मागील दोन वर्षात कोरोनामुळे अचानक होत असलेल्या लॉकडाऊनमुळे पार्लर, स्पामध्ये जाणे फार कमी झाले आहे. महिलांना अंगावरील अनावश्यक केस काढण्यासाठी सतत पार्लरची वारी करावी लागते. मात्र सध्या पार्लरमध्ये जाणंच कमी झाल्यामुळे अनेकींनी यावर घरीच उपाय करणं सुरू केलं आहे. घरी वॅक्स करताना अनेक महिला केमिकलयुक्त वॅक्स ऐवजी नैसर्गिक पद्धतीने बनवलेल्या वॅक्सला जास्त पसंती देताना आढतात. नैसर्गिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या शूगर वॅक्सची लोकप्रियता सध्या इतकी वाढली आहे की लोक या वॅक्सला टिक-टॉक वॅक्स म्हणू लागले आहेत. यासाठीच जाणून घ्या काय आहे टिक-टॉक वॅक्स आणि त्याचे फायदे
टिक – टॉक वॅक्स लोकप्रिय होण्याची कारणे
टिक – टॉक वॅक्स म्हणजे फार पूर्वीपासून पारंपरिक पद्धतीने केलं जाणारे साखरेचे वॅक्स… सध्या या वॅक्सचा ट्रेंड वाढतोय कारण
- टिक – टॉक वॅक्स नैसर्गिक असल्यामुळे त्याचे कोणतेही दुषपरिणाम होत नाहीत.
- टिक – टॉक वॅक्स केसांना मुळापासून काढून टाकते.
- टिक – टॉक वॅक्समुळे फार वेदना होत नाही
- टिक – टॉक वॅक्स अती संवेदनशील त्वचेसाठी फायदेशीर आहे.
- टिक – टॉक वॅक्समुळे त्वचेवर रॅशेस येत नाहीत.
- टिक – टॉक वॅक्स केल्यामुळे केसांची वाढ कमी होते आणि हळू हळू अंगावरील केस येणं कमी होते.
टिक – टॉक बनवण्याची पद्धत –
टिक – टॉक वॅक्स तुम्ही घरात असलेल्या साध्या साहित्यापासून अगदी झटपट बनवू शकता.
साहित्य –
- एक कप साखर
- पाव कप लिंबाचा रस
- पाव कप पाणी
टिक – टॉक वॅक्स बनवण्याची पद्धत –
- गॅसवर मोठ्या आंचेवर एक नॉनस्टिक पॅन ठेवा
- पॅनमध्ये सर्व साहित्य टाका.
- मिश्रण वितळू लागतात गॅसची आंच कमी करा आणि चमच्याने ढवळत राहा.
- वितळलेले मिश्रण सोनेरी रंगाचे झाले की गॅस बंद करा.
- मिश्रण एका वाटीत घ्या आणि थंड झाल्यावर वापण्यास सुरूवात करा
- फार घट्ट झाल्यास मंद गॅसवर पुन्हा गरम करा आणि वापरा.
- हे मिश्रण तुम्ही एखाद्या हवाबंद डब्यात भरून ठेवू शकता.
घरच्या घरी कसं कराल टिक – टॉक वॅक्सिंग
वॅक्स करताना त्वचा ताणली जात असल्यामुळे आधीच मनात अनेक प्रश्न असतात. मात्र टिक टॉक वॅक्स पूर्णपणे नैसर्गिक असल्यामुळे याचा तुमच्या त्वचेवर कोणताही दुष्परिणाम होत नाही.
- वॅक्स करण्यासाठी सर्वात आधी तुमची त्वचा स्वच्छ करून ती कोरडी करा
- जर तुमच्या त्वचेवर तेलाचा थर, क्रीम असेल तर वॅक्सिंग करताना केस निघण्यास त्रास होण्याची शक्यता असते.
- वॅक्स करण्यापूर्वी त्वचेवर टाल्कम पावडर लावा
- टिक – टॉक वॅक्स गरम करा आणि त्वचेवर केसांच्या ग्रोथच्या उलट्या दिशेने लावा.
- वॅक्स त्वचेवर लावण्यासाठी तुम्ही चमच्याचा बटर नाईफचा वापर करू शकता.
- वॅक्स कोमट असेल याची काळजी घ्या.
- आता वॅक्स उलट्या दिशेने ओढून काढा.
- ज्यामुळे तुमच्या अंगावरील नको असलेले केस सहज निघून जातील
- सराव नसल्यास याचा आधी थोडा सराव करा
- मात्र लक्षात ठेवा उलटसुलट दिशेने वॅक्स ओढू नका कारण असं केल्यास त्वचेवर रॅशेस येण्याची शक्यता आहे.
- वॅक्सिंग केल्यावर त्वचेवर बर्फ लावा ज्यामुळे तुमचे ओपन पोअर्स बंद होतील.
- बर्फ नको असल्यास तुम्ही गुलाबपाणी अथवा एस्ट्रिंजंटचा वापर करू शकता.
- वॅक्सिंग केल्यावर एक ते दोन दिवस पाऊस, चिखल, धुळ, माती प्रदूषण आणि मेकअपासून दूर राहा.
फोटोसौजन्य – SHutterstock
अधिक वाचा –
किशोरवयीन मुलींनी कधी सुरु करावं वॅक्सिंग अथवा थ्रेडिंग
चेहऱ्यावर वॅक्सिंग करताना लक्षात ठेवा या गोष्टी, अन्यथा चेहरा होईल खराब
घरीच करा स्वतःचे वॅक्सिंग, स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींचा करा वापर