ADVERTISEMENT
home / आरोग्य
yoni-mudra-for-women-health-benefits-in-marathi

योनी मुद्रा आहे महिलांसाठी फायदेशीर, इत्यंभूत माहिती

तुमचे वय गरोदर राहण्यसाठी सध्या योग्य आहे का?
तुम्हाला तुमच्या फर्टिलिटीमध्ये सुधारणा व्हायला हवी आहे का?
तुम्हाला निरोगी मेनोपॉज हवाय का?
तुम्ही तुमची ऊर्जा स्थिर करू इच्छिता का आणि आयुष्यात तुम्हाला निरोगी राहायचं आहे का?

जर या सगळ्या प्रश्नांची उत्तरे हो असतील तर तुम्ही तुमच्या नियमित व्यायामामध्ये योनी मुद्रा (Yoni Mudra) समाविष्ट करून घ्यायला हवे. योनीसंबंधित माहिती आपल्या आयुष्यात जाणून घेणे गरजेचे आहे. योनी मुद्रा आपल्याकडे सर्वोत्तम मुद्रा असून आपल्या शरीरातील पाचही तत्वांना संतुलित करण्याचे काम करते. यामुळे वात, पित्त आणि कफ या तिन्ही दोषांना संतुलित करण्यासाठी मदत मिळते. याच्या नियमित अभ्यासाने तुम्हाला निरोगी आरोग्य मिळू शकते. याबाबत आयुर्वेदातही माहिती देण्यात आली आहे. तुम्हीही निरोगी आयुष्य जगावे यासाठी आम्ही योनी मुद्रेबाबत अधिक माहिती (Information About Yoni Mudra) देत आहोत. हिंदू धर्मात योनी मुद्रा ही स्त्री देवता शक्तीला समर्पित करण्यात येते. गर्भाच्या महिला रचनात्मक शक्तीला यापासून जन्म मिळतो असे म्हणतात. योनी मुद्रेमुळे महिलांना आयुष्यातील शांतता आणि आनंदाची स्थिती अनुभवता येते. 

योनी मुद्रा हे संस्कृत शब्द असून योनी अर्थात गर्भ जो महिलांच्या रिप्रॉडक्टिव्ह सिस्टिमसाठी संदर्भित आहे आणि मुद्रा अर्थात हाताची बोटे अथवा अंगठ्याचा इशारा. महिलांची रिप्रॉडक्टिव्ह सिस्टिम सुधारण्यासाठी योनी मुद्रेचा वापर करण्याची गरज आहे. तसंच मन आणि शरीर स्वस्थ राहण्यासाठी ही मुद्रा उपयोगी ठरते. 

योनी मुद्रा करण्याची पद्धत 

  • ही मुद्रा करण्यासाठी तुम्ही सुखासन अथवा वज्रासन पद्धतीत बसा 
  • आपले खांदे वरच्या बाजूला घ्या अथवा भिंतीचा आधार घेऊन ताठ बसा आणि पाठीचा कणा ताठ ठेवा 
  • आपला हात गर्भाच्या आकाराप्रमाणे दुमडा 
  • त्यानंतर दोन्ही हात वर घ्या आणि अंगठा कानाजवळ घ्या 
  • त्यानंतर तर्जनी आपल्या डोळ्यावर आणि मध्यमा बोट आपल्या नाकाजवळ आणि अनामिका तुमच्या ओठाच्या वरच्या भागावर ठेवा 
  • तसंच लहान बोट हे ओठाच्या खालच्या भागावर ठेवा 
  • दीर्घ श्वास घ्या आणि मध्यमाने दोन्ही नाकपुड्या बंद करा 
  • आपल्या क्षमतेनुसार श्वास रोखा आणि मग ओम नामाचा जप करत हळूहळू श्वास बाहेर सोडा 
  • त्यानंतर पुन्हा आपल्या मूळ स्थितीत या 
  • योनी मुद्रा करताना सुरूवातीला तुम्ही प्रशिक्षकाची मदत घ्या. देखरेखीमध्येही ही मुद्रा करा 

महिलांसाठी योनी मुद्रेचे लाभ (Benefits of Yoni Mudra)

योनी मुद्रा

योनी आसनाचे अर्थात योनी मुद्रेचे अनेक फायदे आहेत. यापैकी काही फायदे आम्ही तुम्हाला सांगत आहोत

ADVERTISEMENT
  • युट्रसचे काम होते नियंत्रित – योनी मुद्रासन हे युट्रससाठी लाभदायक आहे आणि प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी याची मदत मिळते. महिलांसाठी हे आसन एक उत्तम आसन मानले जाते. हार्मोनल असंतुलित असेल तर ते नियंत्रित करण्यासाठी आणि प्रजनन प्रक्रिया उत्तम होण्यासाठी याचा उपयोग होतो 
  • स्त्री ऊर्जा अधिक वाढविण्यासाठी या मुद्राचा होतो उपयोग – योनी मुद्रा ही महिलांना त्यांच्या आंतरिक ऊर्जा वाढविण्यासाठी उपयोगी ठरते. शरीर आणि प्राण यादरम्यान सामंजस्य आणि संतुलन महिलांना राखण्यासाठी मदत करते. 
  • मासिक पाळीदरम्यान उपयोग – योनी मुद्रा गर्भ आणि मासिक पाळी चक्र आणि जड चक्राशी संबंधित आहे. हे आसन गर्भात प्राण अधिक मजबूत करण्यासाठी फायदेशीर ठरते. मासिक पाळीदरम्यान याचा उपयोग होतो. मासिक पाळीत होणारा त्रास कमी करण्यसाठी याची मदत मिळते. 
  • तणाव दूर होतो – बोटांमध्ये पृथ्वी तत्वातील पाच तत्व मिसळून योनी मुद्राचे रूप विकसित केले आहे. योग मुद्रेचा उपयोग करण्यात येणाऱ्या हाताची विविधता आणि त्याचा उपयोग मन आणि शरीर शांत करण्यासाठी करण्यात येतो. त्यामुळे तणावमुक्त राहण्यास मदत मिळते. तसंच मनातील अस्थिरता कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. ही मुद्रा आपल्या नर्व्हस सिस्टिमसाठीही उपयोगी ठरते. तसंच एकाग्रता वाढविण्यासाठीही याची मदत मिळते. तसंच आंतरिक शांती यामुळे मिळते
  • जमिनीशी जोडलेले राहता येते – योनी मुद्रा आध्यात्मिक रूपाला समृद्ध करणार आहे. या आसनापासून शांती आणि मनःशांती मिळण्यास मदत मिळून आत्मविश्वास निर्माण होतो. हे मनाच्या आत शरीरातील तत्वांमध्ये जागरूकता निर्माण करते 

योनी मुद्रा अर्थात योनी मुद्रासनाबाबत आम्ही तुम्हाला सर्व माहिती दिली मात्र हे आसन करण्यापूर्वी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला एकदा नक्की घ्या. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

11 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT