ADVERTISEMENT
home / भविष्य
year-2022-horoscope

राशीफळ 2022ः कसे असेल नवे वर्ष, कोण होईल आनंदी आणि कोणाला घ्यावी लागेल काळजी

काही दिवसातच 2022 हे नवीन वर्ष सुरू होणार आहेत. सध्या ख्रिसमस शुभेच्छा देत सर्व आपला नाताळ साजरा करत आहेत. आपले येणारे नवे वर्ष आणि भविष्य कसे असेल हे जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक असतात. आपण नेहमीच भविष्यातील योजना आखत असतो. येणारे नवे वर्ष सुख, समृद्धी आणि समाधानपूर्वक असावे असे सर्वांनाच वाटते आणि त्याचबरोबर गतवर्षात ज्या गोष्टींना सामोरे जाऊन दुःख उपभोगले आहे किमान त्याची पुनरावृत्ती होऊ नये असंही सर्वांना वाटत असते. आपल्याकडे भविष्य आणि कुंडली पाहणे याला खूपच महत्त्व आहे. एक अभ्यास म्हणून याचा नेहमी आपण विचार करतो. येणारे #newyear2022 नक्की कसे जाणार आणि भविष्याच्या दृष्टीने कोणत्या राशीसाठी कसे असणार हे तुम्ही नक्की जाणून घ्या. 

मेष रास 

येणारे 2022 हे नववर्ष मेष राशीच्या व्यक्तींसाठी खास असेल. या राशीच्या सर्व व्यक्तींची आर्थिक स्थिती चांगली राहील. विदेशात फिरण्याची संधीदेखील या राशीच्या व्यक्तींना येणार आहे. तसंच आर्थिक लाभाचे हे वर्ष आहे. मात्र तुम्ही तुमच्या वाणीवरदेखील नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. तसंच या व्यक्तींना आपल्या आरोग्याची काळजी मात्र यावर्षी जास्त घ्यावी लागेल. धनलाभ होण्यासह खर्चही खूप आहेत आणि तुम्हाला तुमच्या जोडीदाराची साथही खूपच चांगली मिळेल. नोकरी आणि व्यवसायात वृद्धी होईल. तसंच तुम्हाला घर घेण्याचे योगही यावर्षी आहेत. मुलांच्या बाबतीत चांगल्या गोष्टी घडतील. 13 एप्रिल रोजी गुरू या राशीत प्रवेश करत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना यश मिळेल. जुलैमध्ये तुम्हाला तुमच्या बुद्धिचातुर्यामुळे अधिक फायदा होईल. भाग्य तुमची साथ देईल. वैवाहिक जीवन सुखकर राहील. घरात शुभकार्याची संभावना आहे. तसंच कुटुंबात अधिक सुख आणि शांती राहील. महिलांनी सावध राहावे कारण सासरी संबंध खराब होण्याचीही शक्यता आहे. 

वृषभ रास 

13 एप्रिल 2022 पर्यंत तुमचे काम अजिबात चांगले चालणार नाही. कोणत्या ना कोणत्या तरी विघ्नाचा तुम्हाला सामना करावा लागेल आणि तुम्ही त्रस्त राहाल. चतुर्थ स्थानावर गुरू आणि स्वामी शुक्र असल्याने दोघांमधील शत्रुत्वाचा त्रास तुम्हाला सहन करावा लागेल. कामामध्ये बाधा येऊ शकतात. यावर्षी तुम्हाला अनेक कामांमध्ये बाधा येतील. अत्यंत कष्ट करावे लागतील. पण गुरूमुळे तुम्हाला धनलाभ मात्र होतील. वर्षाच्या सुरूवातीला पैशाची आवक आणि जावक ही समान राहील. पूर्ण वर्ष तुम्ही पैसे जमविण्याच्या मागे राहाल. तसंच तुमचे सहकारी तुम्हाला त्रासदायक ठरतील. तुमची प्रतिष्ठादेखील पणाला लागण्याची शक्यता आहे. तुम्हाला यावर्षी राजयोग आहे मात्र तो सहजासहजी मिळणार नाही. त्यामध्ये बाधा येतील. कुटुंबात भांडणांची शक्यता आहे. तुम्हाला पितृसंपत्ती मिळेल. तुम्ही यावर्षी वाहन खरेदी करू शकता तसंच घर घेण्याचा विचार असेल तर तेदेखील घेऊ शकता. डोळ्याचे विकार यावर्षी होऊ शकतील. 3 एप्रिलनंतर तुमच्या आयुष्यात सुधारणा होईल. खूप पैसे येतील. भावाकडून लाभ मिळण्याची शक्यता. 

