प्रत्येक उपासावेळी कोणताही पदार्थ करताना हळद घातली जात नाही. काही ठिकाणी उपवासासाठी तिखट वापरलं जात मात्र अत्यंत गुणकारी असणारी हळद मात्र टाळली जाते. तुम्हाला माहीत आहे का यामागील कारण. माहीत नसेल तर वाचा.
उपवासात हळद न वापरण्यामागचं कारण
Shutterstock
उपवासाच्या दिवशी लोकं आवर्जून फळ, दुग्धजन्य पदार्थ, सुकामेवा आणि उपवासाच्या पदार्थांचं सेवन करतात. पण उपवासाचे पदार्थ बनवताना काही ठराविकच मसाले वापरले जातात. जसं जीरं, मिरची, तिखट इ. काही ठिकाणी तर अगदी कोंथिबीरही वापरली जाते. मग औषधी हळद उपवासाच्या पदार्थात न वापरण्याचं नेमकं कारण जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. तेव्हा असं कळलं की, हळद हा एक असा मसाला आहे जो सात्विक प्रकृतीचा मानला जातो. पण हळदीही चवीला कडू असते आणि त्यामुळे शरीरात उष्णता निर्माण करते. त्यामुळे उपवासाच्या पदार्थात हळद घालणं टाळलं जातं. कारण उपावासादरम्यान हळदीचं सेवन केल्यास शरीरात बैचेनी जाणवू शकते. त्यामुळे शक्यतो इतरवेळी आयुर्वैदिक गुणकारी मानली जाणारी हळद उपावासात वापरली जात नाही.
आयुर्वैदातील हळदीचं महत्त्व
Shutterstock
खरंतर हळदीला आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण हळद ही गुणकारी आहे. पण उपवासात शरीर डिटॉक्स होत आणि विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात. उपवासाचे आरोग्यासाठी अनेक फायदे असतात. आयुर्वेदात जरी हळदीचं महत्त्व असलं तरी उपावासादरम्यान जे खाद्यपदार्थ वर्ज्य आहेत तेही आयुर्वेदातील प्राचीन भारतीय विज्ञान सिद्धांतावरच आधारित आहेत. आयुर्वेदात शरीराव प्रभाव टाकणाऱ्या खाद्यपदार्थांना तीन प्रकारात विभागण्यात आलं आहे. सात्विक, राजसिक आणि तामसिक.
उपवासाच्या दिवसात चहा-कॉफी पिणं योग्य की अयोग्य
- सात्विक पदार्थ
उपावासादरम्यान सात्विक जेवणाला महत्त्व आहे. याप्रकारच जेवण शरीराला उर्जा आणि शक्ती देतं. सात्विक आहार स्वच्छ आणि शुद्ध मानला जातो. जो उपावासादरम्यान आरोग्यासाठी फायदेशीर असतो.
- राजसिक आणि तामसिक पदार्थ
ही दोन्ही प्रकारची जेवणं आयुर्वेदात आरोग्यासाठी चांगली मानली जात नाही. अशा प्रकारचं जेवण केल्याने शरीरात जडपणा, पोटाला सूज येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
नवरात्रीच्या उपवासाचे 9 फायदे घ्या जाणून, शरीर राहतं निरोगी
मग तुम्ही उपावासादरम्यान कोणत्या पदार्थांचं सेवन करता. तुमच्याकडेही उपवासात हळद वापरली जाते की नाही.