ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
why-models-dont-smile-while-ramp-walk-in-marathi

रॅम्प वॉक करताना मॉडेल्स का हसत नाहीत, माहीत आहे का कारण

आपण अनेकदा फॅशन शो पाहतो, मिस इंडिया (Miss India), मिस वर्ल्ड (Miss World), मिस युनिव्हर्स (Miss Universe) हेदेखील आपण तितक्याच उत्सुकतेने जाणून घेत असतो. पण तुम्ही फॅशन शो अगदी मनापासून पाहिला असेल तर तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का? रँप वॉक (Ramp Walk) करणारे हे फॅशन मॉडेल्स कधी हसत का नाहीत? अत्यंत सुंदर डिझाईनर कपडे, सुंदर मेकअप, स्टायलिश दिसणारे मॉडेल्स पण त्यांच्या चेहऱ्यावर हास्य मात्र कधीही नसते. तरीही अशा मॉडेल्सचे आपल्याला आकर्षण असते. माणसाच्या हसण्यात त्याचे सौंदर्य लपलेले असते आपण नेहमीच म्हणतो. कोणतीही व्यक्ती ही हसताना अधिक सुंदर दिसते. पण असे असतानाही रॅम्प वॉक करणारे मॉडेल्स कधी का हसत नाहीत? आजकाल केवळ बॉलीवूड सेलेब्रिटी जे शो स्टॉपर (Show Stopper) असतात ते रॅम्प वॉकनंतर हसतात. पण संपूर्ण फॅशन शो मधील मॉडेल्सचा चेहरा मात्र कोरा करकरीत असतो असं का? याचं कारण घ्या जाणून. 

रॅम्पवर हसण्यासाठी मॉडेल्सना मनाई 

रॅम्प वॉक करणाऱ्या मॉडेल्सची उंची, त्यांची शरीरयष्टी आणि मेकअप याची प्रशंसा जितकी करावी तितकी कमी असते. आपले शरीर फिट ठेवण्यासाठी त्यांना खूप मेहनत करावी लागते. हे सर्व त्यांना जबरदस्तीने नक्कीच करावे लागत नाही. मग तरीही त्यांच्या चेहऱ्यावर जराही हास्य का येऊ नये? केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात कोणतेही मॉडेल्स हे रॅम्प वॉक करताना हसत नाहीत, मग त्या महिला असोत वा पुरूष. त्यामुळे त्यांना हसण्याची परवानगी दिली जात नाही का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर हो असं आहे. मॉडेल्सना रॅम्पवर हसण्याची परवानगी नाही. 

का हसत नाहीत मॉडल्स?

‘Never Skinny Enough: The Diary Of Top Model’ या पुस्तकात एका सुपरमॉडल Victoire Macon Dauxerre यांनी लिहिले आहे आणि ही मॉडेल आंतरराष्ट्रीय दर्जाची असून खूप प्रसिद्ध होती. तिच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे ‘मला न हसण्यासाठी इशारा मिळाला होता’ तर अनेक जणी रॅम्प वॉकदरम्यान आपला वाईट काळ आठवतात जेणेकरून त्यांना हसू येऊ नये. 

याच्या मागे डिझाईनर्सचे कपडे हे मुख्य कारण असल्याचे सांगण्यात येते. फॅशन गुरू आणि या पुस्तकानुसार, जर सुंदर मुली हसल्या, तर कोणाचेही लक्ष कपड्यांकडे न जाता त्यांच्या चेहऱ्याकडे जाईल. जे अजिबात योग्य नाही. त्यामुळे कपड्यांकडे लक्ष जाण्यासाठी मॉडेल्सना हसण्याची बंदी असते. त्यामुळे बऱ्याच फॅशन शो मध्ये मॉडल्सचे चेहरे झाकलेलेही दिसून येतात. 

ADVERTISEMENT

रॅम्प वॉक करण्याचा नियम 

रॅम्प वॉक करण्याचा एक नियमही आहे. मॉडल्सना आपल्या चेहऱ्याचा आकार अशा पद्धतीचा बनवायचा असतो जेणेकरून डिझाईनर्सच्या कपड्यांना चांगला लुक मिळेल. रॅम्प वॉक करताना डोळे वर करून चालणे, हनुवटी थोडी खाली असणे गरजेचे असते. तसंच मॉडल्सचे गाल कधीही गुबगुबीत असू नयेत. कायम पातळ गाल आणि नजर सरळ लागते. तुम्ही कोणत्याही मॉडल्सना रॅम्प वॉक करताना पाहिले तर असंच दिसणार. 

हेच कारण आहे, ज्यामुळे मॉडलिंग करताना अधिक काळजी घेतली जाते. त्यामुळे तुम्हाला जर नेहमी हा प्रश्न पडत असेल की मॉडल्स हसत का नाहीत, तर त्याचं उत्तर तुम्हाला नक्कीच या लेखातून मिळेल. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

04 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT