Advertisement

Love

नात्यामधील रोमान्स नक्की का कमी होतो, जाणून घ्या कारण

Dipali NaphadeDipali Naphade  |  Jul 5, 2021
नात्यामधील रोमान्स नक्की का कमी होतो, जाणून घ्या कारण

Advertisement

नात्यात प्रेम करणे आणि प्रेम जाहीर करणे यामध्ये फरक असतो. प्रेम करणे, ते निभावणे आणि टिकवून ठेवणे यातही खूपच फरक असतो. अनेकदा सुरूवातील असणारा प्रेमातील आणि नात्यातील रोमान्स का हळूहळू कमी होतो. पण असे नक्की का होते? जोडीदारांमधील दुरावा वाढू लागतो. काही जणांमधील वाद अगदी टोकाला जातो. त्यामुळेच एकेकाळी प्रेम करत असणाऱ्या व्यक्ती एकमेकांपासून दुरावतात आणि मग दुसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होतात. आपल्या जोडीदाराबरोबर नाते खराब होण्याचे एक कारण म्हणजे नात्यामधील रोमान्स कमी होणे. जोड्यांमधील रोमान्स हा नेहमी ताजातवाना रहायला हवा. अन्यथा तुमचे आयुष्य अत्यंत कंटाळवाणे होते आणि नात्याचे ओझे वाटू लागते. अशा नात्यात राहणं दोन्ही व्यक्तींना कठीण होते. पण याची नक्की कारणे काय आहेत ते आपण जाणून घेऊया.

मानसिक ताण

मानसिक ताण

Freepik

कोणत्याही हेल्दी नात्यासाठी कपल्सचे मानसिक तणावपासून दूर राहणे अत्यंत गरजेचे आहे. कोणत्याही नात्यातील तणाव हा नाते खराबच करतो. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या कोणत्याही गोष्टीपासून त्रास सहन करत असाल अथवा तुम्हाला या नात्यात नैराश्य आले असेल तर तुमच्या नात्यातील रोमान्स हा संपला आहे हे नक्की. दोन व्यक्तींमधील एका जरी व्यक्तीला सतत मानसिक ताण घेण्याची सवय असेल तर नात्यामध्ये हळूहळू तणाव वाढीला लागतो. त्यामुळे दोन्ही व्यक्तींमधील शारीरिक इंटिमसी (physical intimacy) कमी होते आणि त्यांची सेक्स लाईफ (sex life) यामुळे प्रभावित होते. आयुष्यात अनेक संकटं येत असतात पण संकटांना सामोरे जाताना नात्याचे संतुलन करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही मानसिक तणावात गुंतून राहण्यापेक्षा आपल्या जोडीदारासह वेळ घालवणे अधिक गरजेचे आहे हे जाणून घ्या. मानसिक ताण असेल तर नात्यातील रोमान्स कमी होण्याचे हे मुख्य कारण आहे.

तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी केवळ पर्याय नाही ना…ओळखा संकेत

कंटाळवाणे आयुष्य

कंटाळवाणे आयुष्य

Freepik

रोज रोज तेच जगून आयुष्यही कंटाळवाणे होऊन जाते. बऱ्याचदा कपल्स त्याच लाईफस्टाईलमध्ये इतके गुंतून जातात की एकमेकांसह आयुष्य जगण्यास विसरून जातात. त्यामुळे दोघांमधील प्रेमाचे आकर्षण कमी होऊ लागते. आपल्या जोडीदारासह चांगला वेळ घालवणे, त्यामध्ये वेगवेगळ्या मजामस्तीच्या गोष्टी सामावून घेणे, एकमेकांसाठी सरप्राईज देणे हे सर्व नात्यामधील रोमान्स जागा ठेवण्यास मदत करते. कंटाळवाण्या आयुष्याचा आपल्या नात्यामध्ये प्रवेश करू देऊ नका. लहान सहान गोष्टींनीही तुम्ही तुमच्या नात्यामधील रोमान्स टिकवून ठेऊ शकता.

ब्रेकअप (Breakup) नक्की का होतं, ‘ही’ आहेत महत्त्वाची कारणं

भांडणांची वाढ

भांडणांची वाढ

Freepik

कोणतंही नातं हे कधीच परफेक्ट नसतं. पण तुम्ही ते नातं छान जुळवून परफेक्ट करू शकता. एखाद्या जोडीमध्ये जेव्हा जास्त वाद होऊ लागतात तेव्हा बोलणं बंद करण्यात येतं. पण संवाद न साधल्याने हा दुरावा अधिक वाढीला लागतो. इतकंच नाही तर तुमच्यातील रोमान्स या गोष्टीमुळे कमी होतो. एकमेकांबरोबर वेळ घालवू नये कारण भांडणं होतात अशी स्थिती निर्माण होते. त्यामुळे एकमेकांबाबत मनात कटूताही निर्माण होते. अनेक वर्ष एकमेकांसह राहिल्यावर दोघांनाही एकमेकांबाबत इतक्या गोष्टी माहीत असतात की, सतत त्यावरून भांडण उकरून काढण्यापेक्षा त्याकडे दुर्लक्ष केले तर नात्यामधील त्रासदायकपणा कमी होतो. तुम्ही जितके एकमेकांशी कमी भांडाल तितके तुम्ही एकत्र चांगले राहू शकता.

चुकीच्या नात्यातून बाहेर पडण्यासाठी या गोष्टी करायलाच हव्यात

व्यक्तिगत आयुष्याच्या आधी व्यावसायिक गोष्टींना महत्त्व

व्यक्तिगत आयुष्याच्या आधी व्यावसायिक गोष्टींना महत्त्व

Freepik

व्यावसायिक आयुष्य अर्थात प्रोफेशनल लाईफ प्रत्येकाला महत्त्वाची असते. पण तुम्ही व्यक्तिगत आयुष्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून सतत कामात लक्ष दिले तर त्याचा तुमच्या नात्यावर अधिक वाईट परिणाम होतो. बऱ्याचदा तुम्ही व्यावसायिक आयुष्यात इतके गुंतले जाता की, त्यातील चढउताराचा संपूर्णतः परिणाम हा नात्यावर दिसून येतो आणि नात्याबरोबर याचे संतुलन नीट सांभाळता येत नाही. त्यामुळे नात्यातील रोमान्सही कमी होऊ लागतो.  तुमचा जोडीदारच तुमच्यावर प्रेम करणार असतो. या चढउतारांमध्ये तुम्हाला साथ देणार असतो. त्यामुळे तुम्ही त्याच्यासाठी वेळ काढणं आणि रोमान्ससाठी त्या जोडीदारासह असणं गरजेचे आहे.

नात्यातील रोमान्स कमी करण्यासाठी ही चार कारणे कारणीभूत ठरतात. पण तुम्ही वेळीच यावर काम करणे सुरू केल्यास तुमचे नाते आणि नात्यातील रोमान्स वाचवू शकता.