ADVERTISEMENT
home / Acne
त्वचेसाठी कॉम्बिनेशन ठरवताना

या क्रिम कॉम्बिनेशनचा वापर चेहऱ्यासाठी ठरु शकतो घातक

त्वचेचे टेक्शचर चांगले राहावे यासाठी बाजारात वेगवेगळ्या क्रिम्स मिळतात. पण सगळ्यात क्रिम्स एकावेळी वापरुन चालत नाही. कारण काही क्रिम्समध्ये असलेले घटक याचे कॉम्बिनेशन एकमेकांसाठी अजिबात चालत नाही. तुम्ही वापरत असलेल्या क्रिम्सचे कंटेट तुम्हाला महीत नसतील आणि तरी तुम्ही त्यांचा वापर करत असाल तर तुम्हाला त्याचे त्वचेवर विपरित परिणाम जाणवू लागतात. त्वचेवर लालिमा वाढणे, त्वचेवरुन खपली निघणे, त्वचा नाजूक होणे असे काही त्रास नक्कीच होऊ शकतात. त्यामुळे नेमके कोणते कॉम्बिनेशन तुम्ही टाळायला हवेत ते जाणून घेऊया

पावसाळ्यासाठी निवडा या खास शेडच्या लिपस्टिक दिसा खास

सौजन्य: Instagram

Vitamin C आणि Retinol

व्हिटॅमिन C हे त्वचेसाठी फारच फायद्याचे असते. त्याच्यामुळे त्वचा हीअधिक चांगली राहण्यास मदत मिळते. त्वचेवरील तजेला टिकून राहतो आणि त्वचा अधिक चांगली दिसते. तर रेटिनॉल हे त्वचेखाली असलेले कोलॅजन बुस्ट करुन त्वचा चांगले करण्याचे काम करते. त्वचेला एक्सफोलिएट करण्याचे काम रेटिनॉल करते. तर व्हिटॅमिन C त्वचेला थंडावा देण्याचे काम करत असते. आता दोन्ही वेगवेगळ्या प्रक्रिया एकाचवेळी होत असल्यामुळे त्याचे विपरित परिणाम नक्कीच त्वचेवर होऊ लागतात. त्यामुळे तुम्ही चुकूनही के कॉम्बिनेशन त्वचेसाठी वापरु नका. कारण त्यामुळे त्वचेवर इच्छित परिणाम दिसून येणार नाही. 

Retinol आणि Hydroxy Acid

सौजन्य: Instagram

त्वचेचे एक्सफोलिएशन करण्याचे काम रेटिनॉल करत असते. तर हायड्रॉक्सी अॅसिड  किंवा ग्लायकोलिक अॅसिड हे देखील एक्सफोलिएशनचे काम करते.  एकाचवेळी जर तुम्ही दोन्ही स्किनएक्सफोलिएटर वापरत असाल  तर त्याचा त्रास त्वचेवर नक्कीच होऊ शकतो. कारण दोन्ही एक्सफोलिएटर एकदमच स्ट्राँग असतात. स्किन डॉक्टर याचा उपयोग करत असाल तर त्याचे योग्य प्रमाण त्यांना माहीत असते. पण त्याचा रोज वापर करणे म्हणजे त्वचा नाजूक आणि संवेदनशील करणे आहे. त्यामुळे याचा एकत्र वापर करणे टाळा. 

ADVERTISEMENT

त्वचेखाली असणारे कोलॅजन त्वचेसाठी का असते गरजेचे


Retinol आणि Salicylic Acid 

रेटिनॉल आणि सॅलिसिलिक अॅसिड हे दोन्ही पिंपल्सवर कमालीचे काम करते. पोअर्स स्वच्छ करुन त्यांच्यातील पिंपल्स  कमी करण्याचे काम करते. पण दोन्ही घटक एकाचवेळी वापरणे त्वचेसाठी फारच त्रासदायक ठरु शकते. एकावेळी दोन्हीचा प्रयोग केल्यामुळ त्वचा फुटू शकते. त्वचेवर लालिमेचे स्पॉट येऊ शकतात. एक दिवस आड याचा प्रयोग चालू शकतो. पण एकत्र करुन ही क्रिम लावली तर त्याचा त्रास नक्कीच होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही एकावेळी या दोन क्रिम लावू नका.  

आता चेहऱ्याला काहीही लावण्याआधी यामधील घटक त्याची टक्केवारी नक्की तपासा नाहीतर तुमच्या त्वचेला त्रास होण्याची शक्यता टाळता येणार नाही.

.कॉफी मास्क आणि स्क्रबने कमी होतात त्वचेच्या आणि केसांच्या या समस्या

ADVERTISEMENT
02 Aug 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT