ADVERTISEMENT
home / फॅशन
हळदी समारंभासाठी ट्राय करा हे पिवळ्या रंगाचे एथनिक आऊटफिट

हळदी समारंभासाठी ट्राय करा हे पिवळ्या रंगाचे एथनिक आऊटफिट

लग्नसोहळ्यात विविध विधी केले जातात. आता कोरोनामुळे लग्नसोहळे कमीत कमी वेळात आटोपले जात असले तरी घरच्या घरी काही विधी करण्यास काहीच हरकत नाही. लग्नाआधी हळदी समारंभाला खूप महत्त्व आहे. कोरोना महामारीआधी हळदी समारंभ सोहळा म्हणजे लग्नापेक्षाही मोठ्या थाटमाटात केला जात असे. मात्र सध्या त्याला घरगुती स्वरूप प्राप्त झाले आहे. हळदी समारंभाला खास पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात. पूर्वी फक्त या विधीसाठी वधू आणि वरच पिवळ्या रंगाचे कपडे घालत असत. मात्र काही वर्षांपासून हळदी समारंभासाठी वधूवरांचे नातेवाईक आणि सहभागी होणारी पाहुणेमंडळीही पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करतात. थोडक्यात हळदी समारंभाची थीम ही आजकाल पिवळ्या रंगाची असते. यासाठीच एखाद्या हळदी समारंभात तुम्ही सहभागी होणार असाल तर पिवळ्या रंगाचे हे आऊटफिट्स तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता.

साडी

हळदी समारंभ म्हटला की तुमच्या लुकमध्ये नेहमीपेक्षा पारंपरिक टच असायलाच हवा. त्यामुळे कोणत्याही हळदी समारंभासाठी साडी नेसणं हा उत्तम पर्याय ठरेल. पण यासाठी फार महागडी अथवा सिल्कची साडी कधीच निवडू नका. कारण हळदी समारंभात बऱ्याचदा वधूवराला हळद लावून झाली की मौजमस्ती करत नातेवाईक आणि मित्रमंडळींनाही हळद लावली जाते. थोडक्यात आजकाल या समारंभात हळद खेळण्याचा प्रकारदेखील असतो. त्यामुळे साडीचं मटेरिअल वॉशेबल असेल तर उत्तम ठरेल. करिनाप्रमाणे तुम्ही गोल्डन बॉर्डर असलेली यलो साडी नक्कीच निवडू शकता. अशा प्रकारची साडी तुम्ही स्टायलिश पद्धतीने कॅरी करू शकता. फक्त यासोबत मोठ्या आकाराचे गोल्डन इअररिंग्ज आणि मोगऱ्याचा गजरा घालायचा नक्कीच लक्षात ठेवा.  

instagram

ADVERTISEMENT

लेहंगा

आजकाल साडीसोबतच एथनिक लुकसाठी लेहंगा घालणंही सर्वजणी पसंत करतात. जर तुम्हाला हळदी समारंभासाठी लेंगा घालायचा असेल. तर अशा लेंगाच्या निवड करा ज्यामुळे तुम्हाला हळदीचा कार्यक्रम व्यवस्थित साजरा करता येईल. सिल्क अथवा हेव्ही वर्कचा लेहंगा निवडण्यापेक्षा यासाठी कॉटन, चिकन अथवा वॉशेबल मटेरिअलचा लेंगा तुम्ही नक्कीच निवडू शकता. उन्हाळ्यात अशा फॅब्रिकच्या  आऊटफिटमध्ये तुम्हाला  फार गरमही होणार नाही. यासाठी आलिया भटप्रमाणे लेंगा तुम्ही नक्कीच परिधान करू शकता.

instagram

पंजाबी ड्रेस

साडी आणि लेंग्याप्रमाणेच हळदी समारंभासाठी खास उठून दिसतात ते पिवळ्या रंगाचे सिल्कचे पंजाबी ड्रेस. आजकाल बाजारात हळदी समारंभासाठी अशा खास पिवळ्या रंगाच्या शेडची खूप मोठी रेंज पंजाबी ड्रेसमध्ये दिसते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पिवळ्या रंगातील एखादी छान शेड यासाठी निवडू शकता. मात्र सिल्कचा ड्रेस परिधान केल्यावर तुम्हाला त्यावर हळदीचे डाग लागू नयेत यासाठी थोडी काळजी घ्यावी लागेल. शक्य असल्यास लॉकडाऊन नंतर एखाद्या मोठ्या लग्नसोहळ्यासाठी हा आऊटफिट निवडा. कारण हळदी समारंभात तुम्हाला अशा आऊटफिटमध्ये डान्स करणे सोपे जाईल. 

ADVERTISEMENT

instagram

शरारा सूट

तुम्ही ज्या हळदी समारंभात सहभागी होणार आहात तो किती लोकांच्या उपस्थितीत आणि कुठे साजरा होणार आहे यावरून तुम्ही तुमचे आऊटफिट ठरवू शकता. एखाद्या खास कार्यक्रमासाठी करिश्मा कपूरने परिधान केलेल्या ड्रेसप्रमाणे गोल्डन शरारा सूट घालण्यास काहीच हरकत नाही. कारण यामध्ये तुमचा एथनिक लूक परफेक्ट होईल आणि सर्वांच्या नजरा तुमच्यावरच खिळून राहतील. टस्कन सन यलो रंगाचा हा ड्रेस असून त्यावर रस्ट गोल्डन रंगाची प्रिंट आहे. 

ADVERTISEMENT

instagram

डिझायनर ड्रेस

हळदी समारंभासाठी  तुम्ही एखादा युनिक, इंडोवेस्टर्न डिझायनर ड्रेसदेखील नक्कीच निवडू शकता. या फोटोमध्ये जेनेलिया डिसूझा देशमुखने परिधान केलेला हा पिवळ्या रंगाचा आऊटफिट पाहा. एखाद्या खास हळदी समारंभासाठी तुम्ही यात नक्कीच स्पेशल दिसाल. इलेक्ट्रिक यलो कलरच्या या डिझायनर आऊटफिटमध्ये जेनेलियाने हेव्ही नेकलेस घातला आहे. ज्यामुळे तिचा अंदाज चाहत्यांना नक्कीच घायाळ करत आहे.

instagram

ADVERTISEMENT

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

उन्हाळ्यासाठी निवडा या प्रकारच्या फॅब्रिकचे कपडे, त्वचेसाठी ठरतील बेस्ट

प्लस साईज फॅशनबाबत तुमच्या मनात असू शकतात हे गैरसमज

ADVERTISEMENT

सीक्वेन कॅरी करताना या गोष्टी तुम्हाला माहीत असायला हव्या

29 Apr 2021
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT