वातावरणात सतत बदल होत असतात. कधी पाऊस, कधी गारवा तर कधी चक्क कडक ऊन. या बदलणाऱ्या वातावरणाचा तुमच्या त्वचेवर परिणाम होत असतो. हिवाळ्यातील थंड वातावरणाचा सर्वात जास्त परिणाम होतो तो तुमच्या नाजूक आणि मुलायम ओठांवर. कारण ओठांची त्वचा ही इतर त्वचेपेक्षा जास्त कोमल आणि नाजूक असते. त्यामुळे अती थंड अथवा अती उष्ण वातावरणामुळे तुमचे ओठ लवकर फुटतात. ओठ कोरडे पडणे. ओठ फुटणे अथा ओठातून रक्त येणं या समस्येवर वेळीच उपाय करणं गरजेचं आहे. यासाठीच बदलत्या वातावरणात ओठांची काळजी कशी घ्यायची हे जरूर वाचा.
ओठांची काळजी घेण्यासाठी आपण ओठ फुटल्यावर फक्त लीपबाम लावतो. मात्र ओठांची काळजी घेण्यासाठी आधी ओठ फुटण्याची कारणं आपल्याला माहीत असायला हवी. ज्यामुळे ओठांची काळजी घेणं सोपं जाईल.
कोणत्याही ऋतूमध्ये ही समस्या जाणवू शकते. वास्तविक वातावरणात अचानक बदल झाल्यास ही समस्या जाणवते. कारण तुमच्या ओठांची त्वचा अतीशय संवेदनशील असते. वातावरणात आलेल्या कोरडेपणामुळे तुमच्या ओठांमधील ओलावा कमी होतो आणि ओठ कोरडे पडतात. या समस्येपासून वाचण्यासाठी ओठांना सतत मॉश्चराईझ ठेवण्याची गरज असते. नियमित ओठांवर लिपबाम लावून तुम्ही तुमच्या ओठांची काळजी घेऊ शकता. लक्षात ठेवा तुमच्या ओठांच्या कडा आणि दोन्ही कोपरे मॉश्चराईझ होतील अशा पद्धतीने लिपबाम ओठांवर लावा. शिवाय तुमच्या लिपबाममध्ये सुर्यकिरणांपासून संरक्षण करणारे घटक आहेत का याची विशेष काळजी घ्या. जसं की, व्हिटॅमिन ए, सी आणि इ तुमच्या लिपबाममध्ये असेल तर तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. मऊ ओठांसाठी उच्च हाय शाईन लिपग्लॉस ट्राय करा.
Shutterstock
हिवाळ्यात अथवा हवेत कोरडेपणा निर्माण झाला की त्याचा परिणाम तुमच्या त्वचेवर होतो. ज्यामुळे ओठ लवकर फुटतात. सतत ए.सी. मध्ये काम केल्यामुळेदेखील तुमचे ओठ फुटू शकतात. यासाठी रात्री झोपताना नेहमी चांगल्या गुणवत्तेचं लिप ग्लॉस आणि लिपबाम लावण्याची सवय करा. शिवाय घरातील अथवा ऑफिसमधील वातावरण बाहेरच्या वातावरणाशी मिळतंजुळतं ठेवण्याचा प्रयत्न करा.
ओठ कोरडे झाले अथवा ओठ फुटले की ओठांतून रक्त येण्याची समस्या आवर्जून जाणवते. याचे कारण कोरडेपणामुळे तुमच्या ओठांमधील त्वचेमधील लवचिकता आणि कोलेजन कमी होते. कधी कधी वयोमानानुसार अथवा अती धुम्रपान केल्यामुळेदेखील तुमच्या ओठांतून रक्त येण्याची शक्यता असते. बऱ्याचदा ओठांवर लिपस्टिक जास्त काळ टिकण्यासाठी लिपलायनर लावण्याची अनेकजणींना सवय असते. म्हणूनच जर तुम्हाला अशा गोष्टींची सवय असेल तर ओठांची अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
काही जणींची त्वचा अतीशय संवेदनशील असते. ज्यामुळे त्यांच्या ओठांवर लगेच फोड येतात. एखादं व्हायरल इनफेक्शन, उष्ठ खाणं, एकमेकींची लिपस्टिक वापरणं अशा गोष्टींमुळे तुम्हाला तोंड येण्याची अथवा ओठांवर फोड येण्याची समस्या जाणवते. जर तुमची त्वचा संवेदशील असेल तर या गोष्टी टाळा जेणेकरून तुमच्या ओठांची काळजी घेणं तुम्हाला नक्कीच शक्य होईल.
जेव्हा प्रश्न तुमच्या ओठांची काळजी घेण्याचा असतो तेव्हा फक्त लिपबाम लावून तुम्ही थांबू शकत नाही. जर तुम्हाला वारंवार ओठांच्या समस्या जाणवत असतील तर तुम्ही या समस्या येऊ नयेत यासाठी आधीच काळजी घेतली पाहिजे. तुम्ही जर डेली स्कीन केअर रूटीनमध्ये लिपबाम आणि लिपकेअरचा समावेश केला तर तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो. मात्र चांगला परिणाम दिसण्यासाठी सतत प्रयत्नही करायला हवेत. यासाठी हे उपाय जरूर करा.
ओठांची त्वचा इतर त्वचेपेक्षा नाजूक असते. ओठावर जर येणे उपाय आपल्यांपैकी बरेच जणांना हवाच असतो. शिवाय तिची काळजी घेण्यासाठी नैसर्गिक संरक्षण व्यवस्था नाही. जसं की डोळ्यांवरील पापण्या डोळ्यांची काळजी घेतात. तशी कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे तुम्हालाच तुमच्या ओठांची काळजी घ्यायची आहे. यासाठीच ओठांवरून जीभ फिरवू नका. कारण त्यामुळे तात्पूरते ओठ ओले होतात. ओठांवर ओलावा आल्यामुळे तुम्हाला त्याक्षणी बरं वाटतं. मात्र यामुळे जीभेवरील लाळ तुमच्या ओठांना लागते. ज्यामुळे ओठ लवकर सुकतात. असं केल्यामुळे तुमच्या ओठांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते.
Shutterstock
नियमित पौष्टिक आणि संतुलित आहार घेण्याचा तुमच्या त्वचा आणि संपूर्ण शरीरावर चांगला परिणाम होतो. अन्नातील व्हिटॅमिन आणि इतर पोषक घटतांमुळे तुमच्या त्वचेचं रक्षण होतं. म्हणूनच सुंदर दिसायचं असेल आणि ओठांचा मुलायमपणा कायम राखायचा असेल तर नियमित योग्य आहार घ्या.
शरीराला शारीरिक कार्य सुरळीत सुरू ठेवण्यासाठी पाण्याची गरज असते. मानवी शरीर सत्तर टक्के पाण्याने तयार झालेले आहे. यासाठीच नियमित आणि मुबलक पाणी पिण्यामुळे तुमचे आरोग्य उत्तम आणि त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते. पाणी पिण्याचा विसर होत असेल तर दर पंधरा मिनीटांचा अथवा अर्धा तासांचा अलार्म लावा आणि थोडे थोडे पाणी प्या.
आजकाल ऑफिस अथवा घराबाहेर पडताना मेकअप करणं अपरिहार्य झालं आहे. कारण मेकअपमुळे तुमचं मुळ सौंदर्य अधिक खुलून दिसतं. मात्र दररोज मेकअप करण्याचे तोटेदेखील आहेत. जर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील मेकअप वेळच्यावेळी आणि व्यवस्थित काढला नाही तर त्याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. यासाठी चेहऱ्यावरील मेकअप विशेषतः ओठांवरील लिपस्टिक नीट रिमूव्ह करा. मेकअप रिमूव्ह करण्यासाठी एका कॉटन पॅडवर थोडंसं कच्चं दूध, नैसर्गिक तेल अथवा बाजारात मिळणारं क्लिन्झिंग मिल्क, मेकअप रिमूव्हर घ्या आणि हलक्या हाताने मेकअप काढा. मेकअप काढल्याशिवाय रात्री मुळीच झोपू नका. शिवाय मेकअप काढल्यावर चेहरा स्वच्छ धुवा आणि चांगलं नाईटक्रीम अथवा मॉश्चराईझर चेहऱ्यावर लावा आणि मगच झोपा. ओठांवर लिपबाम लावण्यास विसरू नका.
सकाळी जेव्हा तुम्ही जागे होता तेव्हा तुम्हाला तुमचे ओठ कोरडे झाले आहेत असं नक्कीच जाणवत असेल. ओठांचा हा कोरडेपपणा कमी करण्यासाठी झोपताना ओठांवर हायड्रेटिंग क्रीम लावून झोपण्याची सवय लावा. ए.सी.मध्ये झोपल्यामुळे तुमचे ओठ कोरडे पडतात पण जर तुम्ही पेट्रोलियम जेली अथवा तूप ओठांवर लावलं तर तुमचे ओठ सुकणार नाहीत.
Shutterstock
ओठांना मॉश्चराईझिंगची गरज अधिक असते. कारण आधीच सांगितल्याप्रमाणे तुमच्या ओठांची त्वचा इतर त्वचेपेक्षा अधिक नाजूक असते. यासाठी दररोज तुमच्या ओठांवर पाच मिनीटे तेलाने मसाज करा. यासाठी तुम्ही नारळाचे तेल, ऑलिव्ह ऑईल, बदामाचे तेल वापरू शकता. चांगला परिणाम साधण्यासाठी रोज ओठांना तेल लावा. ओठांवर तेलाने मसाज केल्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि ओठांचे आरोग्य वाढते.
लिपकेअर मधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्क्रबिंग. कारण स्क्रब केल्यामुळे तुमच्या ओठांवरील डेडस्कीन निघून जाते. ज्यामुळे ओठांची त्वचा स्वच्छ आणि निरोगी होते. ओठांना वारंवार इनफेक्शन होत नाही. यासाठी तुम्ही एखादं सौम्य स्क्रब ओठांवर लावा. शिवाय तुम्ही तुमच्या ओठांची काळजी घेण्यासाठी मध, साखरेचा वापर करून घरच्या घरीदेखील एखादं स्क्रब तयार करू शकता.
आजकाल वातावरणात सतत बदल होत असतात. कोणत्याही ऋतूमध्ये वातावरण बदलत असते. यासाठीच तुमच्या बॅगेत लिपबाम ठेवण्याची सवयच लावा. कधी कधी कडक उन्हातून ए.सी. मध्ये गेल्यामुळे अथवा ए.सी. मधून उन्हात गेल्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. यासाठीच लिपबाम बॅगेत ठेवण्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
लिपस्टिक ओठांवर लावा हे ऐकून तुम्हाला नक्कीच आनंद झाला असेल. कारण सर्वजण ओठांची काळजी घेण्यासाठी लिपस्टिक लावू नका असं सांगतात. मात्र लक्षात ठेवा आधी सांगितल्याप्रमाणे तुमच्या ओठांची काळजी घेण्यासाठी कोणतीच नैसर्गिक व्यवस्था शरीरात नाही. यासाठी ओठांवर लिपस्टिकचा लेअर असेल तर तुमच्या ओठांवर प्रदूषणाचा थेट परिणाम होणार नाही. लिपस्टिक तुमचे सुर्यकिरण, धुळ, प्रदूषण, सोसाट्याचा वारा यापासून संरक्षण करू शकते.
कधी कधी आपल्याला आपल्या ओठांची आता अधिक काळजी घ्यायची गरज आहे हेच समजत नाही. लक्षात येतं तेव्हा ओठ फुटलेले असतात. यासाठीच हिवाळा सुरू होण्यापूर्वी, थंड प्रदेशात जाण्यापूर्वी अथवा उन्हात जाण्यापूर्वीच ओठांची काळजी घ्या. ज्यामुळे नंतर त्रास होणार नाही. शिवाय जर तुमच्या ओठांच्या समस्या घरगुती उपचारांनी बऱ्या झाल्या नाहीत तर वेळेवर स्कीन स्पेशलिस्टचा सल्ला घ्यायला उशीर करू नका.
लिपकेअरसाठी प्रत्येकवेळी महागडे लिपबाम अथवा लिपकेअर उत्पादने वापरण्याची गरज आहे असं मुळीच नाही. यासाठी तुम्ही अगदी तुमच्या घरी तयार केलेले लिपबाम अथवा लिपमास्क वापरू शकता
गाजरामध्ये अनेक पोषकतत्त्वं असतात. ज्यामुळे गाजराचा तुमच्या त्वचेवर चांगला परिणाम होतो. गाजरामुळे तुमच्या ओठांचा गुलाबीपणा कायम राहतो आणि ओठ मुलायम होतात
काय कराल –
दोन ते तीन चमचे गाजराचा रस अथवा गर आणि अर्धा चमचा मध घ्या. हे मिश्रण एकजीव करा. हा लेप ओठांवर लावून अर्धा तासाने ओठ आणि चेहरा धुवून टाका. ज्यामुळे ओठांचा काळेपणा कमी होईल आणि ओठ मऊ मुलायम होतील.
एका संशोधनानुसार डाळिंबाच्या रसामुळे तुमच्या त्वचेतील काळपटपणा कमी होतो. कारण यामध्ये त्वचेवरील पिंगमेंटेशनला उजळ करण्याचे गुणधर्म असतात.
काय कराल –
एक चमचा डाळिंबाचा रस, एक चमचा गुलाबपाणी घ्या आणि त्याने तुमच्या ओठांवर हळूवारपणे मसाज करा. पंधरा मिनीटांनी थंड पाण्याने चेहरा धुवू टाका.
Shutterstock
मध आणि लिंबू या दोघांचा तुमच्या त्वचेवर चांगला परिणाम होतो. यासाठीच ओठांवर नियमित हा लिपमास्क लावल्यामुळे तुमच्या ओठांच्या समस्या हळूहळू कमी होतील.
काय कराल –
एक चमचा मध, अर्धा चमचा लिंबाचा रसाच एक ते दोन थेंब ग्लिसरीन मिसळा. हे मिश्रण कापसाच्या मदतीने तुमच्या ओठांवर लावा. आठवड्यातून एकदा हा उपाय केल्यामुळे तुम्हाला नक्कीच चांगला लाभ होईल.
गुलाब, गुलाबाच्या पाकळ्यांचा रस अथवा गुलाबपाणी तुम्ही तुमच्या सौंदर्य वाढवण्यासाठी वापरू शकता. ओठांचा काळेपणा कमी करण्यासाठी आणि ओठांची काळजी घेण्यासाठी गुलाबाचा वापर जरूर करा.
काय कराल –
पाच ते सहा गुलाबाच्या पाकळ्या आणि दोन चमचे कच्च दूध घ्या. दूधामध्ये गुलाबाच्या पाकळ्या बुडवून ठेवा. हे मिश्रण वाटून घ्या आणि ते मिश्रण तुमच्या ओठांवर लावा. वीस मिनीटांनी चेहरा स्वच्छ धुवा.
Shutterstock
चॉकलेटमध्ये त्वचेचे पोषण करण्याचे गुणधर्म असतात. ज्यामुळे तुमची त्वचा मऊ आणि उजळ दिसू लागते. शिवाय चॉकलेटमधील कॅफेनमुळे तुमची त्वचा डिटॉक्स होण्यास मदत होते. चॉकलेटचा वापर तुम्ही एका लिपबामप्रमाणे करू शकता.
काय कराल –
अर्धा चमचा मध, एक चमचा डार्क चॉकलेटची पावडर, अर्धा चमचा कोको पावडर आणि एक चमचा दूध एकत्र करा. हे सर्व मिश्रण एकत्र करून त्याचा एक लिपबाम तयार करून ठेवा. आठवडाभर झोपण्याआधी तो ओठांवर लावा आणि अर्धातासाने ओठ धुवा आणि झोपा.
ओठांची काळजी घेण्यासाठी घरात वापरण्यात येणारं बीटदेखील फार महत्त्वाचं आहे. कारण बीटामध्ये तुमच्या ओठांना सुरक्षित ठेवण्याचे अनेक घटक आहेत.
काय कराल –
बीटाच्या रसात मध, बदामाचे तेल अथवा तूप मिसळा आणि हळूवार पणे तुमच्या ओठांना मसाज करा. ओठ मऊ आणि मुलायम ठेवण्याचा हा एक सर्वात सोपा मार्ग आहे.
Shutterstock
नैसर्गिक बेरीजमध्ये भरपूर व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. ज्यामुळे जर तुम्ही स्टॉबेरीचा वापर ओठांसाठी केला तर तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो.
काय कराल –
स्टॉबेरी गर आणि मध एकत्र करा. त्यात काही थेंब ऑलिव्ह ऑईलचे टाका. आठवड्यातून एकदा हे मिश्रण तुमच्या ओठांवर लावा.
नक्कीच, विकतच्या लिपबामपेक्षा घरी तयार केलेले आणि नैसर्गिक पद्धतीने तयार केलेले लिपबाम अधिक परिणामकारक असतात.
हिवाळ्यात थंड हवेपासून संरक्षण होण्यासाठी ओठांची काळजी घेणं गरजेचं आहे. मात्र आजकाल प्रत्येक ऋतूत तुम्हाला ओठांची काळजी घेणं गरजेचं आहे. कारण वातावरणात सतत बदल होत असतात.
होय, रात्री झोपताना फॅन अथवा ए.सी.च्या हवेमुळे तुमचे ओठ कोरडे होण्याची शक्यता अधिक असते.
फोटोसौजन्य – शटरस्टॉक
अधिक वाचा –
घरच्या घरी फेसपॅक करण्याआधी तयार करा या फेसपॅक पावडर