ADVERTISEMENT
home / आरोग्य
yoni-information-in-marathi

जाणून घ्या योनीच्या बाबतीतील महत्त्वाची माहिती | Yoni Information In Marathi

योनी म्हणजे काय नक्की? असा प्रश्न एका ठराविक वयात सगळ्यांच्या मनात येतोच. इतकंच नाही तर मुलांना लिंग असते आणि मुलींना योनी हे एका ठराविक वयात माहीत असते. योनी हा महिलेच्या शरीरातील महत्त्वाचा भाग आहे. योनीची माहिती (Yoni Information In Marathi) जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. यामध्ये लाजण्यासारखे काहीही नाही. योनीची माहिती (Vagina Information In Marathi) एका ठराविक वयानंतर मुलगा असो वा मुलगी प्रत्येकाला माहीत असायलाच हवी. त्यामुळेच ही महत्त्वाची योनी मराठी माहिती (Yoni Marathi Mahiti) आम्ही देत आहोत. हे शरीराचं गुप्तांग आहे. त्यामुळे सहसा एका ठराविक वयानंतर हे कोणालाही दाखविण्यात येत नाही. मात्र या योनीबाबत इत्यंभूत माहिती आम्ही तुम्हाला या लेखातून देत आहोत. 

योनीच्या भागांची माहिती (Parts Of Yoni Information In Marathi) 

Parts Of Yoni Information In Marathi

योनीच्या भागांची माहिती (Yoni Information In Marathi)  घेण्याआधी आपण योनी म्हणजे काय? हे सर्वात आधी जाणून घेऊया. महिलेच्या गुप्तांगाला योनी असे संबोधण्यात येते. लैंगिक समागम (Sex) आणि अपत्यजन्म (Childbirth) ही योनीची दोन अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य आहेत. महिलांमध्ये मुकत्रोत्साराचा मार्ग आणि लैंगिक स्रावाचा मार्ग हा वेगवेगळा असतो. तर पुरूषांमधील मूत्रनलिकेचे मुख हे महिलांच्या योनीचे अधिक मोठे असते. योनीचा आतील भाग हा घडीप्रमाणे दिसून येतो आणि सेक्सच्या वेळी शिश्न (Penis) आतमध्ये जाताना याचे घर्षण होऊन कामोत्तेजित भावना अधिक जागृत होते आणि त्यामुळे स्पर्म्स अधिक योग्यरित्या महिलांच्या योनीत प्रवेश करते. आपल्याला दिसणाऱ्या योनीपेक्षाही आतमध्ये वेगवेगळे भाग असतात. योनीचे कोणकोणते भाग आहेत ते आपण पाहूया. 

मोन्स प्युबिस 

मोन्स प्युबिस हे वुलवाच्या वरील मांसल भागावर असून तारूण्यावस्थेत केसांनी झाकले जाते. महिलांच्या प्युबिक हाडांपासून ते गुदद्वाराला आधार म्हणून याचा उपयोग होतो 

लेबिया (लाबिया) 

लेबिया अर्थात योनीचा ओठासारखा दिसणारा आकार. लेबियाचे बाहेरील त्वचा ही अतिशय मांसल स्वरूपाची असते आणि केसांनी झाकलेली असते. तर त्याच्या आत अजून एक ओठ असतात. लेबिया प्रत्येक महिलेच्या वेगवेगळ्या रंगाच्या असतात. काहींच्या गुलाबी रंगाच्या तर काहींच्या काळ्या, चॉकलेटी रंगाच्या असतात. तर काही महिलांच्या वयानुसार लेबियाचे रंग बदलत जातात. काही महिलांच्या लेबिया जाड असतात तर काहींच्या पातळ. काही जणींना पहिल्यांदा सेक्सदरम्यान लेबिया सुजण्याची समस्यादेखील होते. 

ADVERTISEMENT

क्लायटोरिस 

योनीमधील एक मटारच्या आकाराचा लहानसा दिसणारा भाग आहे. क्लायटोरिसचा अधिकांश भाग हा योनीच्या दोन्ही किनाऱ्यांवर दिसून येतो. साधारण 5 इंच लांबीचा हा भाग आहे. सेक्स करताना आनंद मिळवून देणे हा या भागाचा उपयोग आहे. 

मूत्रमार्ग द्वार

क्लायटोरिसच्या खाली महिलांना मूत्रविसर्जनासाठी एक लहानसे भोक असते. त्याला मूत्रमार्ग द्वार असे आपण म्हणतो. 

योनीद्वार

मूत्रमार्गाच्या खालच्या अंगाला योनी द्वार असते. ज्याला व्हजायना (vagina information in marathi) अर्थात योनीचा महत्त्वाचा भाग म्हटला जातो. योनी एक ट्यूब आहे जी तुमच्या शरीरातील वुलवा योनी द्वाराच्या माध्यमातून गर्भाशय पिशवी आणि गर्भाशयाला जोडते. याच जागेतीन मासिक पाळीदरम्यान रक्ताचा स्राव होतो आणि याच योनीतून अपत्य बाहेर येते. योनीतूनच तुम्ही मासिक पाळीदरम्यान टँपॉनचा वापर करू शकता. सेक्स करताना पुरूषाचे लिंग याच भागातून आत जाते. तसंच तुम्हाला सेक्सचा आनंद घेताना सेक्स टॉय अथवा बोटाचा वापर करायचा असल्यासदेखील याच भागाचा उपयोग होतो. 

जी स्पॉट

योनीच्या अगदी आतील बाजूला बेंबीच्या बाजूने हा भाग असतो. महिलांच्या योनीच्या आतमध्ये काही इंचावर आतमध्ये हा भाग आहे. जेव्हा सेक्ससाठी उत्तेजित होतात तेव्हा जी स्पॉटमध्ये सूज येते. काही महिलांना जी – स्पॉटला हात लावल्यानंतर अधिक आनंद मिळतो आणि सेक्सची भावना अधिक जागृत होते. सहसा सेक्स करताना बोटांचा वापर केल्यास, जी – स्पॉटला स्पर्श केला जातो. 

ADVERTISEMENT

व्हजायनल टेस्ट्स (Vaginal Tests)

Vaginal Tests

योनीच्या अनेक प्रकारे तपासणी करण्यात येतात. त्याचा नक्की कशासाठी उपयोग होतो आणि कोणत्या टेस्ट्स आहेत ते जाणून घेऊया. योनीची माहिती जाणून घेताना (Yoni Information In Marathi) कोणत्या तपासणीची आवश्यकता आहे तेदेखील माहीत हवे.  

श्रोणी तपास (Pelvic Examination) – स्पेक्युलमचा प्रयोग करून डॉक्टर्स योनी आणि गर्भाशयाची तपासणी करतात. यामध्ये पेल्विक मांसपेशीची तपासणीदेखील करण्यात येते

पॅम स्मिअर (Pap Smear) – पेल्विक तपासणीच्या दरम्यान गर्भाशयाची पिशवी आणि योनीच्या कोशिकांचा नमुना घेण्यात येतो. पॅप स्मिअरद्वारे गर्भाशय पिशवीत कॅन्सर आहे की नाही अथवा योनीमध्ये कॅन्सर आहे की नाही याची तपासणी करण्यात येते 

बॅक्टेरियल कल्चर (Bacterial Culture) – योनीमध्ये कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन नाही ना अथवा कोणत्याही संसर्गाने बाधित नाही याची तपासणी याद्वारे करण्यात येते. बॅक्टेरिया आणि व्हायरल संक्रमण तपासण्यासाठी याचा उपयोग करण्यात येतो. 

ADVERTISEMENT

कॉल्पोस्कोपी (Colposcopy) – पेल्विक परीक्षणादरम्यान योनी, पेल्विक आणि गर्भायशातील असामान्य जीवाणूंची तपासणी करण्यसाठी या टेस्टचा उपयोग करण्यात येतो. तसंच कॅन्सर आणि अन्य आजारांच्या तपासणीसाठीही याचा उपयोग करण्यात येतो. 

योनी बायोप्सी (Viganal Biopsy) – एखाद्याला योनीमध्ये कोणता आजार आहे याबाबत शंका असेल तर योनी ऊतकाचा एक लहानसा तुकडा तपासणीसाठी पाठविण्यात येतो. त्यालाच व्हजायनल बायोप्सी असे म्हणतात.

सगळ्या तपासण्या तर आपण जाणून घेतल्या पण योनीचे आजार अर्थात योनीसंबंधित नक्की कोणकोणते आजार आहेत तेदेखील आपण जाणून घेऊया. 

योनीचे आजार (Yoni Infection In Marathi) 

Yoni Infection In Marathi

व्हजायनाटिस (Vaginitis) – योनीमध्ये एक प्रकारे सूज येते आणि साधारणतः योनीतील यीस्ट संक्रमण अथवा बॅक्टेरियामुळे हा आजार उद्भवतो. योनीमध्ये खाज येणे, डिस्चार्ड होणे (अंगावरून पांढरा स्राव जाणे) आणि दुर्गंध येणे ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. अँटिबायोटिक आणि अँटिफंगल औषधाने यावर उपचार करतात येतात. 

ADVERTISEMENT

व्हजायनिस्मस (Vaginismus) – सेक्स करताना योनीच्या मांसपेशींना सूज येते या आजाराला व्हजायनिम्सम असे म्हणतात. सेक्स केल्याने होणारे भावनात्मक दुःख यामुळेदेखील उद्भवू शकते. व्यायाम, मलम हे यावरील उपचार आहेत. 

जननांग चामखीळ (Genital Warts) – जननांगमध्ये येणारे चामखीळ हे गर्भाशय आणि योनीवर परिणाम होतो. उपचाराद्वारे ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) या कारणामुळे हे चामखीळ निर्माण होतात. मात्र हे चामखीळ काढून टाकता येतात. 

ट्रायकोमोनिएसिस (Trichomoniasis) – सूक्ष्म किटाणूद्वारे योनीमध्ये होणाऱ्या संक्रमाणाचा हा आजार आहे. सेक्स करताना हा आजार होऊ शकतो. याचा उपाय सहज करता येतो. 

योनी कॅन्सर (Vaginal Cancer) – योनीचा कॅन्सर हा अत्यंत दुर्लभ आजार आहे. असामान्य रक्तस्राव अथवा डिस्चार्ज हे योनी कॅन्सरचे मुख्य लक्षण आहेत. याचा उपाय करणे अशक्य नाही मात्र तरीही यामध्ये हमी देता येत नाही. 

ADVERTISEMENT

बॅक्टेरियल वेजिनोसिस (Bacterial Vaginosis) – योनीमधील लाभदायक बॅक्टेरियाचे संतुलन बिघडल्यानंतर बऱ्याचदा दुर्गंधी डिस्चार्जची व्युत्पत्ती होते. तसंच एखाद्या नव्या व्यक्तीसह सेक्स केल्याने अथवा शारीरिक संबंध ठेवल्यामुळे या आजाराला सामोरे जावे लागते. अँटिबायोटिक औषधांद्वारे याचा इलाज करता येऊ शकतो. 

क्लेमायडिया (Chlamydia) –  क्लेमायडिया ट्रॅकोमॅटिस नावाच्या बॅक्टेरियामुळे सदर योनीचा आजार उद्भवू शकतो. या आजारामध्ये पोटदुखी, योनीमध्ये दुखणे अथवा योनीतून स्राव होणे अशी लक्षणे दिसून येतात. या कारणामुळे वंध्यत्व अथवा पेल्विक इन्फ्लेमेटरी रोगदेखील उद्भवू शकतो. अँटिबायोटिक औषधांद्वारे याचा इलाज  होतो. 

योनी भ्रंश (Vaginal Prolapse) – पेल्विक मांसपेशीवर साधारणतः प्रसूतीनंतर दबाव आल्यास, मलायश, मूत्राशय आणि गर्भाशयावर जोर येतो. गंभीर परिस्थितीमध्ये योनीचे मुख शरीराबाहेर येण्याची शक्यता असते. योनीचे अस्तर पातळ होते आणि याचा प्रचंड त्रास होतो. 

अधिक वाचा – व्हजायनाच्या आजूबाजूला काळी वर्तुळं झाली असतील तर करा सोपे उपाय

ADVERTISEMENT

योनीवरील विविध उपचार (Vaginal Treatments In Marathi)

Vaginal Treatments in Marathi

योनीच्या माहितीमध्ये (Yoni Information In Marathi) योनीवरील विविध उपचाराबाबत माहितीही महत्त्वाची आहे. यावर नक्की कोणकोणते उपचार आपण घेऊ शकतो ते जाणून घ्या. 

सूक्ष्मजीवनिवारक (Antimicrobials) – अँटीफंगल औषधे यीस्ट संक्रमणावर उपचार करतात आणि अँटीबायोटिक औषधाने जीवाणू संक्रमणावर उपचार करण्यात येऊ शकतो. अँटीव्हायरल औषधे हर्पिस व्हायरसने होणाऱ्या संक्रमणावर उपायकारक ठरतात.  

चामखिळांवर उपचार (Wart Treatments) – योनीमध्ये होणाऱ्या चामखिळांना काढून टाकायचे असेल तर त्यावरही उपचार आहे. त्यासाठी घाबरून जाण्याची गरज नाही. फ्रिजिंग, रासायनिक, लेझर अशा विविध पद्धतीने हे चामखीळ तुम्हाला काढून टाकता येतात. 

व्हजायनल पेसरी (Vaginal Pessary) – व्हजायनल पेसरी हे एक लहानसे प्लास्टिक अथवा रबरचे डिव्हाईस आहे, जे पेल्विकचा विस्तार करण्यासाठी वापरण्यात येते. 

ADVERTISEMENT

किगल एक्सरसाईज (Kegel Exercise) – श्रोणि मांसपेशीच्या व्यायामासाठी याचा वापर करण्यात येतो. हा योनीसाठी एक उत्तम व्यायाम समजण्यात येतो. आपण आपला मूत्रप्रवाह काही वेळांसाठी थांबवून ठेवतो त्याचप्रमाणे हा व्यायामाचा प्रकार आहे. योनी मुख वाढण्यापासून आणि मूत्र असंयमित असेल तर थांबविण्यास मदत करते. 

एस्ट्रोजन (Estrogen) – महिलांचे अंतर्गत आणि बाह्य अंग हे एस्ट्रोजन हार्मोनने प्रभावित असते. रजोनिवृत्तीच्या नंतर महिलांना एस्ट्रोजन हा उपाय उपयोगी ठरतो. 

सर्जरी (Surgery) – योनी आणि गर्भाशय पिशवीतील कॅन्सर हा आजार दुर्लभ आहे. ट्यूमर काढून टाकण्यासाठी सर्जरीचा आधार घ्यावा लागतो. योनीचे मुख वाढले असेल तरीही हाच उपचार योग्य ठरतो. 

व्हजायना किंवा योनीबाबत लक्षात ठेवा या गोष्टी

तुम्हाला योनीसंबंधित काही माहिती हवी असेल (Vagina Information In Marathi) आणि लाज वाटत असेल तर तुम्ही हा लेख नक्की वाचा. काही महत्त्वाच्या बाबी ज्या योनीसंबंधी (Yoni Information In Marathi) तुम्हाला माहीत असायलाच हव्यात. 

ADVERTISEMENT

साबण आणि क्लिंन्झरपासून राहा दूर 

तुमची योनी स्वच्छता राखण्याचे काम स्वतःच करत असते. यामध्ये विविध प्रकारच्या ग्रंथी असतात ज्या योनीचे क्षेत्र स्वच्छ राखण्यासाठी आवश्यक द्रव निर्माण करत असतात. त्यामुळे रासायनिक पदार्थ आणि सुगंध असणारे उत्पादन अर्थात साबण, बॉडी वॉश याचा वापर योनी स्वच्छतेसाठी करू नये. त्यामुळे योनीमध्ये जळजळ निर्माण होण्याची शक्यता असते आणि नैसर्गिक बॅक्टेरियाला यामुळे हानी पोहचू शकते. नैसर्गिक लाभदायक बॅक्टेरिया कमी झाल्यास, व्हयाजनामध्ये खाज येणे आणि दुर्गंध येणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते. लेबियाच्या ठिकाणी तुम्ही साबण लावा. मात्र अंतर्गत भागात साबण लाऊ नका. 

योनीची लांबी ही साधारणतः 3-4 इंचाची 

कामोत्तेजनेदरम्यान योनीची लांबी दुप्पट होते. कोणत्याही महिलेला जर सेक्सदमरम्यान शिष्न आत गेल्यावर दुखत असेल तर तिने ल्युब्रिकंट्सचा वापर करावा. तुम्हाला जितकी अधिक कामोत्तेजना होते तितका योनीमध्ये दुःखाचा अंश कमी होतो. योनीची लांबी ही साधारणतः तीन ते चार इंच इतकी असते. 

एस्ट्रोजनचा स्तर कमी होणे 

वाढत्या वयानुसार केवळ तुमच्या चेहऱ्यातच नाही तर तुमच्या योनीमध्येही बदल होत असतो. एस्ट्रोजनचा स्तर कमी झाल्याने लेबियाची जाडी कमी होऊ शकते. योनीची त्वचादेखील वेगळा रंग घेते. मात्र याचा सेक्सवर कोणताही परिणाम होत नाही. 

प्रसूतीनंतर योनीतील बदल

प्रसूतीनंतर तुमच्या डोळ्यांना दिसतील इतके बदल होतात. तुमच्या योनीतील बदल तुम्हाला जाणवत असेल तर यावेळी तुम्ही किगल व्यायामाचा आधार घेऊ शकता. तुम्ही सहज घरच्या घरी हा व्यायाम करू शकता. योनी निरोगी राखण्यासाठी केवळ सेक्स हा एकमेव पर्याय नाही तर तुम्हाला किगल व्यायामदेखील करायला हवा. 

ADVERTISEMENT

सेक्सदरम्यान डिस्चार्ज होणे

सेक्सदरम्याने डिस्चार्ज होणे हे तज्ज्ञांच्या मते असामान्य नाही. वाढत्या वयानुसार याचा अधिक अनुभव येतो. वास्तविक मूत्रमार्गाजवळ असणाऱ्या ग्रंथी या मूत्राशय आणि योनीमधील ट्युबच्या माध्यमातून योनीस्राव होतो. महिलांमध्ये प्रोटेस्ट, ग्रंथीचा संग्रह, रक्तवाहिन्या सर्व मिळून तयार होते आणि जेव्हा हे उत्तेजित होते तेव्हाच द्रव्याचा स्राव होतो अर्थात डिस्चार्ज होते. 

प्रश्नोत्तरे (FAQ’s)

1. योनीला झालेले इन्फेक्शन कसे ओळखावे ?

योनीतून दुर्गंधी येत असेल अथवा सतत खाज येत असेल तर योनीमध्ये इन्फेक्शन झाले आहे हे ओळखावे. व्हजायनल यीस्ट इन्फेक्शन होते म्हणजे नेमके काय होते तर जेव्हा व्हजायनामध्ये बॅक्टेरिया आणि यीस्टचं संतुलन बिघडतं तेव्हा हा त्रास महिलांना सुरू होतो. यामुळे खाज येणं, जळजळ होणं अथवा व्हजायनाला सूज येणं यासारखे प्रकार होत असतात. 

2. योनीची स्वच्छता ठेवताना काय लक्षात ठेवावे ?

ADVERTISEMENT

योनीच्या स्वच्छतेसाठी अनेक उत्पादने मिळतात. व्हजायनल वॉश आणि वाईप्स असे वेगवेगळे प्रकार तुम्हाला तुमच्या सोयीनुसार निवडता येतात.

3. योनीमध्ये नक्की खाज काय येते ?

सेक्स, टाईट कपडे, साबणाचा वापर अथवा मेनोपॉज या कोणत्याही कारणामुळे अथवा यीस्ट इन्फेक्शनमुळेही योनीमध्ये खाज येऊ शकते.

14 Sep 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT