एकता कपूर (Ekta Kapoor) हे नाव टीव्ही इंडस्ट्रीला काही नवं नाही. टीव्ही इंडस्ट्रीची क्वीन असं एकता कपूरला म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही. एकता कपूरने आतापर्यंत अनेक मालिकांची निर्मिती केली आहे. मात्र सुपरहिट असणारी फँटसी फ्रिक्शन फ्रॅंचाईजी म्हणजे नागिन (Naagin). आतापर्यंत नागिन या मालिकेचे 5 सीझन झाले आहेत. सर्व सीझन तुफान चालले. तर काही दिवसांपूर्वीच नागिनचा 6 वा सीझनही सुरू झाला आहे. पहिल्याच भागाने सर्व टीआरपी रेकॉर्ड तोडले. या नव्या हंगामात ‘शेष नागिन’ म्हणून तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) दिसून येत आहे. आपल्या देशावर आलेले संकट निवारण्यासाठी ही नागिण आपले प्राण पणाला लावताना दिसून येत आहे. या मालिकेत अनेक नावाजलेले कलाकार आहेत. मात्र तरीही ही मालिका आतापर्यंत हवी तशी पकड घेऊ शकत नसल्याचे दिसून येत आहे. त्याची काही कारणं आम्हाला अशी वाटत आहेत, तुम्हालाही ती पटत आहेत का नक्की बघा. टीआरपीमध्ये (TRP) हा शो का पुढे येत नाही याची काही कारणे आमच्या दृष्टीने आहेत ती अशी –
मालिकेत व्हायरसची काय गरज होती?
या मालिकेत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कथा ही व्हायरसच्या (Virus) अवतीभोवती फिरत आहे. मात्र यापैकी काहीच खरं वाटत नाही. कारण जी गोष्ट दाखविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, ते प्रेक्षकांभोवती पोहचतच नाही. यातील संवाद आणि सीन्स हे व्यवस्थित मॅच होत नसल्याचे बरेच वेळा दिसून येत आहे. तसंच प्रोफेसरची व्यक्तिरेखादेखील वेबवरून हुबेहूब घेतल्यामुळे प्रेक्षकवर्ग नक्कीच नाराज आहे. याशिवाय चीनला चिंगिस्तान असं नाव देण्यात आलं असून तिथले लोक हिंदी कसे काय बोलतात हेदेखील न समजण्यासारखे आहे.
अभिनयामुळे होतेय हसू
सिंबा नागपाल (Simba Nagpal) आणि तेजस्वी प्रकाश यांचा अभिनय सहज असला तरीही मालिकेतील काही कलाकारांचा अभिनय हा प्रेक्षकांपर्यंत पोहचताना अगदी हास्यास्पद होत आहे. विशेषतः शेष नागिनची मोठी बहीण म्हणून दाखवण्यात आलेल्या महक चहल (Mahek Chahal) हिचा अभिनय बघणं म्हणजे मालिकाच बघू नये असं वाटणं. पण तरीही तेजस्वीसह अनेक फ्रेममध्ये ती असल्यामुळे तिला बघावंच लागतं. अनेकदा सिंबा आणि तेजस्वी यांची केमिस्ट्री पाहावीशी वाटते. पण त्यांना जास्त एकत्र दाखविण्यात येत नसल्यामुळे प्रेक्षकही नाराज होत आहेत. तर काही ठिकाणी उर्वशी ढोलकिया (Urvashi Dholakia) हिचा अभिनयदेखील ओव्हर द टॉप जाताना दिसून येत आहे.
VFX या अयोग्य वापर
प्रेक्षकांना नेहमीच सुपरपॉवर अथवा अशा पद्धतीचे चित्रपट वा मालिका पाहायला आवडतात. आतापर्यंत शक्तिमान, नागिनचे पहिले भाग यावरून आपल्याला हे लक्षात आलेच आहे. पण त्यामध्ये योग्य VFX चा वापर व्हायला हवा. मात्र या सीझनमध्ये अनेकदा VFX चा अयोग्य वापर करण्यात आलेला दिसून येत आहे. तसंच अतिवेळा याचा वापर केल्यामुळे स्क्रिनवरदेखील काही दृश्यं पाहताना ती खराब दिसतात. एडिटिंग आणि इफेक्ट तसंच दिग्दर्शन चांगले नसल्यामुळे यावेळी मात्र ही मालिका प्रेक्षकांमध्ये कमाल दाखवू शकलेली नाही असं आमचं मत आहे.
तेजस्वी आणि सिंबा हे दोन्ही कलाकार उत्तम असून त्यांना अधिकाधिक दाखवून त्यांच्या लव्हस्टोरीवरही लक्ष केंद्रीत केल्यास, या मालिकेला अधिक टीआरपी नक्कीच पुढे मिळू शकेल.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक