हिवाळा सुरू झाला की त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसू लागते. वातावरणात झालेल्या बदलावर मात करण्यासाठी आणि त्वचेची निगा राखण्यासाठी मग आपण बॉडीलोशन, मॉईस्चराईझिंग क्रिम सज्ज ठेवतो. ज्यामुळे त्वचा जास्तीत जास्त हायड्रेट आणि मऊ राहते. सकाळी अंघोळ केल्यावर संपूर्ण शरीराला मॉईस्चराईझ करण्यासाठी बॉडी लोशन अतिशय महत्वाचे असते. ज्यामुळे या काळात स्किन केअरमध्ये याचा समावेश आवर्जून केला जातो. मात्र बॉडीलोशन चुकूनही चेहऱ्यावर वापरू नये हे तुम्हाला माहीत आहे का ? नसेल तर ही माहिती तुमच्या नक्कीच फायद्याची आहे त्यामुळे जाणिवपूर्वक वाचा.
Shutterstock
बॉडी लोशन का लावू नये चेहऱ्याला –
हिवाळ्याच्या दिवसात त्वचा मऊ ठेवण्यासाठी सकाळी आणि रात्री झोपताना बॉडीलोशनचा वापर नियमित केला जातो. मात्र अनेक जण बॉडीलोशन मॉईस्चराईझिंग क्रिमप्रमाणे चेहऱ्यावरही लावतात. बॉडीलोशन चेहऱ्यावर लावल्यामुळे चेहऱ्यावरची त्वचादेखील मऊ होईल असं त्यांना वाटत असतं. मात्र असं मुळीच करू नका कारण बॉडीलोशन आणि फेस क्रिम हे एकसारखे नसतात. बॉडीलोशन चेहऱ्यावर लावू नये याचं महत्त्वाचं कारण तुमच्या चेहऱ्याची त्वचा ही शरीराच्या इतर भागातील त्वचेच्या मानाने खूप नाजूक आणि संवेदनशील असते. कारम शरीरावरच्या त्वचापेशींची पूर्ननिर्मिती संथगतीने होते तर चेहऱ्यावरील त्वचापेशी सतत निर्माण होत असतात. ज्यामुळे शरीरावरच्या इतर भागाची त्वचा जाड आणि कमी नाजूक असते. चेहऱ्यावर लावण्यात येणारे फेस क्रिम या गोष्टी लक्षात ठेवून तयार केलेले असतात. बॉडी लोशन शरीरावरच्या इतर त्वचेत पटकन मुरतील अशा पद्धतीने निर्माण केले जातात. यासाठी चेहऱ्यावर फेस क्रिम आणि शरीरावर बॉडीलोशन लावल्यास नक्कीच चांगला फायदा होतो.
Shutterstock
चेहऱ्यावर बॉडीलोशन लावण्यामुळे काय नुकसान होते –
जर तुम्ही चुकून अथवा माहीत नसल्यामुळे चेहऱ्यावर बॉडीलोशन लावले तर तुमच्या चेहऱ्यावरच्या त्वचेचं नुकसान होऊ शकतं. कारण बॉडी लोशन घट्ट असतं त्यामुळे ते चेहऱ्यावरच्या त्वचेत पटकन मुरत नाही. सहाजिकच चेहऱ्यावर बॉडीलोशनचा जाड थर बराच काळ तसाच राहतो. त्वचेवर पसरलेल्या बॉडीलोशनमुळे त्वचेचे पोअर्स बंद होतात आणि त्यावर चिकटपणामुळे धुळ, माती, प्रदूषण अडकून राहते. अस्वच्छतेमुळे पिंपल्स अथवा अॅलर्जी येण्याची शक्यता वाढते. पोअर्स बंद झाल्यामुळे त्वचेला ऑक्सिजनचा पूरवठी कमी होतो. त्याचप्रमाणे बॉडीलोशनध्ये असलेले हार्श केमिकल्स तुमच्या चेहऱ्यावरच्या नाजूक त्वचेला सहन न झाल्यामुळे तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेचं नुकसान होऊ लागतं. बऱ्याचदा बॉडीलोशनला सुंगध आणि रंगीत करण्यासाठी कुत्रिम रसायनांचा वापर करण्यात आलेला असतो. ज्यामुळे तुमचा चेहरा लालसर आणि खराब होण्याची शक्यता असते. यासाठीच बॉडी लोशन लावताना ही काळजी अवश्य घ्या की ते तुमच्या चेहऱ्याला लावणे योग्य नाही. बाजारात विविध प्रकारचे बॉडीलोशन आणि मॉईस्चराईझिंग फेस क्रिम मिळतात. कोणतेही ब्युटी प्रॉडक्ट खरेदी करण्यापूर्वी आणि त्वचेवर लावण्यापूर्वी ते तुमच्या त्वचेसाठी योग्य आहे का आणि त्यामध्ये कोणकोणते घटक आहेत हे अवश्य तपासा.
या हिवाळ्यात त्वचेचं कोरडेपणापासून रक्षण करण्यासाठी मायग्लॅमचे स्किन केअर प्रॉडक्ट तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता.
फोटोसौजन्य – शटरस्टॉक
फेस शीट मास्क वापरण्यासाठी स्टेप बाय स्टेप टिप्स