ADVERTISEMENT
home / आपलं जग
why thermal curtains are best for home decoration

घर सजावट करताना वापरा थर्मल पडदे, घर दिसेल कूल

घर सजवताना घराचे फक्त पडदे आणि घराचा रंग जरी बदलला तरी घराला एक छान लुक मिळतो. प्रत्येक खोलीत साजेसे पडदे लावून तुम्ही स्वतःच घराची सजावट करू शकता. थोडक्यात घराच्या सजावटीमध्ये पडदे, पडद्यांचा रंग आणि पडद्यांचा प्रकार खूप महत्त्वाचा ठरतो. बरेच लोक पडदे खरेदी करताना त्याचा रंग आणि प्रिंट, खिडकीचा आकार या गोष्टी नीट पाहतात. पण पडद्यांचे कापड मात्र कसेही निवडतात. मात्र असं करू नका कारण तुम्ही तुमच्या पडद्याचे कापड कसे निवडता यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. घर सजवताना पडदे खरेदी केल्यावर पश्चाताप व्हायला नको असेल तर त्यासाठी यंदा पडदे खरेदी करताना थर्मल पडद्यांची निवड करा. त्यासाठी जाणून घ्या थर्मल पडदे म्हणजे नेमकं काय आणि घराच्या सजावटीत का करायला हवा थर्मल परड्यांचा वापर. यासोबतच वाचा कमी बजेटमध्येही सजवू शकता तुम्ही तुमचं स्वप्नातलं घर, या टिप्स करा फॉलो

थर्मल पडदे म्हणजे काय 

थर्मल पडदे हे अनेक लेअर्स वापरून बनवलेले असतात. ज्यामुळे अती थंड हवा आणि उष्णतेला प्रतिरोध निर्माण होतो. शिवाय थर्मल पडदे हा पडद्यांचा असा एक प्रकार आहे ज्यामुळे तुमचे खूप पैसे वाचू शकतात. कारण त्यामुळे तुम्हाला प्रत्येक सीझनसाठी सतत निरनिराळे पडदे बदलण्याची गरज नाही. थर्मल पडदे तुमचे घर हिवाळ्यात उबदार आणि हिवाळ्यात थंड ठेवतात. थर्मल पडद्यांमुळे तुमच्या घरात नेहमी आरामदायक वातावरण राहते. घरात प्रकाश पुरेसा येत असल्यामुळे दिवसा लाईट्सचा वापर कमी होतो. सीझननुसार तुम्हाला पडदे बदलावे न लागल्यामुळे तुमचा वेळ आणि पैसे दोन्ही वाचतात. घर खरेदी करण्यापूर्वी स्वतःला विचारा हे प्रश्न आणि मग घ्या निर्णय

थर्मल पडदे पर्यावरणाला पूरक आणि पोषक

आजकाल प्रत्येक गोष्ट करताना ती इको फ्रेंडली असेल याची काळजी घेतली जाते. कारण आपण वापरत असलेल्या गोष्टीतून पर्यावरणाची हानी होऊ नये हा एक चांगला हेतू त्यामागे असतो. तुम्ही जेव्हा थर्मल पडदे वापरता. तेव्हा तुमच्या घरात एसी, लाईट्, कुलर, हीटर अशा गोष्टी वापरण्यामुळे होणारा विजेचा वापर आपोआप कमी होतो. या गोष्टींमुळे वीज वाचवली गेल्यामुळे तुमचे थर्मल परडे एका दृष्टीने पर्यावरणाला पूरक आणि पोषकच ठरतात. बाजारात सध्या या पडद्यांमध्ये खूप छान पर्याय उपलब्ध असल्यामुळे तुम्ही तुमच्या घराच्या सजावटीसाठी या प्रकारचे पडदे नक्कीच वापरू शकता. लहान घरदेखील वाटेल प्रशस्त आणि मोठं, फॉलो करा या सोप्या टिप्स

20 Sep 2021
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT