ADVERTISEMENT
home / आरोग्य
why curd should avoid in rainy season

जाणून घ्या पावसाळ्यात का खाऊ नये दही, काय होतो शरीरावर परिणाम

दह्यामध्ये  प्रोटिन्स, कॅल्शिअम भरपूर असतात. त्यामुळे दही खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र सध्या पावसाळा सुरू आहे. आयुर्वेदात पावसाळ्यात दही खाणे योग्य नसल्याचं सांगण्यात आलं आहे. या काळात दही खाण्यामुळे आजारपण येऊ शकतं. यामागचं कारण असं की, या काळात दह्यामधून जिवाणू शरीरात प्रवेश करतात. ज्यामुळे शरीराला एखादे इनफेक्शन पटकन होण्याचा धोका वाढतो. वातावरणातील बदलांमुळे या काळात सर्दी, खोकला आणि ताप येण्याची शक्यता असते. दह्यामुळे या इनफेक्शनला पोषक वातावरण निर्माण होते. यासाठी या काळात दही खाणे टाळावे.

पावसाळ्यात का टाळावे दही

पावसाळ्यात दही खाणे टाळणे आरोग्यासाठी उत्तम असते. कारण दही खाण्यामुळे अनेक आरोग्स समस्या निर्माण होतात.

why curd should avoid in rainy season

दह्यामुळे खोकला होण्याचा धोका –

पावसाळ्यात गळ्याचे आणि छातीचे इनफेक्शन लगेच होण्याचा धोका असतो. कारण यासाठी वातावरण पोषक असते. जेव्हा तुम्ही दही खाता तेव्हा थोडावेळ तुमच्या घशाला अस्वस्थ वाटते. याचं कारण दही हा एक थंड पदार्थ आहे शिवाय त्यामध्ये शरीरासाठी पोषक जिवाणू असतात. जर तुमचा घसा खवखवत असेल अशा काळात तुम्ही दही खाल्लं तर इनफ्केशन वाढून तुम्हाला खोकला होऊ शकतो.

दह्यामुळे बिघडू शकते पचनसंस्था –

पावसाळ्यात नेहमी गरम पाणी, गरम अन्नपदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण थंड पदार्थांमधून इनफेक्शन वाढू शकते. दही बनवण्यासाठी वापरण्यात येणारे पदार्थ म्हणजे दूध आणि विरजणाचे दही दूषित असेल तर तयार होणाऱ्या दह्यामधून तुम्हाला त्रास होण्याची शक्यता असते. अशा प्रकारचे दूषित दही खाण्यामुळे अथवा खूप दिवसाचे आंबट दही  खाण्यामुळे तुमच्या पचनसंस्थेवर परिणाम होतो. 

ADVERTISEMENT

दह्यामुळे सांधेदुखीचा त्रास

दही खाण्यामुळे अंगदुखी अथवा सांधेदुखी झाल्याची समस्या  तुम्ही नक्कीच अनुभवली असेल. पण असा त्रास फक्त पावसाळ्यात दही खाण्यामुळे होतो. कारण दही हा थंड पदार्थ आहे. असे पदार्थ थंड वातावरणात खाण्यामुळे सांध्यामध्ये दुखणे वाढते. पावसाळ्यात अती थंड वातावरण असताना वात प्रवृत्ती वाढण्याची  शक्यता असते.यासाठी खास करून या काळात दही मुळीच खाऊ नये. 

या  आणि अशा अनेक कारणांसाठी पावसाळ्यात दही न खाण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो. मात्र याचा अर्थ दही खाऊच नये असा नाही. उन्हाळ्यात तुम्ही नियमित दही खाऊ शकता. शिवाय पावसाळ्यात दही खायचे असल्यास ताजे दही अथवा ताजे ताक प्या. जास्त दिवसांचे अथवा आंबट दही खाणे टाळा ज्यामुळे आजारपण येण्याचा धोका नक्कीच टाळता येईल. 

जाणून घ्या फ्रीजमध्ये ठेवलेलं अन्न किती वेळ असते फ्रेश

टोमॅटोसोबत कधीच खाऊ नये काकडी, जाणून घ्या कारण

ADVERTISEMENT

नाश्त्यामध्ये बनवा अक्की रोटी, नाही लागणार अन्य पदार्थांची गरज

11 Aug 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT