ADVERTISEMENT
home / मनोरंजन
yeh rishta kya kehlata hai big budget wedding in Marathi

मालिकांमधील सर्वात भव्य दिव्य लग्न, ये रिश्ता क्या कहलाता है ची सगळीकडे चर्चा

ये रिश्ता क्या कहलाता है ही मालिका हिंदी टेलीव्हिजनवरील एक लोकप्रिय मालिका ठरली आहे. टीआरपीच्या स्पर्धेतही या मालिकेने बाजी मारली आहे. याचं कारण आहे या मालिकेत निर्मात्यांनी तयार केलेला एक ट्विस्ट आणि टर्न… ज्यामुळे या मालिकेने नुकताच नवा रेकॉर्ड तयार करण्यातही यश मिळवलं आहे. हे ऐकून प्रेक्षकांना आनंदाचा धक्का बसू शकतो की पुढील काही दिवसांमध्ये या मालिकेमध्ये तुम्हाला काहीतरी भव्य दिव्य पाहायला मिळणार आहे.  कारण आजवर टेलीव्हिजन इतिहासात कधीच पाहिलं नाही असं शाही लग्न या मालिकेत दाखवलं जाणार आहे.

कसा असणार हा वेडिंग सीक्वेन्स

ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेत अक्षरा म्हणजेच प्रणाली राठौड आणि अभिमन्यु म्हणजेच हर्षद चोपडा यांचं लग्न दाखवलं जाणार आहे. या शाही लग्नाच्या थाटमाटाची सर्व तयारी झालेली आहे. आजवर एखाद्या सेलिब्रेटीच्या लग्नातही केली नसेल अशी तयारी यासाठी करण्यात येकत आहे. ज्यामुळे प्रेक्षक या लग्नाचे सर्व सीक्वेन्स पाहण्यासाठी नक्कीच उत्सुक आहेत. या लग्नाला भव्य दिव्य रूप येण्यासाठी प्रॉडक्शन टीमने खूप मेहनत घेतलेली आहे.

शाही विवाहसोहळ्याचा थाट माट

ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेतील हा विवाह सोहळा चक्क जयपूरमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. यासाठी टीम जवळ जवळ एक महिना जयपूरमध्ये शूटिंग करत आहे. त्यामुळे आतापर्यंतचा मालिकांमध्ये कधीच पाहिला नसेल एवढा मोठा लग्न सोहळा या मालिकेत दाखवला जाणार आहे. खऱ्या खुऱ्या लग्नासाठीदेखील कोणी करणार नाही अशी मेहनत यासाठी या मालिकेच्या सेटवर घेतली जात आहे. जयपुरमधील एका रॉयल पॅलेसमध्ये हे लग्न शूट केलं जात आहे. केले काही आठवडे मालिका टॉप फाईव्हमध्ये आहे. म्हणूनच मालिकाचा चढता आलेख पाहता निर्मात्यांनी एवढा मोठा खर्च या लग्नावर करण्याचं ठरवलं आहे. या मालिकेत नवरानवरीच्या कपड्यांवरही लाखो रुपये खर्च केले जात आहे. हिऱ्यांनी सजवलेला लेहंगा यात अक्षराने परिधान केला आहे. शिवाय या लग्नाच्या वेडिंग ट्रॅकसाठीदेखील निर्मात्यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे. या लग्नासाठी #Abhira असा खास हॅशटॅग असेल.लग्नासाठी निर्मात्यांने जवळजवळ दोन करोड रूपये खर्च केल्याचा अंदाज आहे.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
16 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT