लग्नानंतर मुलींचं संपूर्ण आयुष्यच बदलून जातं. नवीन घर, नवी माणसं यांच्यासोबत अॅडजस्ट करताना तिच्यात अनेक मानसिक बदल होतात. मनात येणाऱ्या विचारांचा परिणाम नकळत तिच्या आरोग्यावर होत जातो. शरीरात हॉर्मोनल बदल होतात. ज्यामुळे बऱ्याचदा लग्नानंतर महिलांचे वजन झपाट्याने वाढत असलेले दिसून येते. लग्नानंतर होणारा हा शारीरिक बदल चांगल्या अथवा त्रासदायक अशा दोन्ही गोष्टींचा परिणाम असू शकतो. त्यामुळे जर तुमचे वजन लग्नानंतर असे अचानक वाढू लागले तर सहाजिकच तुमच्या मनात अनेक शंका येऊ शकतात. यासाठीच जाणून घ्या लग्नानंतर महिलांचे वजन वाढण्यामागे नेमकी काय कारणे आहेत.
आहारात बदल –
लग्नानंतर मुली सासरी अथवा त्यांच्या नव्या घरी सेटल होतात. पण सेटल होण्यासाठी त्यांना बऱ्याच नवीन गोष्टींमध्ये समरस व्हावे लागते. सासर मोठे असेल तर तिथल्या खाण्यापिण्याच्या सवयी निरनिराळ्या असतात. कारण प्रत्येक घराची स्वयंपाकाची एक पद्धत असते. स्वयंपाकातील रोजचे पदार्थ, स्वयंपाकात वापरले जाणारे मसाले, भाज्यांचे प्रकार, स्वयंपाक बनवण्याची पद्धत या सर्व गोष्टींमध्ये अचानक बदल होतात. शिवाय लग्नानंतर घरात सतत काही तरी कार्यक्रम अथवा विधी होत असतात. ज्यासाठी गोड पदार्थ, मिठाई खाण्याचा आग्रह होतो. ज्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होतो आणि तुमचे वजन वाढू लागते.
ताणतणाव –
ताणतणावामुळे जसे वजन कमी होते तसे अचानक वाढूदेखील शकते. लग्नानंतर नवे घर आणि नवीन माणसांमध्ये अॅडजस्ट होणं ही सोपी गोष्ट नक्कीच नाही. अचानक आपले आईवडील अथवा आपली माणसं सोडून नव्या घरात सेटल होताना जे मानसिक बदल होतात त्यामुळे मनात ताणतणाव वाढू लागतो. लग्नानंतर येणाऱ्या जबाबदाऱ्या त्यामुळे येणारा ताणही असतोच. मनात वाढणाऱ्या गुंत्यामुळे तुमचे वजन वाढू शकते.
सेटल झाल्याचा आनंद –
करिअर आणि लग्न हे प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय असतात. हे निर्णय बरोबर असतील तर तुमचे पुढील भविष्य चांगले ठरते. त्यामुळे नोकरी अथवा व्यवसायात सेटल झाल्यामुळे लग्नानंतरही मनाला एक प्रकारची स्थिरता येते. जर सर्व गोष्टी मनासारख्या असतील तर मनात सतत आनंदाची भावना निर्माण होते. मनाचे समाधानही तुमचे वजन वाढण्यासाठी कारणीभूत असू शकते. कारण त्यामुळे तुम्ही बिनधास्त होता आणि हवे तसे वागू लागता. ज्याचा परिणाम तुमच्या शरीरप्रकृतीवर दिसू लागतो. पण वजन कमी करण्यासाठी घरगुती उपायही तुम्ही करू शकता.
सेक्स लाईफ –
लग्नानंतर शारीरिक सुख अथवा सेक्समुळेही वजन वाढते असं म्हटलं जातं. कारण लग्नानंतर सेक्समुळे महिलांच्या शरीरात हॉर्मोनल बदल होतात. ज्याचा चांगला परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. मानसिक आणि शारीरिक आनंदामुळे तुमचे वजन झपाट्याने वाढण्याची शक्यता असते.
Weight Loss Tips: 3 टिप्स करतील लग्नापूर्वी तुमचे वजन कमी
फिटनेसकडे दुर्लक्ष –
लग्नानंतर अचानक तुमच्या जबाबदाऱ्या वाढू लागतात. घर, संसार, नातेवाईक, जबाबदाऱ्या, नोकरी, कामाचा ताण, लग्नानंतरचे विधी अथवा कार्यक्रम यामुळे काही जणी फिटनेसकडे दुर्लक्ष करू लागतात. डाएट न पाळणं, व्यायामाचा अभाव आणि आहारात झालेले बदल यामुळे तुमचे अचानक वजन वाढण्याची शक्यता असते.
वजन कमी करायचं ठरवलेलं असूनही कुठे अडतं