नुकतंच अभिनेत्री यामी गौतमने (Yami Gautam) लग्नाचा फोटो शेअर करत चाहत्याना सुखद धक्का दिला आहे. दिग्दर्शक आदित्य धार (Aditya Dhar) याच्याशी लग्नगाठ बांधत यामी गौतमने आपल्या संसाराला सुरूवात केली आहे. तर आता अजून एका अभिनेत्रीने आपण 15 मे रोजी विवाहबद्ध झाल्याचे घोषित केले आहे. ‘ये जवानी है दिवानी’ हा चित्रपट कोणाला माहीत नाही असं होणारच नाही आणि यामधील लाराची भूमिका करणारी एव्हलिन शर्मादेखील (Evelyn Sharma) सर्वांच्याच लक्षात आहे. एव्हलिनने आपला बॉयफ्रेंड तुशान भिंडी याच्याशी विवाहबद्ध झाल्याचे जाहीर केले आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत तिने आपला आनंद व्यक्त केला. तसंच भावूक शब्दात आपल्या मनातील भावनाही व्यक्त केल्या आहेत. 2019 मध्ये एव्हलिन आणि तुशानने साखरपुडा केला होता तर आता ऑस्ट्रेलियामध्ये दोघेही विवाहबद्ध झाले आहेत.
काय काका मुलगी पाहिली नाही का,राखीने विचारला प्रश्न
एव्हलिनने व्यक्त केल्या भावना
एव्हलिनने ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथे तुशान भिंडी याच्याशी लग्न केले आहे. तुशान हा व्यवसायाने डेंटल सर्जन आहे. एव्हलिनने आपल्या सोशल मीडियावर अनेक फोटो अपलोड केले आहेत. यापैकी एका फोटोला ‘फॉरेव्हर’ असं कॅप्शन दिलं आहे. ब्रायडल गाऊनमध्ये एव्हलिन अत्यंत सुंदर दिसत आहे. तसंच एका फोटोला तिने कॅप्शन देत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘श्री आणि सौ. भिंडी. हा लहानसा लग्नाचा सोहळा तुमच्या उपस्थितीने खूपच मोठा केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस तुम्ही खूपच सुंदर केलात’. तुशान आणि एव्हलिन दोघेही या फोटोमध्ये खूपच आनंदी दिसत आहेत. एव्हलिनने बॉलीवूडमध्ये काही चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यापैकी ‘ये जवानी है दिवानी’ चित्रपटातील लारा ही सर्वांच्याच स्मरणात राहिली आहे. लारा तिच्या या ब्रायडल लुकमध्ये अत्यंत नाजूक बाहुलीसारखी दिसत असून अनेकांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. बॉलीवूडमधील तिचे सहकलाकार आणि मित्रमैत्रिणी यांनी आपण तुझ्यासाठी खूपच आनंदी असल्याचेही सांगितले आहे.
पर्ल व्ही. पुरीबाबत ठोस पुरावे असल्याचे पोलिसांचे म्हणणे, पण कलाकारांचा पर्लला पाठिंबा
जवळच्या मित्राशी केले एव्हलिनने लग्न
2019 मध्ये तुशानसह एव्हलिनने साखरपुडा केला होता. तुशानने एव्हलिनला सिडनीमधील हार्बर ब्रिजवर लग्नाची मागणी घातली होती. इतकंच नाही तर एव्हलिनच्या आनंदासाठी त्याने एक खास नोटही यावेळी लिहिली होती. ही गोष्ट एव्हलिनने एका मुलाखतीमध्येही सांगितली होती. तर तुशान हा ऑस्ट्रेलियातील एक डेंटल सर्जन आहे आणि एव्हलिनचा सर्वात जवळचा मित्र आहे. त्यामुळे एव्हलिनने आपल्या भावना व्यक्त करत सांगितले की, ‘आपल्या सर्वात जवळच्या मित्राशी लग्न करणे यापेक्षा कोणतीच चांगली गोष्ट असू शकत नाही. संपूर्ण आयुष्य एकत्र घालविण्यासाठी आम्ही दोघेही उत्सुक आहोत.’
डिझाईनर फाल्गुनी पिकॉक, सोनाक्षी राज, बिदिता बाग, अभिनेत्री सोनल चौहान, अभिनेत्री झरीन खान, शेन पिकॉक, ख्रिस्टल डिसुझा या सर्व सेलिब्रिटीजने एव्हलिन आणि तुशानला पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देत सोशल मीडियावर त्यांचे अभिनंदन केले आहे. तर दोघेही कायम आनंदात राहावे यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत असंही म्हटलं आहे. एव्हलिनने 15 मे रोजी अत्यंत जवळच्या माणसांच्या उपस्थितीत तुशानसह लग्नगाठ बांधली आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांसाठी नक्कीच हा सुखद धक्का आहे.
नव्या कथानकासह ओह माय गॉड 2, अक्षयकुमारसोबत यामी गौतम मुख्य भूमिकेत
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक