ADVERTISEMENT
home / खाणंपिण आणि नाइटलाईफ
soup recipe

हिवाळ्यात बनवा गरमागरम सूप, खास रेसिपी

हिवाळा म्हटला की सकाळी सकाळी गरमागरम चहा आणि कॉफी तर हवीच. पण जेवणातही आपल्याला खास सूप (Soup) करून प्यावेसे वाटतात. इतर वेळी हॉटेलमध्ये जाऊन आपण पहिले कोणत्याही आवडीच्या सुप्सची ऑर्डर देत असतो. हिवाळ्याच्या दिवसात तुम्ही घरच्या घरी काही आरोग्यासाठी अप्रतिम असे सुप्स नक्कीच करून पिऊ शकता. तुम्हाला अशाच काही खास सुप्स रेसिपी आम्ही या लेखातून देणार आहोत. हिवाळ्याच्या दिवसात तुम्ही तुमच्या जेवणामध्ये असे चविष्ट आणि हेल्दी सुप नक्कीच समाविष्ट करून घ्या आणि थंडीचा आनंद सुपाचा आस्वाद घेत लुटा. 

अधिक वाचा – तोंडाला पाणी आणणारे अप्रतिम तांदळाचे पदार्थ, रेसिपी मराठीत (Rice Recipes In Marathi)

कॉर्न सूप (Corn Soup recipe in Marathi)

कॉर्न सूप (Corn Soup recipe in Marathi)

लागणारे साहित्य 

  • 1 कणीस 
  • 1 मिरची
  • अर्धा चमचा जिरे पूड 
  • अर्धा चमचा मिरी पूड 
  • अर्धा चमचा काळं मीठ 
  • चवीनुसार मीठ 
  • एक चमचा गाजराचे लहान तुकडे (अथवा काप)
  • कोथिंबीर
  • अर्धा चमचा अमूल बटर 
  • एक चमचा लिंबाचा रस 

बनविण्याची पद्धत 

ADVERTISEMENT
  • पहिल्यांदा कणसाचे दाणे काढून स्वच्छ धुवून घ्या. मिक्सरमध्ये मिरची आणि कणसाचे दाणे एकत्र करून त्याची पेस्ट करून घ्या
  • मिक्सरमधून बारीक करून घेतलेली पेस्ट बाऊलमध्ये काढा आण त्यात थोडे पाणी मिक्स करून चाळणीतून गाळून घ्या. यामुळे त्यातला असलेला चोथा निघून जातो आणि सूप पिताना कणसाचे दोरे तोंडात येत नाहीत
  • पॅन गॅसवर ठेवा. त्यात बटर टाकून वितळू द्या. त्यानंतर त्यात गाजराचे काप आणि थोडे कणसाचे दाणे परतून घ्या. नंतर केलेली कणसाची पेस्ट त्यामध्ये ओता. त्यात वरून मीठ ,जिरेपूड, मिरपूड आणि त्यात चवीला थोडीशी साखर घाला. आपल्याला हवे तेवढे पातळ होईल या अंदाजाने पाणी घालून उकळून घ्या
  • उकळल्यानंतर वरून कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालून एकदा ढवळून घ्या आणि गरमागरम कॉर्न सूप सर्व्ह करा. हवं तर वरून थोडं बटर अजून घाला

ड्रमस्टिक सूप (Drumstick Soup recipe in Marathi)

ड्रमस्टिक सूप (Drumstick Soup recipe in Marathi)

लागणारे साहित्य 

  • 4 शेवग्याच्या शेंगा
  • 1 चमचा तूप
  • अर्धा चमचा जीरे पावडर
  • मीठ चवीनुसार

बनविण्याची पद्धत 

  • पहिल्यांदा शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवा आणि त्याची थोडीशी साले काढून त्याचे तुकडे करून घ्या 
  • एका पातेल्यात पाणी घेऊन त्याला उकळी आणा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात शेवग्याच्या शेंगा घाला. मंद आचेवर या शेंगा तुम्ही शिजवा 
  • शेवग्याच्या शेंगा शिजल्यानंतर त्यातील पाणी वेगळे करून चमच्याने आतील गर काढा आणि मिक्सरमध्ये वाटून घ्या
  • आता एका पातेल्यात तूप गरम करा. तूप गरम झाल्यावर त्यामध्ये मिक्सरमधून वाटलेला शेंगांचा गर आणि बाजूला काढून ठवलेले शेंगांचे पाणी घालावे. वरून यात मीठ आणि जीरे पावडर घालून एक चांगली उकळी आणा
  • कोथिंबीर घालून ड्रमस्टिक सूप सर्व्ह करावे. आवडत असेल तर यात अर्धा चमचा लिंबाचा रस घालू शकता अथवा वरून तुम्ही बटरही घालू शकता 

वाचा – महाराष्ट्राची खासियत स्वादिष्ट पोपटी रेसिपी

क्रिमी मशरूम सूप (Creamy Mushroom Soup)

क्रिमी मशरूम सूप (Creamy Mushroom Soup)

लागणारे साहित्य 

ADVERTISEMENT
  • 1 चमचा कॉर्नफ्लावर
  • 1-2 चमचे फ्रेश क्रिम
  • 100 ग्रॅम दूध
  • 1 चमचा लिंबाचा रस
  • 1-2 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर
  • 1 पॅकेट मशरूम
  • चवीनुसार मीठ
  • 1-2 चमचे बटर
  • ५-७ लसणाच्या पाकळ्या
  • 1/2 इंच आले
  • 1-2 चमचे मिरपूड

बनविण्याची पद्धत 

  • पहिल्यांदा मशरूमसाठी लागणारे साहित्य हे एका ताटात काढून ठेवा, मशरूम बारीक कापा आणि लसूणही बारीक चिरून घ्या. त्याचबरोबर आले किसून घ्या
  • पॅनमध्ये बटर गरम करा. ते झाल्यानंतर त्यात लसूण-आलं परतून घ्या. त्यानंतर त्यात चिरलेले मशरूम, मिरपूड, मीठ एकत्र घाला आणि  शिजवा. 2-3 मिनिटे झाकण ठेवा आणि शिजू द्या
  • झाकण काढल्यावर परत २ मिनिटे मशरूम शिजवा. थोडे मशरूम पॅनमध्ये ठेवा आणि बाकीचे मशरूम मिक्सर जारमध्ये घाला. त्यामध्ये दूध घालून त्याची पेस्ट तयार करा
  • मशरूम असलेल्या पॅनमध्येच मशरूमची तयार केलेली पेस्ट मिक्स करा आणि ढवळत राहा. साधारण एक उकळी काढा याची काढा. त्यात चिरलेली कोथिंबिर आणि क्रिम मिक्स करून गॅस बंद करा. तुमचे क्रिमी मशरूम सूप पिण्यासाठी तयार आहे (मशरूम सूप पातळ वाटल्यास कॉर्नफ्लावरची पेस्ट करून मिक्स करा)
  • गरमगरम क्रिमी मशरूम सुप लहान बाऊलमध्ये काढा. त्यात वरून क्रिम आणि चिरलेली कोथिंबिर पेरा आणि सर्व्ह करा. तर डेकोरेशनसाठी बाजूला मशरूम, आले, लसूण पाकळ्यांचा वापर करा 

तुम्हालाही या रेसिपी आवडल्या असतील तर नक्की शेअर करा आणि या थंडीमध्ये नक्की हे सुप्स तुम्ही घरी तयार करून मस्तपैकी सुट्टीचा आणि थंडीचा आनंद लुटा. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

01 Dec 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT