हिवाळा सुरू झाला की रात्री उबदार कपडे घालून, शेकोटीजवळ बसून गप्पा मारण्याची मौजच निराळी असते. अशा मस्त थंडीत गरमगरम कॉफी, वाफाळता चहा अथवा गरम सूप पित एकमेकांसोबत गप्पा मारत तासनतास कसे जातात हे समजत नाही. या दिवसांमध्ये आणखी एक मजेशीर गोष्ट सर्वच करतात. ती म्हणजे तोंडातून गरम वाफ बाहेर काढत ती पाहत राहणं. लहान मुलांसाठी तर ही एक अतिशय मनोरंजक गोष्ट असते. प्रत्येकाने कधी ना कधी तरी या गोष्टीचा टाईमपास आयुष्यात नक्कीच केला असेल. पण असं करत असताना तुमच्या मनात कधी हा प्रश्न आलाय का, की थंडीत नेमकी तोंडातून गरम वाफ का बाहेर पडते… जाणून घ्या याचं कारण
चेहऱ्यावर वाफ घेण्याचे फायदे (Vaf Ghenyache Fayde In Marathi)
थंडीत का येते तोंडातून वाफ
थंडीत वातावरणातील तापमान कमी झालेलं असतं त्यामुळे कदाचित तोंडातून गरम वाफ बाहेर पडत असावी असा अनेकांचा अंदाज असतो. मात्र या गोष्टीचा वातावरणातील तापमानाशी तसा काहीच संबध नाही. कारण हवेत चांगल्या प्रमाणात बाष्प असतं. वास्तविक मानवी शरीर हे सत्तर टक्के पाण्याने तयार झालेलं आहे. आपली फुफ्फुसे श्वासोच्छ्वास करण्याचे काम करत असतात. जेव्हा आपल्या फुफ्फुसामध्ये हवा भरली जाते तेव्हा शरीरातील पाण्याचे बाष्पीभवन होते. आपल्या शारीरिक तापमानामुळे हा बदल होतो.
हिवाळ्यात चेहऱ्याची काळजी कशी घ्यावी | Winter Makeup Tips In Marathi
थंडीत तोंडावाटे का बाहेर पडते गरम वाफ
थंड हवेत बाष्प टिकत नाही मात्र गरम हवेत ते चांगले टिकू शकते. बाहेरील वातावरण थंड असले तरी शरीरातील तापमान उष्ण असते. त्यामुळे अशा वातावरणात शरीरात निर्माण झालेले बाष्प तुमच्या श्वासासकट पुन्हा बाहेर टाकले जाते. श्वासोच्छ्वास प्रक्रियेत शरीरात कार्बन डाय ऑक्साइड आणि पाण्याच्या एकत्र येण्याने त्याचे बाष्पीभवन होते. फुफ्फुसांमध्ये तयार झालेले बाष्प वाफ रूपाने तोंड आणि नाकातून बाहेर टाकले जाते. साधारणपणे जेव्हा बाहेरील वातावरण सात ते आठ डिग्रीवर जातं तेव्हाच तुमच्या तोंडातून गरम वाफ बाहेर पडते. याचा अर्थ या प्रोसेससाठी बाहेरील वातावरण योग्य प्रमाणात थंड असणं तितकंच गरजेचं असतं. पण वाफ मात्र तुमच्या शारीरिक तापमानामुळे निर्माण होते. त्यामुळे जेव्हा असं परफेक्ट वातावरण निर्माण होतं तेव्हा तोंडातून वाफ यायला सुरुवात होते.
सर्दी खोकला वर घरगुती उपाय (Cold And Cough Home Remedies In Marathi)