व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असं नेहमीच म्हटलं जातं. कारण प्रत्येक व्यक्तीची बोलण्याची, बसण्याची, चालण्याची, उठण्याची, झोपण्याची एक वेगळी स्टाईल असते. झोपण्याबाबत बोलायचं झालं तर कुणाला कुशी झाल्यावर झोप लागते, कुणाला उपडी तर कोणाला पाठीवरच चांगली झोप लागते. तुमची झोपण्याची स्थिती जरी वेगवेगळी असतील तरी अनेकांना झोपेत पांघरूणातून आपसूक पाय पाय बाहेर येण्याचा अनुभव नक्कीच आला असेल. झोपताना अथवा थंडी लागल्यावर पाय पुन्हा पांघरूणात घेतला तरी काहींचा एक पाय नेहमीच पांघरूणाबाहेर असतो. कारण असं केल्यामुळेच काहींना चांगली झोप लागते. पटकन झोप लागण्यासाठी अथवा गाढ झोपण्यासाठी अनेकजण असं करतात. यासाठीच जाणून घ्या यामागचं शास्त्रीय कारण
झोपेत का येतो पांघरूणातून एकच पाय बाहेर
झोपेत पाय पांघरूणातून बाहेर येण्यामागे मानसिक आणि शास्त्रीय अशी अनेक कारणं असतात. जाणून घ्या.
- पांघरूणातून झोपेत एक पाय बाहेर येण्यामागचं शास्त्रीय कारण हे की पायामुळे तुमच्या शारीरिक तापमानावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. कारण पायात शरीरातील महत्त्वाच्या रक्तवाहिन्या आणि धमन्या असतात. पायाला अधिक ऊब मिळाल्यास त्या प्रसरण पावण्यास सुरूवात होते. म्हणूनच गाढ झोपेतही शरीरातील तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी शरीर तुमचा एक पाय झोपेतून बाहेर काढते. शिवाय तुमचे
- पाय शरीराच्या इतर भागापेक्षा लवकर थंड होतात. त्यामुळे पायाला पटकन थंडावा मिळतो. याचं शास्त्रीय कारण असं की तुमच्या तळव्यांना केस नसतात ज्यामुळे ते जास्त काळ उष्ण राहू शकत नाहीत.
- पाय थंड वातावरणाच्या संपर्कात येताच तुमच्या शरीरातील इतर अवयवांना पायामधून थंडावा मिळू लागतो. सहाजिकच यामुळे पांघरूण न काढताही तुमच्या शरीराला योग्य थंडावा मिळू लागतो. ज्यामुळे तुमची झोपमोड होत नाही.
- तुम्ही झोपेत हे सर्व आपोआप कसे घडते याबाबत शाशंक असाल तर लक्षात ठेवा. पांघरूणामुळे तुमच्या शरीराचे तापमान वाढू लागते. शारीरिक अंतर्गत प्रेरणेतून मग शरीर तुमचा पाय पांघरूणाबाहेर काढते आणि पायाला थंडावा मिळू लागतो. ज्यामुळे तुम्हाला थंडावाही मिळतो आणि गरमही होत नाही.
पांघरूणाबाहेर पाय काढण्याच्या सवयीचा कसा घ्याल फायदा
जर तुम्हाला पांघरूणातून पाय बाहेर काढण्याची सवय असेल तर या सवयीचा तुम्ही योग्य फायदा नक्कीच घेऊ शकता.
- झोपताना लक्षात ठेवा तुमच्या खोलीतील तापमान जास्त थंड अथवा जास्त उष्ण नसेल. कारण जर तुम्ही अती थंड वातावरणात पांघरूणातून पाय बाहेर ठेवला तर तुम्हाला सर्दी होऊ शकते. अशा वातावरणात थंडी लागू लागल्यास पुन्हा पाय आत घ्या आणि थोड्यावेळाने तो पुन्हा बाहेर काढा.
- चांगल्या गुणवत्तेचे आणि कापडाचे पांघरूण वापरा. यासाठी उन्हाळ्यात पातळ बेडशीट आणि थंडीत ब्लॅकेट किंवा जाड पांघरूण अंगावर घ्या.
- तुमच्या शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करा. थंडीत पायमोजे वापरा पण उन्हाळ्यात एसी असेल तरी पायमोजे नका वापरू.
- रात्री झोपमोड होऊ नये यासाठी झोपण्यापूर्वी कमीत कमी अर्धा तास मोबाईल, लॅपटॉप, कंम्युटरपासून दूर राहा.
- पांघरूण फार गुंडाळून झोपू नका कारण रात्री उष्णता वाढल्यास पाय बाहेर घेणं कठीण होईल.
फोटोसौजन्य –
अधिक वाचा –
हातांना अति घाम येण्याची असेल समस्या, तर वापरा घरगुती उपाय
फुलदाणीतील फुले दिवसभर टवटवीत राहण्यासाठी सोप्या टिप्स
शांत झोप लागण्यासाठी उपाय जाणून घ्या (Good Sleeping Tips In Marathi)