केसातील कोंडा हा असा त्रास आहे जो काही केल्या जात नाही. खूप जणांना इतका कोंडा असतो की, त्यावर तुम्ही कितीही स्पा करा किंवा कोणत्याही हेअर ट्रिटमेंट त्याचा त्यांच्यावर काहीही परिणाम होत नाही. तुम्हालाही असा कोंडा सतत होत असेल तर तुम्ही काही रोजच्या गोष्टी टाळायल्या हव्यात. केसांसंदर्भात काही गोष्टी तुम्ही बदलल्या की हा सतत होणाऱ्या कोंड्याचा त्रास बऱ्याच प्रमाणात कमी किंवा आटोक्यात येऊ शकतो. चला जाणून घेऊया तुम्ही नेमके काय बदल करायला हवे ते.
केसांचा शॅम्पू बदला
केसांना वापरला जाणारा शॅम्पू हा केसांसाठी खूप मोठी भूमिका बजावत असतो. एखाद्या शॅम्पूने तुम्हाला कोंडा झाला असे निदर्शनात येत असेल तर तुम्ही तो शॅम्पू लगेचच बदला कारण त्यामुळे हा त्रास आणखी वाढण्याची शक्यता असते. केसांसाठी शॅम्पू वापरताना केस कसेही असले तरी देखील तो माईल्ड असायला हवा. इतकेच नाही तर त्याचा वापर देखील कळायला हवा. खूप जण शॅम्पू वापरताना तो इतका लावतात की, त्यामुळे तो स्काल्पवरुन जात नाही. याचा परिणाम असा होतो की, त्याचे रुपांतर स्काल्पला चिकटून कोंड्यात म्हणजेच ड्राय स्काल्पमध्ये होऊ लागते. ज्याचा त्रास तुम्हाला नक्कीच होऊ शकतो.
केसांवर नेमकं किती लावावं हेअर प्रॉडक्ट
केसांचा कंगवा धुवा
केसांसाठी तुम्ही जो कंगवा वापरता तो तुम्ही किती वेळा स्वच्छ करता. केसांच्या कंगव्यासारखी घाणेरडी होणारी कोणतीही वस्तू नाही याचे कारण असे की, ब्रश किंवा कंगवा आपण सतत वापरत असतो. तुम्ही जितके वेळा केस विंचरता तितके वेळा केसांची घाण ही कंगव्याला चिकटते आणि कंगवा काळा होऊ लागतो. खूप जण कंगवा धुण्याचा चांगलाच कंटाळा करतात. त्यामुळे होते असे की, केसांची घाण सतत जाऊन स्काल्पमध्ये घाण बसते. त्यामुळेही तुम्हाला कोंड्याचा त्रास होऊ शकतो.
केसांची अति काळजी
खूप जण केसांची जरा जास्तीच काळजी घेतात. म्हणजे केसांची काळजी घेणे चांगले पण केसांची अति काळजी म्हणजे सतत हेअर ट्रिटमेंट करत राहणे. काही जणांना काही कालावधीनंतर हेअर स्पा किंवा काही कऱण्याची सवय असते. ही सवय चांगली. पण ज्यावेळी तुम्ही हे सगळं सतत करत राहता त्यामुळे त्याचा परिणाम असा होतो की, तुमचे केस त्यामुळे नाजूक होऊ लागतात. केसांच्या आत स्काल्पमध्ये जाऊन प्रॉडक्ट बसते. तुम्ही कधी स्पा केल्यानंतर केस नीट पाहिले आहेत का? नसतील पाहिले तर नीट बघा कारण ज्यावेळी तुम्हाला स्पा करुन दोन ते तीन दिवस उलटून जातात. त्यावेळी केस हे चिकट आणि स्काल्पला खरपुड्या आलेल्या दिसतात. असे तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही केसांची अति काळजी करणे सोडा. साधा हेअर वॉश करुन तुम्ही केस चांगले वाळवून घ्या. त्यामुळेही केस चांगले राहतील. केसांना होणाऱा कोंड्याचा त्रास होणारही नाही.
आता सतत कोंडा होत असेल तर या गोष्टी नक्की लक्षात ठेवा.