ADVERTISEMENT
home / Care
Why dandruff gets worse in the winter and how to fight it in marathi

हिवाळ्यात का वाढतो केसातील कोंडा, जाणून घ्या उपाय

हिवाळा सुरू झाला की त्वचा कोरडी होते आणि त्वचेला खाजही येते. त्वचेसोबत केसांची त्वचा म्हणजेच स्काल्पही कोरडा होतो आणि केसांमध्ये कोंडा वाढू लागतो. केसांमधील कोंडा वाढला की केस गळतात आणि कमजोर होतात. यासाठी वेळीच कोंडा कमी करणं गरजेचं असतं. हिवाळ्यात केसांची जास्त काळजी घ्यावी लागते. कारण हिवाळ्यात केसांमध्ये कोंडा वाढण्याची शक्यता जास्त असते. जर हिवाळ्यात बदललेल्या हवामानानुसार केसांमध्ये कोंडा व्हायला नको असेल तर असे करा कोंड्यावर घरगुती उपाय, ज्यामुळे नाही होणार केसांत कोंडा

आयुर्वेदिक पद्धतीने घ्या केसांची काळजी (Ayurvedic Hair Care Tips In Marathi)

हिवाळ्यात केसांत कोंडा होऊ नये यासाठी उपाय

हिवाळ्यात केसांत कोंडा होण्याचे कारण हवेतील कोरडे पणा आणि अस्वच्छता असू शकते. यासाठी नियमित निगा राखल्यास तुमच्या केसांत कोंडा होणार नाही.

केस नियमित विंचरा 

केस विंचरल्यामुळे कंगव्यामधील अथवा हेअर ब्रशमधील टोकदार दात स्काल्पवरून फिरतात. ज्यामुळे तुमच्या केसांच्या खालील त्वचेचे योग्य रक्ताभिसरण होते. रक्ताभिसरण चांगले झाले की केसांना लावलेले प्रॉडक्ट अथवा तेल केसांच्या मुळांमध्ये व्यवस्थित जिरते. ज्यामुळे केसांचे योग्य पोषण होते आणि कोंडा होत नाही.

ADVERTISEMENT

भरपूर पाणी प्या 

हिवाळ्यात पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते. हवेत गारवा असल्यामुळे जास्त तहान लागत नाही. पण असं असलं तरी पाणी पुरेशा प्रमाणात प्यायला हवं. कारण त्यामुळे तुमची त्वचा हायड्रेट राहते आणि कोरडी पडत नाही. त्वचा कोरडी झाली नाही की तुमच्या केसांमध्ये कोंडाही होत नाही. 

केसांना हिट देऊ नका 

आजकाल हेअर स्टाईल करण्यासाठी बऱ्याचदा केसांवर ब्लो ड्रायर, स्ट्रेटनर फिरवलं जातं. या उपकरणांमधून केसांना उष्णता दिली जाते. ज्यामुळे तुम्हाला हवी तशी स्टाईल तुम्ही केसांवर करू शकता. मात्र त्यामुळे तुमचा स्काल्प कोरडा होतो. कोरड्या स्काल्पमध्ये कोंडा होण्याची शक्यता जास्त वाढते. 

केस सरळ करण्यासाठी घरगुती उपाय (Kes Saral Karnyasathi Upay)

टॉवेल बदला 

हिवाळा सुरू झाल्यावर तुमच्या केसांमध्ये कोंडा वाढला असेल. तर तुम्हाला तुमचा टॉवेल बदलण्याची गरज आहे. कारण जर तुमचा टर्किश टॉवेल खरखरीत झाला असेल तर त्यामुळे तुमचे केस कोरडे होऊन तुमच्या केसांमध्ये कोंडा वाढू शकतो. 

ADVERTISEMENT

आहारात बदल करा

केसांतील कोंडा कमी करण्याचा आणखी एक सोपा मार्ग म्हणजे आहारात बदल करा. जर तुम्ही आहारात व्हिटॅमिन बी, झिंक आणि ओमेगा थ्री असेल तर तुमच्या केसांचे योग्य पोषण होते. यासाठी आहारात फळं, कच्चे सलाड, अंडी, मासे, केळी यांचा समावेश करा.

केसांना तेल लावा

केसांना नियमित तेल लावण्यामुळेही केसांमधील कोंडा कमी होतो. तेलामुळे केसांना योग्य प्रमाणात पोषण मिळते. केसांसाठी नारळाचे तेल सर्वात उत्तम असते. पण तुम्ही केसांना बदामाचे तेल, ऑलिव्ह ऑईल, एरंडेल तेल पण लावू शकता. केसांना तेल लावून मसाज केला आणि केसांना स्टीम दिलं तर कोंडा नक्कीच कमी होतो. 

16 Dec 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT