हिवाळा संपता संपता अचानक थंडी वाढू लागली आहे. त्यामुळे थंडीपासून बचाव करण्यासाठी लोकरीचे कपडे वापरणं हा एक सोपा उपाय आहे. लोकरीच्या कपड्यांमुळे अंगात उष्णता निर्माण होते आणि थंडीपासून बचाव होतो. मात्र रात्रीच्या वेळी थंडीचा जोर नेहमीपेक्षा जास्त असतो. त्यामुळे रात्री झोपतानाही अनेकजण लोकरीचे कपडे घालूनच झोपतात. मात्र असं करणं आरोग्यासाठी मुळीच योग्य नाही. कारण रात्री झोपताना लोकरीचे कपडे घालणं तुमच्यासाठी नक्कीच धोक्याचं ठरू शकतं.
रात्री लोकरीचे कपडे घालण्याचे दुष्परिणाम
रात्री झोपताना अंगावर ब्लॅंकेट अथवा जाड गोधडी अंगावर घेणं सोयीचं ठरतं. कारण त्यामुळे तुम्हाला थंडी लागत नाही. अनेक जण तर रात्री अंगात स्वेटर, कानटोपी, हातमोजे, पायमोजे, पायात थर्मल घालून मग झोपतात. असं केल्यामुळे तुमचा थंडापासून बचाव होतो मात्र आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार थंडीत तुमच्या अंगातील रक्तवाहिन्या संकुचित होतात. असे गरम कपडे घालून झोपल्यामुळे अस्वस्थता, भीती, ब्लडप्रेशरचा त्रास होण्याची शक्यता असते. जर अशा स्थितीतही अंगातील लोकरीचे कपडे तसेच ठेवले तर गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. एवढंच नाही लोकरीचे कपडे सतत घालून झोपण्यामुळे तुमच्या त्वचेवरही दुष्परिणाम होऊ शकतात.
काखेतून येतोय घामाचा दुर्गंध, करा सोपे घरगुती उपाय (How To Get Rid Of Underarms Smell)
ह्रदयरोगाचा धोका
गरम कपडे घातल्यामुळे शरीरात हवा खेळती राहत नाही. ऑक्सिजनचा पूरवठा होण्यासाठी त्वचेला आणि शरीराला पुरेशा हवेची गरज असते. शरीरात निर्माण होणारे तापमान यामुळे शरीरात अडकून पडते. हवा खेळती नसल्यामुळे त्या व्यक्तीला ह्रदयरोगाचा धोका निर्माण होतो. कारण असं केल्यामुळे रक्ताभिसरण योग्य पद्धतीने होत नाही आणि शरीराचे तापमान प्रमाणापेक्षा जास्त वाढू शकतं. अशा परिस्थितीत त्या व्यक्तीला ह्रदय विकार आणि हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते.

इनफेक्शनचा वाढण्याची शक्यता
लोकरीचे कपडे आणि पायमोजे घातल्यामुळे अंगात अती प्रमाणात घाम निर्माण होतो. सुती कपडे अंगातील घाम शोषून घेतात आणि हवा खेळती ठेवतात. मात्र लोकरीचे कपडे अंगातील घाम शोषून घेऊ शकत नाही. त्यामुळे अंगावर इनफेक्शन वाढण्याची शक्यता असते. यासाठी रात्री झोपताना लोकरीचे कपडे घालण्यापेक्षा सुती आणि आरामदायक कपडे वापरा.
रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी उच्च रक्तदाब आहार (High Blood Pressure Diet In Marathi)
त्वचेवर होणारा परिणाम
गरम कपड्यांमुळे तुमच्या त्वचेवर एलर्जी होऊ शकते. कारण लोकरीचे कपडे जाड आणि खरखरीत असतात. ज्यामुळे तुमच्या मऊ त्वचेचं नुकसान होते. शिवाय असे कपडे सुकण्यास वेळ लागत असल्यामुळे ते दररोज धुतले जात नाहीत ज्यामुळे अशा कपड्यांमधून तुमच्या त्वचेला इनफेक्शन होण्याची शक्यता असते. घामाची दुर्गंधी घालवण्यासाठी ‘करा हे’ उपाय (Tips To Avoid Sweaty Smell)