जगभरात 7 जुलै हा दिवस जागतिक चॉकलेट दिन म्हणून साजरा केला जातो. युरोपमध्ये 1950 साली पहिल्यांदा चॉकलेट दिन साजरा केला गेला. त्यानंतर देशभरात हा दिवस जागतिक चॉकलेट दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. या वर्षी कोरोना महामारीमुळे चॉकलेट दिनाची धूम काही प्रमाणात नक्कीच कमी झाली आहे. मात्र तुम्ही घरच्या घरी चॉकलेट दिन नक्कीच साजरा करू शकता.
चॉकलेट दिनाचा इतिहास
चॉकलेट बनवण्यासाठी युरोपमध्ये 2000 सालाच्या आधीच कोकोच्या बियांचा शोध लावण्यात आला होता. अमेरिकेतील रेन फॉरेस्टमध्ये कोकोची झाडे होती. कोकोच्या फळांमधील बियांपासून चॉकलेट बनवण्यात येत असे. सर्वात आधी मॅक्सिको आणि मध्य अमेरिकेतील लोकांनी चॉकलेट बनवण्याचा शोध लावला होता. पण जेव्हा 1528 साली स्पेनने मॅक्सिकोवर वर्चस्व मिळवलं. तेव्हा तत्त्कालिन राजाने मॅस्किकोमधील सर्व कोकोच्या झाडांपासून चॉकलेट बनवलं, त्यानंतर कोकोच्या बिया आणि चॉकलेट बनवण्याची यंत्रे घेऊन स्पेनला रवाना झाला. काहीच दिवसांमध्ये स्पेनमधील श्रीमंत वर्गात चॉकलेट ड्रिंक लोकप्रिय झालं. सुरुवातील लोकांना चॉकलेटचा वास उग्र वाटत असे. म्हणून तो सौम्य करण्यासाठी मध, व्हॅनिला आणि साखरेचा वापर त्यात करून चॉकलेटची कोल्ड कॉफी बनवली जात असे. त्यानंतर त्यावर अनेक संशोधने करत ते पिण्यायोग्य ड्रिंकमध्ये तयार करण्यात आले. आजही लोक या ड्रिंकला कॅडबरी ड्रिंक नावाने ओळखतात. 1828 मध्ये कॉनराड जोहान्स वान हॉटने कोको प्रेस नावाचं यंत्र बनवलं ज्यामुळे कोकोची बदलली पुढे 1848 मध्ये जे. एर फ्राय अॅंड सन्स या ब्रिटिश कंपनीने कोकोमध्ये बटर, दूध आणि साखर घालून चॉकलेट बार स्वरूपात पदार्थ बनवून विकण्यास सुरूवात केली. तेव्हापासून जगभरात चॉकलेटचा प्रसार झाला.
कसा साजरा करतात जागतिक चॉकलेट दिन
चॉकलेट दिवस जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी नातेवाईक, मित्रमंडळी, प्रियजनांना चॉकलेट भेट स्वरूपात दिले जाते. ज्यामुळे वर्षभरात चॉकलेट दिनाच्या दिवशी सर्वात जास्त चॉकलेट विक्री केले जाते. तुम्ही तुच्या आवडीचे चॉकलेट जसं की, दूध चॉकलेट, हॉट चॉकलेट, चॉकलेट बार, चॉकलेट केक, चॉकलेट ड्रिंक तुमच्या आवडीच्या लोकांना बनवून देऊ शकता. चॉकलेट ही एक अशी गोष्ट आहे जी पाहताच समोरच्या व्यक्तीचा मूड पटकन आनंदी होतो. चॉकलेटचा तुमच्या ह्रदयावर चांगला परिणाम होत असल्यामुळे चॉकलेटचा संबध प्रेमाशी जोडला जातो. प्रिय व्यक्तीसोबत जोडलं जाण्यासाठी त्याला चॉकलेट भेट देण्याची पद्धत आहे.
का खायला हवं चॉकलेट
चॉकलेट चवीला जितकं स्वादिष्ट लागतं तितकंच ते तुमच्या आरोग्यासाठीदेखील चांगलं असतं. चॉकलेटमधील नैसर्गिक घटकांमुळे तुमचा मूड पटकन चांगला होतो. शरिरात आनंद निर्माण करणारे हॉर्मोन्स निर्माण होतात. सोबत मेंदूला चालना मिळते. चॉकलेटमुळे मेंदूमधील इंडॉरफिनच्या पातळीत वाढ होते ज्यामुळे मेंदूला तरीतरी येते. चॉकलेट खाणं ह्रदयाच्या आरोग्यासाठी उत्तम असतं. दररोज डार्क चॉकलेट खाण्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. यासाठीच या चॉकलेट दिनानिमित्त घरी कुटुंबासोबत चॉकलेट खाऊन आणि चॉकलेटचे पदार्थ बनवून साजरा करा या दिवसाचा आनंद.
फोटोसौजन्य – pixels
अधिक वाचा –
घरच्या घरी बनवा वजन नियंत्रणात ठेवणारे Yummy चॉकलेट स्प्रेड
डार्क की मिल्क कोणते चॉकलेट शरीरासाठी चांगले, जाणून घ्या खरे फॅक्टस
तोंडाला चव येतेया 5 कारणांमुळे महिलांनी आवर्जून खायला हवे चॉकलेट