ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
why-audio-story-platforms-are-getting-more-response-where-to-listen-in-marathi

ऑडिओ स्टोरी प्लॅटफॉर्म्सला का मिळतोय भरघोस प्रतिसाद, कुठे ऐकाल

गोष्ट कुणाला आवडत नाही? अगदी लहानपणापासून आजी – आजोबा यांच्या मागे लागून गोष्टी ऐकणे हा तर मुलांचा आवडता छंद. पण सध्या गॅझेटच्या या जगात एकमेकांना वेळ देणंही जमत नाहीये. याशिवाय धावपळीच्या जगात पुस्तकं वाचणंही मागे पडलं आहे. पण तुम्हाला वाचायला वेळ नसला तरीही गोष्टी ऐकणं अथवा एखाद्या नव्या पुस्तकाबाबत जाणून घेणं यासारख्या गोष्टींची आवड असेल तर ती जपण्यासाठी ऑडिओ प्लॅटफॉर्म्स (Audio Platforms) हा उत्तम पर्याय निर्माण झाला आहे. तुम्हाला तुमचा वेळ वाचवायचा असेल आणि गोष्टी ऐकायच्या असतील अथवा तुम्हाला पुस्तकांबाबत जाणून घ्यायचे असेल तर हे साधन अतिशय उत्तम आहे. आता हे स्टोरी प्लॅटफॉर्म्स लोकांच्या पसंतीला यासाठी उतरत आहेत, कारण तुमच्या मातृभाषेमध्ये वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला ऐकता येतात. मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, तामिळ, तेलुगू अशा विविध भाषांमध्ये हे प्लॅटफॉर्म्स आहेत. तर याशिवाय विविध तुमच्या आवडत्या कलाकारांच्या आवाजात या गोष्टींचे रेकॉर्डिंगदेखील करण्यात आल्यामुळे याला एक वेगळाच साज चढतो. आवाजाच्या चढउतारात या गोष्टी ऐकण्यात एक वेगळीच मजा असते आणि त्यामुळेच Audio Story Platform हा अधिक वाढताना दिसून येत आहे. यामध्ये पॉडकास्ट (Podcast) हादेखील प्रकार दिसून येतो. मासिक शुल्क आकारले गेले तरीही असे प्लॅटफॉर्म उपयोगीच ठरतात. अशाच काही प्लॅटफॉर्म्सविषयी आपण जाणून घेऊ. 

कुकू एफएम (Kuku FM) 

सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनेकदा ऑडिओ ऐकण्यासाठी तो व्यवस्थित अपलोड होण्याची गरज असते. कुकू एफएम हा असाच उत्तम दर्जाचा ऑडिओ स्टोरी प्लॅटफॉर्म आहे. अत्यंत सहजतेने ऑडिओ अपलोड होत असून इथे अनेकांना आपल्या स्टोरी क्रिएटदेखील करता येतात. नुकताच 1 कोटी रसिकांचा पल्ला गाठलेल्या या प्लॅटफॉर्मवर हिंदी, मराठी, गुजराती, बांगला अशा विविध भाषांमध्ये गोष्टी ऐकता येतात. इतकंच नाही तर वेगवेगळे पॉडकास्ट शो ऐकू शकता. याशिवाय तुम्ही लिहिलेल्या तुमच्या गोष्टीही याठिकाणी इतर प्रेक्षकांसह शेअर करू शकता. जेणेकरून तुमच्या कलागुणांनाही या प्लॅटफॉर्मवर वाव देण्यात येतो आणि त्यामुळेच असे ऑडिओ स्टोरी प्लॅटफॉर्म्स अधिक प्रसिद्ध होत आहेत. सामान्य रसिकांच्या कलागुणांना मिळणारा वाव आणि नवनव्या गोष्टींचा नजराणा हेच भरघोस प्रतिसाद मिळण्याचे महत्त्वाचे कारण आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 

Website: https://kukufm.com/ 

स्टोरीटेल (Storytell)

दर्जेदार मराठी कथा आणि गोष्टी ऐकण्यासाठी स्टोरीटेल हे अत्यंत उपयुक्त ऑडिओ स्टोरी प्लॅटफॉर्म आहे. अनेक कलाकारांचे आवाज वेगवेगळ्या गोष्टींसाठीही वापरण्यात आले आहेत. तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्यांना घरी येऊन पुस्तके वाचण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यांच्यासाठी हे उत्तम प्लॅटफॉर्म आहे. पुस्तक वाचण्यासाठी वेळ नसल्यास, तुम्हाला स्टोरीटेलवर मराठी पुस्तके केवळ वाचताच नाही तर ऐकताही येतात. यामध्ये अनेक प्रसिद्ध आणि लोकप्रिय अशा पुस्तकांचा खजिनाच दडलेला आहे. येथे मराठीशिवाय अनेक भाषांमधील पुस्तके असून मासिक शुल्क आकारण्यात येते. तुम्ही यावर तुम्हाला हवी तितकी पुस्तके ऐकू शकता, टॉक शो, पॉडकास्टदेखील ऐकू शकता. 

ADVERTISEMENT

Website: https://www.storytel.com/ 

प्रतिलिपी एफएम (Pratilipi FM)

मराठी भाषेत काहीतरी चांगले ऐकण्यासाठी या ऑडिओ स्टोरी प्लॅटफॉर्मचा संदर्भ तुम्ही घेऊ शकता. नवोदित लेखकांनी लिहिलेल्या त्यांच्या कथा, लघुकथा, कविता यांचा संग्रह यावर आहे. याशिवाय तुम्ही कॉमिक्सचे चाहते असाल तर तुम्हाला त्यासाठीही पर्याय इथे उपलब्ध होतात. मोबाईलवर सहजासहजी असे अॅप उपलब्ध असल्यामुळे रसिकांनाही हा पर्याय आपलासा वाटू लागला आहे. प्रवासात येता जाता सहज तुम्ही तुमच्या भाषेतील तुमच्या आवडीच्या कथा ऐकू शकता. याशिवाय तुम्ही यामध्ये सहभागीही होऊ शकता. 

Website: https://www.pratilipi.com/

पॉकेट एफएम (Pocket FM) 

ऑडिओ बुक्स, पॉडकास्ट, एफएम रेडिओ, लाईव्ह रेडिओ अथवा रेडिओ शो, कथा यामध्ये तुम्हाला रस असेल तर तुम्ही या ऑडिओ स्टोरी प्लॅटफॉर्मचा उपयोग करून घेऊ शकता. यामध्ये 12 हजारपेक्षा अधिक कथा तुम्ही ऐकू शकता.  

ADVERTISEMENT

Website: https://www.pocketfm.com/ 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

20 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT