ADVERTISEMENT
home / मनोरंजन
लिपस्टिक बॅन

कशासाठी मराठी अभिनेत्री करतायत #BanLipstick

 लिपस्टिक जी महिलांचे सौंदर्य वाढवते ती महिलांच्या फारच जवळची असते. घरातून रोज लिपस्टिक लावून पडल्यानंतर खूप जणांना एक वेगळाच आत्मविश्वास येतो. महिलांचा आत्मविश्वास वाढवणारी अशी ही गोष्ट असूनही सगळ्या अभिनेत्री #BanLipstick का करत आहेत असा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल.पण अचानक लिपस्टिक बॅन करायला नेमकं झालयं तरी काय? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. अभिनेत्री तेजस्विनी पंडितने या संदर्भातील एक व्हिडिओ शेअर केला आणि त्यानंतर एकामागोमाग एक सगळ्यांनी हा व्हिडिओ शेअर करत तो इतका व्हायरल केला आहे की, आता याचा अर्थही जाणून घेणे महत्वाचे आहे.

म्हणून केली जात आहे #BanLipstick

मी लिपस्टिकचे समर्थन करत नाही, #BanLipstick असे म्हणत तेजस्विनी पंडितने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये ती हे वाक्य म्हणत ओठांना लावलेली लिपस्टिक पुसत आहे. तिचा हा व्हिडिओ पाहून खूप जणांना हे काहीतरी सामाजिक भान याच्याशी निगडीत आहे असे वाटले. कारण तिने हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर अनेक मराठी अभिनेत्रींनी अशाच स्वरुपाचा एक व्हिडिओ पोस्ट केला. ओठांवरुन लिपस्टिक पुसून टाकण्याचा अर्थ काय? हे खूप लोकांना काहीच कळत नव्हते. त्यामुळे खूप जण गोंधळात पडले होते. पण आता त्याचा खरा अर्थ समोर आलेला आहे. तेजस्विनी पंडितने हा व्हिडिओ का पोस्ट केला आहे याच्यावरुन पडदा उठला आहे. तुम्हालाही जाणून घ्यायचा आहे का? काय आहे या व्हिडिओ अर्थ.. चला जाणून घेऊया याचा नेमका अर्थ काय आहे ते.

नव्याची सुरुवात

तुम्हालाही हा व्हिडिओ कसले तरी प्रमोशन वाटला असेल तर हे खरे आहे. तेजस्विनी पंडित लवकरच एका नव्या प्रोजेक्टमध्ये सगळ्यांच्या भेटीला येणार आहे.  प्लॅनेट मराठी ॲपवर  अनुराधा नावाची एक नवी सीरिज येणार आहे. ज्याच्या प्रमोशनसाठी हा सगळा खटाटोप सुरु असल्याचे दिसत आहे. संजय जाधव यांची ती वेबसीरिज असून या पोस्टरवर लिपस्टिकचा फोटो दिसत आहे.  यावर असलेले टॉप हेडिंग पाहता kill you soon असे लिहिल्यामुळे ही काहीतरी सस्पेन्स प्रकारातील सीरिज असणार आहे असा अंदाज येत आहे. तेजस्विनीने ही पोस्ट शेअर केल्यानंतर खूप जणांनी तिचे अभिनंदन केले आहे. त्यामुळे आता नव्या रुपात तेजस्विनी आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे.

काही दिवसांपूर्वी केली होती एक मस्त पोस्ट

तेजस्विनी एक उत्तम अभिनेत्री तर आहे. पण तिचा स्वयंपाक घरातील वावरही चांगलाच आहे हे तिच्या एका नव्या पोस्टमध्ये दिसून आले आहे.  तेजस्विनीने तिच्या घरातील जुने मापाचे चमचे शेअर केले आहेत. जे पाहून प्रत्येकाला त्याच्या घरातील असे एक प्रमाण नक्की आठवेल. घरात प्रत्येक सुगरणीचे असे एक प्रमाण असते. त्याची अवस्था काहीही झाली तरी ते कित्येक पिढ्या घरात राहते. हा वारसा खूप कुटुबांनी चालवला असेल आणि खूप जणांना त्याची आठवण देखील झाली असेल. 

ADVERTISEMENT

आता सगळ्यांना #BanLipstick चा अर्थ कळलाच असेल आणि फॅन्सला या नव्या प्रोजेक्टची प्रतिक्षाही असेल.

पहिल्या दोन आठवड्यांमध्ये ‘झिम्मा’ने गाठला सहा करोडचा टप्पा

08 Dec 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT