सणासुदीचे दिवस जवळ आले की घरात पंचपक्कान्नांचे बेत ठरतात. बऱ्याचदा यासाठी घरात पुरी, भजी,वडे अशा तळलेल्या आणि चमचमीत पदार्थांची फर्मांइश होते. कधी कधी खास प्रसंगी घरात बटाटेवडे, साबुदाणा वडे, समोसे असे पदार्थही केले जातात. मात्र असे पदार्थ करताना कढईत भरपूर तेल घ्यावे लागते. पदार्थ तळून झाल्यावर कढईत खूप तेल तसेच उरते. मग गृहिणी ते तेल फेकून न देता त्याचा पुर्नवापर करतात. जसं की, पापड तळण्यासाठी, फोडणी देण्यासाठी अथवा पोळ्यांना लावण्यासाठी असं तेल वापरलं जातं. तेल वाया जावू नये हा त्यामागचा उद्देश असते. मात्र असं तळण्यासाठी वापरलेलं खाद्यतेल पुन्हा स्वयंपाकासाठी वापरणं आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. जाणून घ्या कारण
पुन्हा पुन्हा का वापरू नये खाद्यतेल
अनेक संशोधनात असं आढळून आलं आहे की, एकदा वापरलेलं तेल पुन्हा स्वयंपाकासाठी वापरल्यामुळे त्यात फ्री रेडिकल्स निर्माण होतात. ज्यामुळे गंभीर आरोग्य समस्या निर्माण होण्याचा धोका वाढतो. तेल गरम करताना त्यातील वसा अणू ब्रेक होतात. ज्यामुळे तेलातून एक प्रकारचा उग्र वास येण्यास सुरूवात होते. अती उच्च तापमानावर तापवलेले तेल पुन्हा वापरण्यासाठी मुळीच योग्य राहत नाही.असं तेल वापरण्यामुळे तुमचे इतर खाद्य पदार्थही खराब होतात. ज्याचा तुमच्या आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते.
स्वयंपाकानंतर किचन स्वच्छ करायला नाही लागणार वेळ, फॉलो करा या टिप्स
अॅसिडि़टी होण्याची शक्यता
वापरलेलेल तेल स्वयंपाकात वापरण्यामुळे तुमच्या पचनशक्तीवर परिणाम होतो. ज्यामुळे तुम्ही खाल्लेले अन्न लवकर पचवू शकत नाही. पचनशक्ती नाजूक झाल्यामुळे पोटाचे अनेक विकार होण्याची शक्यता वाढते. यासाठीच जर तुम्हाला वारंवार अॅसिडिटीचा त्रास होत असेल तर तेलाचा पुर्नवापर करू नका.
कर्करोग होण्याचा धोका वाढतो
वापरलेले तेल पुन्हा स्वयंपाकासाठी वापरणं हे कर्करोगासारख्या गंभीर आजारांना आमंत्रित करणारे ठरू शकते. कारण त्यामध्ये फ्री रेडिकल्स निर्माण झालेले असतात. ज्यामुळे पोटाचा कर्करोग, यकृताचा कर्करोग होण्याची शक्यता असते. यासाठीच पुन्हा पुन्हा तळलेले तेल वापरू नका.
रोजच्या स्वयंपाकासाठी अर्ध्या तासात तयार होतील असे झटपट पदार्थ
ह्रदयाचे आरोग्य बिघडते
तेल गरम करताना त्यातील पोषक मुल्ये नष्ट होतात. ज्यामुळे एकदा तळलेल्या तेलात शरीरासाठी पोषक असे काहीच नसते. त्यात जमा झालेले ट्रान्स फॅट्स शरीरात गेले तर ह्रदयाच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढते. कोलेस्ट्रॉल वाढल्यास गंभीर ह्रदयरोग यामुळे निर्माण होऊ शकतात.
मोहरी तेलाचे फायदे, तुम्हीही व्हाल थक्क (Mustard Oil Benefits In Marathi)