वाळा (Wala) एक गवत वर्गातील सुंगधित औषधी वनस्पती आहे. काही जण वाळ्याला खस असंही म्हणतात. इंग्रजीमध्ये या वनस्पतीला Vetiver असं म्हणतात. उन्हाळ्यात खास खसचं सरबतही बनवलं जातं. खस सरबत हे उन्हाळ्यात शरीराला कुलिंग इफेक्ट देणारं अप्रतिम असं पेय मानलं जातं. या काळात खसचं अथवा वाळ्याचं पाणी पिण्यामुळेही तुमचं शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. कारण उन्हाची काहिली वाढू लागताच तुम्ही कितीही पाणी प्यायला तरी तुम्हाला सतत तहान लागत राहते. अशा वेळी जर तुम्ही फ्रीजमधलं थंड पाणी प्यायला तर तुम्हाला थोडावेळ बरं वाटतं मात्र तहान लागण्याचं प्रमाण नेहमीपेक्षा जास्त वाढतं. मात्र वाळा घातलेलं पाणी तुम्ही या काळात पिण्याची सवय लावली तर तुमची तहान तर भागतेच शिवाय शरीरातील उष्णताही कमी होते.
वाळा घातलेल्या पाण्याचे फायदे
वाळा घातलेल्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर अॅंटि ऑक्सिडंट असतात. शिवाय या पाण्यामुळे तुमची रोग प्रतिकार शक्ती वाढते. तसंच फ्री रेडिकल्सपासून होणारं शरीरातील उती, पेशी आणि अवयवांचे नुकसान टाळता येतं. वाळ्यात मोठया प्रमाणावर झिंक असल्याने तुमच्या डोळ्यांना थंडावा मिळतो आणि डोळ्यांच्या समस्या आणि जळजळ कमी होते. शिवाय वाळ्यामध्ये लोह, मॅंगनीज आणि व्हिटॅमिन बीदेखील असतं, ज्यामुळे तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण सुधारतं आणि रक्तदाब नियंत्रित होतो. रक्तदाब नियंत्रित झाल्यामुळे ह्रदयाचे कार्य सुरळीत होते. त्वचेचा पोत सुधारल्यामुळे उन्हाळ्यातही तुम्ही टवटवीत दिसता. एवढंच नाही तर या काळात वारंवार होणारं युटीआय अथवा मूत्रमार्गातील इनफेक्शन टाळण्यासाठी, तीव्र ताप कमी करण्यासाठी वाळ्याचं पाणी खूप फायदेशीर ठरतं.
वाळ्याचं पाणी कसं तयार करावं
खस अथवा वाळा तुम्हाला कोणत्याही आयुर्वेदिक औषधी मिळणाऱ्या दुकानांमध्ये उपलब्ध असतो. वाळ्याचा सुकलेल्या या मुळांचा वापर तुम्ही तुमच्या नेहमीच्या पिण्याच्या पाण्यात करू शकता. यासाठी फॉलो करा या स्टेप्स
- सर्वात आधी वाळ्याची मुळं स्वच्छ धुवून घ्या.
- पिण्याचं पाणी असलेल्या भांड्यात वाळा रात्रभर भिजत ठेवा
- दिवसभर तुम्ही वाळ्याचं पाणी पिऊ शकता. नेहमीपेक्षा या पाण्याची चव मधुर आणि चविष्ट लागते.
- तीन दिवसानंतर तुम्ही पुन्हा पाण्यातून वाळा बाहेर काढून उन्हात चांगला सुकवून घ्या.
- त्यानंतर कमीत कमी तीन वेळा तुम्ही याच मुळांचा पुर्नवापर तुम्ही करू शकता.
- तीन ते चार वेळा वापरल्यानंतर या वाळ्याचा नैसर्गिक स्क्रबरप्रमाणे त्वचा स्वच्छ करण्यासाठी वापर करा ज्यामुळे ती वाया जाणार नाहीत.
सेलिब्रेटी आहारतज्ञ्ज रुजूता दिवेकर या देखील वेळोवेळी सोशल मीडियावर वाळ्याचं महत्त्व सांगताना दिसतात,
सूचना – शक्य असल्यास मातीच्या भांड्यात म्हणजेच माठात ठेवलेल्या पाण्यात वाळा घालणे जास्त चांगले. ज्यामुळे तुम्हाला थंडगार आणि नैसर्गिक पद्धतीने शरीरासाठी अतिशय उपयुक्त असं पाणी उन्हाळ्यात पिता येईल.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक