कर्करोग म्हणजे शरीरात कुठेही असामान्य पेशींची अनियंत्रित वाढ होय. तुम्ही निवडलेल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे तुमच्या शरीरात कर्करोगाचा विकास होण्याची शक्यता प्रभावित होते. तुम्हाला माहीत आहे का? धूम्रपान आणि मद्यपानामुळे फुफ्फुस, अन्ननलिका, स्वरयंत्र, तोंड, घसा, मूत्रपिंड, मूत्राशय, यकृत, स्वादुपिंड, पोट, कोलन आणि गुदाशय यांचा कर्करोग होतो. लठ्ठपणा आणि वाढत्या मद्यपानामुळे स्तनाचा कर्करोग दिसून येतो. शिवाय, सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट किरणोत्सर्गाच्या संपर्कात येण्यामुळे त्वचेचा कर्करोग होतो. संतुलित जीवनशैलीचा अवलंब करणे ही तुम्हाला कर्करोगापासून दुर राहण्यास मदत करु शकते. त्यामुळे रोगमुक्त जीवन जगण्याचा प्रयत्न करा. निरोगी जीवनशैली निवड ही तुम्हाला कर्करोगापासून दूर ठेवण्यास मदत करू शकते. याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तज्ज्ञांनी दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करा. डॉ सुहास आग्रे, एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूटमधील वैद्यकीय कर्करोग तज्ज्ञ आणि हेमॅटो-ऑन्कोलॉजिस्ट यांच्याकडून आम्ही अधिक जाणून घेतले.
अधिक वाचा – जाणून घ्या रक्ताचा कर्करोग, लक्षणे (Symptoms Of Blood Cancer In Marathi)
काय आहे मार्गदर्शक तत्व
कोणत्याही स्वरूपात तंबाखूचे सेवन टाळा: तंबाखू चघळणे तोंडाच्या पोकळी आणि स्वादुपिंडाच्या कर्करोगासह विविध कर्करोगांशी संबंधित आहे. तुम्ही तंबाखूचा वापर करत नसला तरीही त्याच्या धुराशी येणारा संबंध फुफ्फुसाच्या कर्करोगाला आमंत्रण देईल. त्यामुळे कोणत्याही किंमतीत तंबाखू टाळा. हुक्का, सिगार, तंबाखुजन्य पदार्थ टाळा. धूम्रपान सोडण्यासाठी, तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर तुम्ही धूम्रपान बंद करण्याच्या कार्यक्रमाची निवड करू शकता जे तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकतील आणि व्यसनमुक्त करु शकतील.
सकस आहार: आहारात सर्व आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे समाविष्ट करून तुमचे आरोग्य सुधारणे आणि कर्करोगापासून दूर राहणे ही काळाची गरज आहे. ताजी फळे, भाज्या, सुकामेवा,तृणधान्य आणि बीन्स खाण्याचा प्रयत्न करा. ट्रान्स आणि सॅच्युरेटेड फॅट्सचे सेवन टाळा. तळलेले पदार्थांचे सेवन कमी करा. अल्कोहोलचे सेवन मर्यादित राखा.या सवयी देखील तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील.
व्यायाम करा आणि निरोगी वजन राखा: तुमचे वजन जास्त आहे तुम्ही लठ्ठ आहात? मग, तुम्हाला स्तन, फुफ्फुस, कोलन आणि किडनीचा कर्करोग होण्याचा धोका असु शकतो. ते टाळण्यासाठी लगेच व्यायाम सुरू करा. आठवड्यातून किमान 150 मिनिटे व्यायाम करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही योग, धावणे, पोहणे, सायकलिंग, जिममध्ये, चालणे आणि एरोबिक्स यांसारख्या विविध क्रियाकलाप करू शकता. आठवड्यातून रोज ३० मिनिटे असे असावे मिनिटे व्यायाम करा. नियमित शारीरिक हालचाली वजन कमी करण्यास मदत करू शकतात आणि जीवनाची गुणवत्ता सुधारू शकतात.
सूर्यापासून संरक्षण: त्वचेचा कर्करोग सामान्यतः सूर्यापासून येणाऱ्या अतिनील (UV) किरणांच्या संपर्कामुळे दिसून येतो. डॉक्टरांनी सुचवलेले सनस्क्रीन वापरा.
अधिक वाचा – अंडाशयाच्या कर्करोगावर मात करण्यासाठी वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक
कर्करोगाच्या कौटुंबिक इतिहासाबद्दल जाणून घ्या
कर्करोगाच्या तपासणीसाठी जा. काही चाचण्या कर्करोगाचा लवकर शोध घेण्यास मदत करू शकतात, जेव्हा उपचार यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते आणि परिणाम सकारात्मक असतो. कर्करोगाची शक्यता नाकारण्यासाठी तुम्हाला कोणत्या प्रकारच्या चाचण्या कराव्या लागतील याबद्दल डॉक्टर तुम्हाला सांगतील. याचा तुम्ही योग्य वापर करून घ्या आणि त्याप्रमाणे वेळीच चाचण्या करून घ्या. यामध्ये अजिबातच दिरंगाई करणे योग्य नाही. कारण याचा तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची जास्त शक्यता असते. वेळीच सावध व्हा आणि चाचण्या करून घ्या.
अधिक वाचा – वेळीच निदान ही आहे कर्करोगावर मात करण्याची गुरुकिल्ली – तज्ज्ञांचे मत
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक