पावसाळा आणि मकाच्या आठवणी सगळ्यांच्याच असतील. घरी मका आणला की, तो मस्त भाजून किंवा उकडून तुम्हीही खाल्ले असतील. मका उकडून खाण्याची मजा एक वेगळीच असते. मका उकडताना कोवळा मका आणून त्यात हळद आणि मीठ घालून ते कुकरमध्ये उकडले जात होते. मका उकडल्यानंतर त्याचा रस पिण्याची मजा काहीतरी वेगळीच होती. मक्याचे ते पाणी पिणेही खूप जणांना आवडायचे पण हे झाले पांढऱ्या मक्याबद्दल. हल्ली बाजारात पांढरा मका हा जणू गायबच झाला आहे. पांढऱ्या मक्याची जागा आता वर्षभऱ मिळणाऱ्या पिवळ्या कार्नने घेतली आहे. त्यामुळे हल्ली पांढरे मके खायची इच्छा असूनही मिळत नाही.
बेबी कॉर्नचा आहारात असा करा समावेश होईल फायदा
पिवळ्या कॉर्नने घेतली जागा
पांढरे दाणे असलेले मक्यांची चव ही खूपच वेगळी आणि गोड असते. तर पिवळे कॉर्न हे देखील गोड लागतात. पण ते खाल्ल्यानंतर त्याचा चोथा हा अधिक राहतो. पिवळे कॉर्न हल्ली बाजारात सगळीकडे मिळू लागले आहेत. अमेरिकेचे हे मूळ पीक असून आता ते भारताचे देखील झाले आहे. पूर्वी काही ठराविक काळातच बाजारात मके यायचे. पांढऱ्या मक्याची शेतं असायची. पण पिवळे मके हे पिकवायला आणि त्याचे उत्पादन खूप जास्त येते. त्यामुळे बाजार मागणी करण्यासह ते सफल ठरते.म्हणूनच की काय हल्ली अनेकांनी पांढऱ्या मक्याची शेती सोडून पिवळ्या मक्याची शेती करायला घेतली आहे. अगदी कमीच ठिकाणी हल्ली पांढरे मके मिळतात. त्याहीपेक्षा ते अधिक महाग मिळतात.
मशरुम्स (Mushrooms)खाताय? जाणून घ्या फायदे- तोटे
पांढऱ्या मक्याची शेती
मका हे समशीतोष्ण आणि थंड हवामानात येणारे पीक आहे. पिकाच्या वाढीसाठी साधारण 25 ते 30 अंश सेल्शिअस असं वातावरण लागतं. याठिकाणीच मक्याची शेती ही उत्तम होते. ज्या ठिकाणी वातावरण याही पेक्षा थोडे सौम्य असते त्या ठिकाणी मका संपूर्ण वर्ष घेता येतो. नदीकाठचा गाळ हा या मक्यासाठी फारच फायद्याचा ठरतो.
पांढऱ्या मक्याचे फायदे
जर तुम्हाला खायला आवडत असेल तर तुम्ही त्याचे फायदेही जाणून घ्यायला हवेत. तुम्हाला मका कुठेही मिळाला तर त्याचे सेवन आवर्जून करायला हवा. चला जाणून घेऊया पांढऱ्या मक्याचे फायदे
- हाडांना बळकटी करण्यासाठी पांढरा मका हा फारच फायद्याचा ठरतो. त्यामुळे हाडांना मजबुती देण्यासाठी तुम्ही पांढऱ्या मक्याचे सेवन करा.
- कोलेस्ट्रॉल हे आरोग्यासाठी फारच हानीकारक असते. जर तुम्हाला कोलेस्ट्रॉलचा त्रास असेल तर तुम्ही मक्याचा आहारात समावेश करायला हवा.
- मक्यामध्ये व्हिटॅमिन्स आणि फायबर्स असतातत ज्यामुळे पोटाचे आरोग्य चांगले राहण्यासही मदत मिळते.
- मक्यामध्ये असलेले कार्बोहायड्रेट हे शरीराला उर्जा देण्याचे काम करतात. त्यामुळे आहारात याचा समावेश फायद्याचा ठरतो.
- मक्यामध्ये व्हिटॅमिन A आणि बीटा केरेटीन असतात ज्यामुळे दृष्टी सुधारण्यास मदत मिळते.
आता तुम्हाला पांढरा मका बाजारात दिसला तर त्याचा तुम्ही आहारात समावेश करायलाच हवा.
कानात उष्णतेची पुळी येत असेल तर करा सोपे उपाय