मिथुन राशी 

मिथुन राशीच्या व्यक्ती या चांगल्या मित्र आणि चांगले सहकारी असतात. 2022 मध्ये या राशीच्या व्यक्तींचे आरोग्य चांगले राहील. गॅस अथवा हाडांची समस्या मात्र जाणवू शकता. यावर्षी तुम्हाला भरपूर संपत्ती मिळणार आहे. शेअर, बाँड यामधूनही प्राप्ती होऊ शकते. तसंच विदेशात जाण्याचा योग आहे. घरातील एखाद्या सदस्याचे घर सोडून जाणे होईल. मुलांच्या बाबतीत चांगल्या बातमी मिळतील. नोकरीतही चांगले यश प्राप्त होईल. मे ते ऑगस्ट हा कालावधी थोडा तणावाचा जाईल. विद्यार्थी एखाद्या गोष्टीचे शिक्षण घेण्यासाठी बाहेरगावी जाऊ शकतात. व्यापारासाठी हे वर्ष उत्तम ठरेल. तसंच तुम्ही व्यवसायात या वर्षी परिवर्तनदेखील करू शकता. ज्याचा तुम्हाला फायदा मिळेल. जूनदरम्यान कौटुंबिक वादविवाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यवस्थित राहा. 

ADVERTISEMENT

कर्क रास 

कर्क राशीच्या व्यक्ती या आपले कुटुंब अथवा मित्रमैत्रिणींशिवाय राहू शकत नाहीत. या व्यक्ती कला आणि विद्येमध्ये निपुण असतात. तसंच संगीत क्षेत्रातही या व्यक्ती अधिक नाव कमावतात. या राशीच्या व्यक्ती अधिक खर्चिक असतात. 2022 मध्ये तुम्हाला नोकरीमध्ये बढती मिळेल आणि प्रगती होईल. तुमचे आरोग्य उत्तम राहील. वर्षातील केवळ 3 महिने आरोग्याच्या तक्रारी राहतील. या राशीचा स्वामी सूर्य आणि शुक्राचा चांगला संयोग होत आहे. त्यामुळे धन मिळेल. एखाद्या सरकारी योजनेचा लाभही तुम्हाला होऊ शकतो. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. चंद्र आणि मंगळाच्या योगामुळे संतानप्राप्ती होईल. तुम्ही तुमच्या प्रयत्नामुळे यश मिळवू शकता. व्यवसायाच्या दृष्टीकोनातून वर्षाच्या सुरूवातीला थोडा त्रास होईल. पण वर्षाच्या उत्तरार्धात व्यवसायात यश मिळेल. 

सिंह रास

सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. या राशीच्या व्यक्ती समाज, कुटुंब आणि मित्रमैत्रिणींच्या अत्यंत जवळच्या असतात. यांचे यांच्या वाणीवर मात्र नियंत्रण नसते. राजकारण आणि खेळामध्ये या व्यक्तींना अधिक रस असते. यांचा स्वभाव खूपच खर्चिक असतो. 2022 मध्ये तुमची आर्थिक परिस्थिती चांगली राहील. केतूमुळे कुटुंबात वाद होत राहतील. सरकारी परीक्षा असेल तर यश मिळेल. कुटुंबासह सहलीसाठी विदेश भ्रमण होऊ शकते. मुलांना यश मिळेल. नोकरीमध्ये समस्या असतील तर त्या संपतील. तसंच नव्या नोकरीसाठी विचारणा होतील. जानेवारीपर्यंत तुम्ही नव्या नोकरीसाठी प्रयत्न करू शकता. व्यापाऱ्यांसाठी सुरूवातीचे तीन महिने योग्य नाहीत. नंतर वर्ष चांगले जाईल. 

कन्या रास

करिअरच्या दृष्टीने कन्या राशीच्या व्यक्तींना जानेवारी, मार्च आणि जून हे तीन महिने अप्रतिम असतील. मे च्या सुरूवातीला मनाविरूद्ध घटना घडतील. नोकरपेशा व्यक्तींना बढती मिळेल. ज्या व्यक्ती बेरोजगार आहेत, त्यांना यावर्षी नवी नोकरी मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष अप्रतिम राहील. तर आर्थिक स्थितीही योग्य राहील. आर्थिक गोष्टींमध्ये कुटुंबातील सदस्य आणि मित्रांकडून मदत मिळेल. या दरम्यान नवे स्रोत उपलब्ध होतील. धनप्राप्ती होईल. पण खर्चही अधिक होतील. वर्षाच्या मध्यात म्हणजे एप्रिल ते सप्टेंबरदरम्यान कौटुंबिक वादाला सामोरे जावे लागेल. मात्र नंतर सुधारणा होईल. 

तूळ रास

तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे. या व्यक्ती अत्यंत हुशार असतात. वादविवादापासून दूर राहणाऱ्या असतात. तसंच गुंतवणूक करण्याच्या बाबतीत या व्यक्ती पुढे असतात. नव्या वर्षात या व्यक्तींना रक्तदाबाची समस्या होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारेल. आईवडिलांना सांभाळा. या वर्षात काही महिन्यात पदोन्नती होण्याची शक्यता आहे. मार्च ते डिसेंबर हा चांगला कालावधी आहे. मार्चनंतर नोकरीसाठी अत्यंत चांगला कालावधी आहे. शनि आणि गुरूचे परिवर्तन होईल तेव्हा विदेशयात्रा संभवते. नोकरीमध्ये अत्यंत चांगली प्रगती होईल. व्यापाऱ्यांसाठी हे वर्ष उत्तम आहे.

ADVERTISEMENT

वृश्चिक रास 

प्रभावशाली व्यक्तिमत्वाच्या असतात वृश्चिक राशीच्या व्यक्ती, जाणून घ्या

यावर्षी आईवडिलांना सांभाळा. 2021 मध्ये कुटुंबातील काही सदस्य आणि तुमच्यामधील संबंध ठीक नव्हते. या नव्या वर्षी ते संबंध सुधारण्यास मदत मिळेल. नोकरीमध्ये बरीच मेहनत करावी लागेल. आळस करू नका. नोकरी सोडण्याची शक्यता आहे. 2022 मध्ये आर्थिक स्थितीबाबत जाणून घ्यायचे असेल तर सूर्य आणि शुक्र हे दोन्ही या राशीत आहे. त्यामुळे यावर्षी तुम्हाला धनप्राप्ती अधिक प्रमाणात होईल. सरकारी योजनांचा लाभ मिळेल. कुटुंबामध्ये प्रेमभाव वाढेल. तसंच तुम्ही यावर्षी तीर्थयात्रा करू शकता. विद्यार्थ्यांना भरपूर मेहनत करावी लागेल. काही क्षेत्रांमध्ये यश मिळेल तर काही क्षेत्रांमध्ये मिळणार नाही. नोकरीमध्ये चंद्र मंगळाचा लक्ष्मी योग संभवतो. त्यामुळे नोकरी बदल होण्याची शक्यता आहे. तुम्हाला चांगला पगार मिळू शकतो. 

मकर रास 

वर्षाची सुरूवात चांगली होणार नाही. कारण यावर्षी तुमचा खर्च अधिक होईल. विचारपूर्वक खर्च करा. ग्रहांच्या अनुसार या वर्षाच्या सुरूवातीला तुम्हाला नवा स्रोत शोधण्याची आवश्यकता आहे. तुम्ही नव्या वर्षात जमीन, वाहन यावर खर्च करू शकता. तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात मेहनत करावी लागेल. चांगले आणि वाईट दोन्ही परिणाम यावर्षी भोगावे लागतील. नोकरीत बदल करू शकता. 2022 मध्ये मानसिक तणावातून मुक्त व्हाल. आरोग्य सुरूवातीला त्रास देईल. फेब्रुवारीनंतर आरोग्य व्यवस्थित राहील. विद्यार्थ्यांना विदेशात जाण्यात योग आहे. नोकरीमध्ये बढती मिळेल. एप्रिलपासून शनिचा प्रभाव तुमच्या राशीवर कमी होईल. राजकारणात यश मिळेल. यावर्षी तुम्हाला कामात यश मिळेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. 

कुंभ रास 

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हे वर्ष चढउताराचे राहील. सरकारी नोकरीमध्ये यश मिळेल. आपल्या अधिकाऱ्यांशी कोणताही वाद घालू नका. याचा तुमच्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. बेरोजगार व्यक्तींना यावर्षी नोकरी मिळेल. सामाजिक आणि कौटुंबिक गोष्टींवर पैसे खर्च होतील. शनि बाराव्या स्थानात असल्यामुळे आरोग्याकडे लक्ष द्या. पण गुरू चांगला असल्यामुळे चांगला परिणाम दिसून येईल. धनलाभ होईल. प्रेमविवाहाचे योग असून संतानप्राप्तीही होईल. वैवाहिक जीवन चांगले राहील. अनेक क्षेत्रात लाभ होईल. मंगळ राजयोग होईल. 

धनू रास 

धनू राशीच्या व्यक्ती अत्यंत स्पष्टवादी असतात. यांना अनेक विषयांचे ज्ञान असते. तसंच यांना रागही लवकर येतो. चांगली धनप्राप्ती होईल. तर गुंतवणूकही कराल. यावर्षी मानसिक चिंता आणि तणावाची अनेक कारणे येतील. आईवडिलांनाही कष्ट होतील. दुर्घटना होण्याची शक्यता. वैवाहिक जीवन सामान्य राहील. कौटुंबिक वाद होतील. आरोग्य ठीकठाक राहील. कार्यात यश मिळेल. एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत नोकरीमध्ये चांगले यश मिळेल. पदोन्नती होईल. विदेश दौरा संभवतो. 

ADVERTISEMENT

मीन रास 

मीन राशीचा स्वामी गुरू आहे. या वर्षाच्या सुरूवातीपासूनच या व्यक्तींना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. एप्रिल महिन्यानंतर तुमचे भाग्य उजळेल. नोकरी आणि व्यावसायिक जीवनात यश मिळेल. नवी नोकरीही मिळू शकते. कंपनीकडून तुम्हाला वाहन, घर अथवा अन्य सुविधा मिळण्याचीही शक्यता आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील आणि मुलांवर खर्च होईल. विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष सुखाचे राहील. नोकरीत यश मिळेल. 

प्रत्येक राशीसाठी 2022 हे वर्ष काही ना काही घेऊन येणारे आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

24 Dec 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT