ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
सलमान खान आणि संजय लीला भन्साळी यांच्यात पडली वादाची ठिणगी

सलमान खान आणि संजय लीला भन्साळी यांच्यात पडली वादाची ठिणगी

सलमान खान (Salman Khan) आणि संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांचा आगामी ईन्शाअल्लाह (Inshallah) सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली गेल्याची बातमी #POPxoMarathi ने नुकतीच दिली होती. पण आता अशी बातमी येत आहे की, सलमानने हा सिनेमाच सोडला आहे. आता नक्की काय गौडबंगाल आहे, देव जाणे.

सलमान ईन्शाअल्लाह नाही तर करणार किक

Instagram

बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) ने नुकतंच ट्विट करून सांगितलं होतं की, या ईदला त्याचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार नाही. ज्यामुळे ईद आणि सलमान भाईचा सिनेमा असं समीकरण असणारे त्याचे फॅन्स नाराज झाले होते. पण त्याने हेही सांगितलं होतं की, तो ईदला भेटीला मात्र नक्की येणारच आहे. तो सिनेमा कोणता याबाबत उत्सुकता होती. आता त्या दुसऱ्या सिनेमाबाबत कळतंय. सलमानच्या या ट्विट प्रकरणानंतर लगेच घोषणा झाली ती किक 2 (Kick 2) या सिनेमाची, ज्यामध्ये सलमानच असून तो 2020 च्या ईदला रिलीज होईल. 

ADVERTISEMENT

सलमान आणि भन्साळी यांच्यातील वाद

पण हे मात्र कळलं नाही की, ईन्शाअल्लाह का पुढे ढकलला गेला. सूत्रानुसार, हा चित्रपट पुढे ढकलण्याची किंवा बंद होण्याचं कारण आहे सलमान आणि संजय लीला भन्साळी यांच्यातील वाद. समोर येत असलेल्या बातम्यांनुसार, खरंतर भंसाळी यांच्या चित्रपटाची प्रोडक्शन कॉस्ट सलमान खानच्या फिजशिवायच 160 करोडपर्यंत पोचली होती. सलमानची फीज तब्बल 50 करोड रूपये आहे आणि चित्रपटातील तब्बल 40 टक्के नफ्यात त्याचा वाटा होता. पण सलमान खानच्या चित्रपटाचे सॅटेलाईट आणि डिजीटल राईट्स विकले गेल्यावरही इन्व्हेस्टर्सना 210 करोड रुपये चित्रपटात गुंतवण्यात रस नव्हता. कारण याची रिकव्हरी फक्त थिएटरिकल आणि परदेशातील व्यवसायातून होणं पुरेसं नव्हतं. 

एवढंच नाहीतर सूत्रानुसार, भन्साळी यांना स्वतःकडेच म्युझिकचे राईट्सही ठेवायचे होते. तसंही भन्साळी यांची ओळख बिग बजेट चित्रपट बनवण्यासाठी आहे. तर सलमान खानचं असं म्हणणं होतं की, जर हा सिनेमा अमेरिकेत राहणाऱ्या एका साध्या मुस्लिम बिझनेसमन मुलाची आहे. ज्याचं एका हिंदू आणि छोट्या शहरातील मुलीवर प्रेम जडत. त्यामुळे हा सिनेमा काही पीरियड ड्रामा नसल्यामुळे अशा चित्रपटासाठी भरजरी ड्रेसेसची काही गरज नाही. ज्यासाठी एवढं 160 करोड रुपयांचं बजेट ठेवण्यात यावं. तरीही त्याने भन्साळींना अजून एकदा फायनल बजेट ठरवण्याची संधी दिली. 

सूत्रानुसार हेही कळतंय की, ‘सलमान खानने तर हेही ऑफर केलं होतं की, तो फिल्मचं पूर्ण प्रोडक्शनही बघेल. पण हे भन्साळींना मान्य नव्हतं. दिग्दर्शक भन्साळी यांना बॉलीवूडमधील प्रख्यात दिग्दर्शक म्हणून ओळखलं जातं. पण ते प्रोड्यूसर म्हणून कितपत योग्य आहेत, याबाबत मात्र इंडस्ट्रीमध्ये अनेक मत आहेत. कारण त्यांना नेहमीच ग्रँड आणि बिग बजेट प्रोजेक्ट्स आवडतात. पण ईन्शाअल्लाह हा चित्रपट काही बाजीराव मस्तानी किंवा पद्मावतप्रमाणे पीरियड ड्रामा नाहीतर एक सिंपल लव्हस्टोरी आहे.

काय आहे सलमानचं म्हणणं

सलमानने एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, मला फक्त एवढचं म्हणायचं आहे की, माझ्यात आणि संजय यांच्यामध्ये काहीच बदललं नाही. मी आजही त्यांच्या कुटुंबाच्या जवळ आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो. भविष्यात आम्ही नक्की एकत्र काम करू ईन्शाअल्लाह. 

ADVERTISEMENT

 

28 Aug 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT