जेव्हा सर्वात जास्त फायदा मिळणाऱ्या विटामिन्सबाबत आपण चर्चा करतो तेव्हा अर्थातच विटामिन सी चे नाव सर्वात वर येते. अँटिऑक्सिडंटने भरपूर असणारे हे विटामिन सी केवळ तुमच्या शरीरासाठीच फायदेशीर आहे असं नाही तर तुमच्या त्वचेसाठीही हे उत्तम आहे. वास्तविक तुमच्या त्वचेचा सर्वात जवळचा मित्र जर कोणी असेल तर ते म्हणजे विटामिन सी. सीरम, मॉईस्चराईजर आणि क्रिमच्या स्वरूपात विटामिन सी चा उपयोग करून घेता येतो. स्किन टोन, निस्तेज त्वचा, फाईन लाईन्स, रफ टेक्स्चर आणि पिंपल्समुळे चेहऱ्यावर येणारे काळे डाग या सर्वांवर विटामिन सी फायदेशीर ठरते. विटामिन सी ने युक्त असणाऱ्या उत्पादनांचा त्यामुळेच तुम्ही तुमच्या स्किन केअर रूटिनमध्ये समावेश करून घ्यायला हवा. आता म्हणजे नक्की काय करायचं असा प्रश्न जर तुमच्या मनात आला असेल तर तुम्ही घाबरू नका. यासाठी काहीही वेगळं करण्याची गरज नाही. यासाठी काय करायचं या सोप्या गोष्टी आम्ही तुम्हाला या लेखातून सांगत आहोत. तुम्ही नक्की त्याचा वापर करा.
परिणामकारक अँटिऑक्सिडंट्स
Freepik
विटामिन सी विशेषतः त्यातील अँटिऑक्सिडंट गुण आणि त्याच्या लाभामुळे ओळखले जाते. तसंच अनेक त्वचेच्या तज्ज्ञांनीदेखील विटामिन सी हा त्वचेसाठी उत्तम उपाय असल्याचे सांगितले आहे. यातील पोषक तत्व तुमच्या त्वचेतील सेल्युलर स्तर संतुलित करण्यास मदत करतो. ज्यामुळे कोलेजनचा स्तरही वाढतो आणि सूर्याच्या किरणांपासून हानी पोहचलेली त्वचादेखील चांगली होण्यास मदत मिळते. बरेच तज्ज्ञ त्वचेची योग्य काळजी घेण्यासाठी विटामिन सी सीरमचा वापर करावा असा सल्ला देतात. कारण मॉईस्चराईजरच्या तुलनेत हे अत्यंत सहजपणाने मुरते. यातून तुमच्या त्वचेला आवश्यक असणारे सर्व अँटिऑक्सिडंट्स मिळतात आणि त्वचा अधिक चमकदार बनते.
सूर्यकिरणांपासून होणारी हानी टाळते
Freepik
जास्त वेळ उन्हात राहिल्यामुळे त्वचेवर वाईट परिणाम होत असतो. त्यामुळे त्वचेवर काळे डाग पडणे, कोरडेपणा येणे, फाईन लाईन्स येऊ लागतात. विटामिन सी चा उपयोग तुमची त्वचा सूर्यकिरणांपासून वाचवण्यासाठी करता येतो. याशिवाय तुमची डेड स्किन काढून त्वचा अधिक चांगली करण्यासाठीही विटामिन सी ची गरज भासते. दिवसाच्या वेळी तुम्ही तुमच्या सनस्क्रिनसह विटामिन सी चा देखील तुमच्या रोजच्या वापरात समावेश करून घेणे गरजेचे आहे. यामुळे त्वचेला अँटिऑक्सिडंटचा फायदा मिळतो आणि त्वचा अधिक चमकदार बनण्यास मदत मिळते. तसंच त्वचेमध्ये कोलेजन बनण्याची प्रक्रिया वाढविण्यास याची मदत मिळते.
त्वचा मऊ बनविण्यास मदत
Freepik
आपल्या शरीराची त्वचा हा असा भाग आहे ज्याला हायड्रेशनची अत्यंत गरज असते. त्यामुळे तुम्ही नियमित पाणी पित राहणे जसे आवश्यक आहे. तसंच त्वचेला बाहेरून पोषण देणेही गरजेचे आहे. त्यासाठी विटामिन सी ची गरज भासते. विटामिन सी मध्ये ही क्षमता असून पाणीचा स्तर योग्य राखण्यासाठी याचा उपयोग होतो आणि त्वचा अधिक तेलकट होऊ नये यापासून काळजी घेण्यासाठीही याचा उपयोग होतो. विटामिन सी लावल्याने तुमची त्वचा जास्त काळ मऊ राहते आणि मॉईस्चराईज राहते. यामुळे त्वचा अधिक तजेलदार आणि चमकदार दिसण्यासही मदत मिळते.
त्वचा उजळविण्यासाठी
बरेचदा उन्हात काम करून अथवा काही कारणाने त्वचेचा मूळ रंग लपला जातो. त्वचेवर येणारे डाग अथवा हायपरपिगमेंटेशनच्या कारणामुळे त्वचा अधिक वाईट दिसू लागते. हे हानिकारक नसले तरीही आपली त्वचा अधिक चमकदार आणि सुंदर असावी असे प्रत्येकालाच वाटते. त्वचा उजळविण्यासाठी तुम्हाला विटामिन सी ची गरज भासते. रात्री झोपताना तुम्ही नियमित याचा उपयोग केल्यास, तुमची त्वचा अधिक चमकदार राहण्यास मदत मिळते. विटामिन सी तुमची त्वचा अधिक मऊ मुलायम राखणारे गुणधर्म आढळतात. त्यामुळे रात्री याचा वापर केल्यास तुमच्या त्वचेला अधिक पोषण मिळण्यास मदत होते.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक