फळांचा राजा आंबा सध्या प्रत्येकाच्या घरी विराजमान झालेला आहे. सीझन संपण्यापूर्वी प्रत्येकजण आंब्यावर अक्षरशः ताव मारत असणार. उन्हाळ्यात हे रसदार आणि चविष्ट फळ खाण्याची मजाच काही और आहे. पण आंबे खाण्याआधी अर्धा तास भिजत ठेवायचे असतात हे तुम्हाला माहीत आहे का ? प्राचीन काळापासून आंबे खाण्याची ही पद्धत घरात सांगितली जाते. मात्र असं केल्याने शरीराला काय फायदा होतो हे प्रत्येकाला आंबे खाण्यापूर्वी माहीत असायलाच हवं. यासाठी जाणून घ्या यामागचं वैज्ञानिक कारण
खाण्यापूर्वी का भिजवतात पाण्यात आंबे
आजी अथवा आई नेहमी आंबे खायला देण्यापूर्वी ते पाण्यात भिजत ठेवतात. यामागे खरंतर वैज्ञानिक कारण आहे. कारण प्रत्येक फळामध्ये काही विशेष गुणधर्म असतात. ज्यामुळे तुमच्या शरीरातील कार्यावर त्याचा लगेच परिणाम होण्याची शक्यता असते. आंबा हे उष्ण गुणधर्माचे फळ आहे. पाण्यात भिजत ठेवल्यामुळे त्याची उष्णता कमी होण्यास मदत होते. शिवाय आंबा पाण्यात भिजत ठेवून नंतर खाण्यामुळे बद्धकोष्ठता, त्वचेच्या समस्या, डोकेदुखी अथवा जुलाब असे त्रास होत नाहीत. यासोबतच वाचा उन्हाळ्याच्या दिवसात आंबा खाण्याचे फायदे (Aam Panna Benefits In Marathi)
आंबे पाण्यात भिजवून खाणं खरंच आहे का गरजेचं
आंबे पाण्यात भिजवून खावेत असं आयुर्वेदात सांगण्यात आलेलं आहे. कारण असं केल्याने त्यातील अतिरिक्त फायटिक अॅसिड बाहेर पडण्यास मदत होते. आंबा आपण उन्हाळ्यात खातो, कारण हा आंब्याचा खास सीझन असतो. मात्र या काळात तुमच्या शरीरातील तापमान वाढल्यामुळे खूप गरम होत असतं, अशात आंबे खाल्ले तर शरीरात उष्णता वाढण्याची शक्यता असते. जर असं झालं तर तुमच्या पचन शक्तीवर याचा परिणाम होतो, बऱ्याच लोकांना जास्त आंबे खाण्यामुळे जुलाब अथवा त्वचेच्या समस्या होण्याची शक्यता असते. पण जेव्हा तुम्ही आंबे पाण्यात भिजत ठेवता तेव्हा नैसर्गिक पद्धतीने आंब्यातील उष्णता कमी होते आणि त्यातील पौष्टिक घटक शरीराला मिळतात. म्हणूनच आंबे पाण्यात भिजत ठेवून मग खाणे आरोग्यासाठी लाभदायक ठरते.
आंबे पाण्यात कितीवेळ भिजत ठेवावे ?
खाण्यापूर्वी आंहबे अर्धा तास ते दोन तास आंबे पाण्यात भिजत ठेवले तर ते आरोग्यासाठी लाभदायक ठरतात. आंब्यात असलेली उष्णता पाण्यात नैसर्गिक पद्धतीने सामान्य पातळीवर जाते. अतिरिक्त उष्णता पाण्यातून बाहेर पडल्यामुळे आंबा आतून सामान्य पातळीवर उष्ण राहतो. त्यामुळे अर्धा तास जर तुम्ही पाण्यात आंबा ठेवला तर हीट कमी करण्याची प्रोसेस व्यवस्थित होण्यास मदत होते. त्यानंतर पाण्यातून काढून तुम्ही आंबा खाऊ शकता अथवा आंब्यापासून आमरससारखे इतर पदार्थ बनवू शकता. म्हणूनच कमीत कमी अर्धा तास तरी आंबा पाण्यात भिजत ठेवा आणि मगच खा.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक