा बदल पचवणे प्रेक्षकांना सोपे नक्कीच नसते. कारण अनेक मालिकांमध्ये जेव्हा भूमिका करणाऱ्या अभिनेते आणि अभिनेत्री बदलण्यात येतात तेव्हा त्यांना लगेच स्वीकारणे प्रेक्षकांना शक्य नसते. कोणत्या परिस्थितीमध्ये हा बदल करण्यात येतो याचा विचार करण्याइतपत आणि मालिकांमध्ये बदल होताना काहीतरी लॉजिक (Logic) असावे याबाबत आता प्रेक्षकही जागरूक झाले आहे. पण प्रश्न असो पडतो की, कोणत्याही मालिकेत जेव्हा नायक वा नायिकांच्या पात्रामध्ये बदल होणार असतो तेव्हा केवळ प्लास्टिक सर्जरीचाच वापर केला जातो. पण त्यामागे काहीतरी लॉजिक असणेही गरजेचे नाही का?
प्लास्टिक सर्जरी झाल्यानंतर सर्वच कसे बदलते?
आताची जनरेशन मालिका पाहत असली तरीही खूपच स्मार्ट आहे. मालिकांमध्ये जेव्हा भूमिका करणारे चेहरे बदलतात तेव्हा त्यामागे त्यांची काही वैयक्तिक कारणे असतात अथवा काही वेळा प्रॉडक्शन हाऊसशी न पटल्याने अथवा नवे प्रोजेक्ट मिळाल्याने त्यांना ती मालिका सोडावी लागते. पण तोपर्यंत त्या अभिनेत्याने वा अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवलेली असते. त्यामुळे दुसऱ्या व्यक्तींना स्वीकारणे प्रेक्षकांनाही सहज शक्य नसते. पण असं असतानाही प्लास्टिक सर्जरी हा एकच पर्याय मालिकांमध्ये का दाखविण्यात येतो असाही प्रश्न निर्माण होतो. पात्र बदलत असताना ज्या भागापासून अभिनेता वा अभिनेत्री बदलणार आहे याची पूर्वसूचना देऊन अथवा सांगूनही तुम्ही प्रेक्षकांचे मन जिंकू शकता. कारण अशा पद्धतीने प्लास्टिक सर्जरी (Plastic Surgery) हा एकच पर्याय दाखवून तुम्ही प्रेक्षकांचीही फसवणूक करत असता हे आजपर्यंत मालिकेच्या निर्मात्यांच्या लक्षात आले नाही का?
प्लास्टिक सर्जरी हा पर्याय जरी स्वीकारला तरीही प्लास्टिक सर्जरी झाल्यानंतर व्यक्तीचा चेहरा बदलू शकतो. त्या व्यक्तीचा आवाज, उंची, रूंदी, चालण्याची ढब सगळ्याच गोष्टी कशा काय बदलतील? असा प्रश्न निर्माण होणे साहजिकच आहे. मग हे प्रेक्षकांच्या बुद्धीला पटेलच असं का गृहीत धरलं जातं. त्यामुळे चांगल्या टीआरपी मिळविणाऱ्या मालिकांनाही यामुळे गाशा गुंडाळावा लागतो. याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे ‘क्यूकीं सास भी कभी बहू थी’. या मालिकेत मिहीरची व्यक्तीरेखा बदलल्यानंतर ते स्वीकारणे प्रेक्षकांना खूपच कठीण गेले होते. त्यावेळी त्या मालिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरले होते. मात्र अचानक टीआरपी कमी होऊ लागला.
प्रेक्षकांना पचेल असे दाखवा
मनोरंजन व्हावे आणि काहीतरी वेगळे दिसावे, वेगळे असावे यासाठी प्रेक्षक मालिका बघत असतो. काहीवेळा प्रेक्षकांच्या बुद्धीलाही पटत नाही अशा गोष्टी दाखविण्यात येतात. पण मनोरंजनाचा एक भाग म्हणून याकडे दुर्लक्ष केले जाते. पण प्लास्टिक सर्जरी असे दाखवून संपूर्ण माणसाला बदलून टाकणे आता कुठेतरी मालिकांमध्ये थांबायला हवे. प्रेक्षकांना पचेल आणि त्यांच्या बुद्धीला पटेल असे दाखविणे गरजेचे आहे. अन्यथा लवकरच मालिकांना आपला गाशा गुंडाळावा लागेल अथवा टीआरपी कमी मिळेल हे सांगण्याची गरज नाही.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक