सोशल मीडिया हल्ली सगळ्यांचे सर्वस्व झाले आहे. काहीही घेतलं, काहीही खुपलं की लगेच ते सोशल मीडियावर पोस्ट करायची सगळ्यांना सवय झाली आहे. खऱ्या आयुष्यात स्पर्धा असताना त्यात भर म्हणून आता सोशल मीडियावर ही स्पर्धा सुरु झाली आहे. ही स्पर्धा लाईक्स, कमेंट्स आणि फॉलोअर्स मिळवण्यासाठीची असते. जितके फॉलोअर्स जास्त तितकी व्यक्ती प्रसिद्ध.. सर्वसामान्यांच्या आयुष्यात या गोष्टी फार कमी घडत असल्या तरी ज्यांना सेलिब्रिटी असा मान आपण देतो अशांसाठी मात्र ही जीवन मरणाची गोष्ट असते. सतत फॅन्सला थँक्स म्हणणे, त्यांच्यासाठी काहीतरी पोस्ट करणे असे सतत घडत असते. पण या सगळ्याचा परिणाम हा आताच्या तरुणांवर होत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणजेच आभासी माध्यमातून मिळणारी ही प्रसिद्धी त्यांच्या आयुष्यात विष कालवत असल्याचे विश्वसुंदरी मानुषी छिल्लर हिने म्हटले आहे. या मायाजाळापासून तरुणांनी दूरच राहावे असा सल्ला तिने दिला आहे.
कोरोना व्हायरसमुळे ‘या’ कलाकारांना सोडावी लागली लोकप्रिय मालिका
मानुषीला आहे युवा पिढीची काळजी
मानुषीने सांगितले की, हल्ली सगळ्यांनाच नव्या आलेल्या टेक्नॉलॉजीमध्ये निपुण व्हायचे असते. त्यांना या सोशल प्लॅटफॉर्मवरुन स्वत:ला परफेक्ट दाखवायचे असते. पण आभासी दुनिया आणि चांगल्या गोष्टींची त्यांना इतकी भूरळ पडते की, अशावेळी जरच त्यांच्याबद्दल कोणीही वाईट बोलले की, त्यांना सहन होत नाही. ही सहनशक्ती या सोशल मीडियाने कमी केली आहे. ज्या ठिकाणी तुमचे प्रशंसक असतात. तिथे निंदा करणारे लोकही असतात. त्यांचा सामना तुम्हाला करता आला पाहिजे. हा सामना करताना हल्लीची पिढी दिसत नाही. टेक्नॉलाॉजीचा अवलंब करताना या सगळ्या गोष्टींचा विचार त्यांनी केला पाहिजे तरच या टेक्नॉलॉजीचे दुष्परिणाम होणार नाहीत.
तुम्हाला किती लोक लाईक्स करतात नाही महत्वाचे
अत्यंत महत्वाचा मुद्दा मानुषीने या निमित्ताने मांडला आहे तो म्हणजे मानुषीने स्पष्ट केले आहे की, या सोशल प्लॅटफॉर्मच्या आभासी दुनियेत तुम्हाला किती लाईक्स मिळतात हे महत्वाचे नाही.कारण या कोणत्याच गोष्टी तुमच्याशी निगडीत नाही. या ठिकाणी कमी लाईक्स मिळाले म्हणजे तुम्ही चांगले नाही, असे मुळीच होत नाही. त्यामुळे तुम्ही या गोष्टीचे आकलन करायला हवे असे देखील ती म्हणाली.
अरे हा बिनोद आहे तरी कोण? सोशल मीडियावर त्याचीच चर्चा
अक्षयकुमारसोबत करणार डेब्यू
मानुषी छिल्लरच्या सुंदरतेची चर्चा साऱ्या जगाने केली आहे. मिस वर्ल्ड झाल्यानंतर तिने अनेक सामाजिक उपक्रमांतर्गत काम केली. ती लवकरच बॉलीवूडमध्येही डेब्यू करणार आहे. अक्षयकुमारसोबत ‘पृथ्वीराज’ या चित्रपटात ती आपल्याला दिसणार आहे. हा चित्रपट एक बायोपिक असणार आहे. पृथ्वीराज चौहान या योद्ध्याची ही कहाणी चित्रपटातून मांडण्यात येणार आहे. नोव्हेंबरमध्ये हा चित्रपट रिलीज होणार होता. पण सध्या या संदर्भात कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या चित्रपटाव्यतिरिक्त मानुषी अनेक जाहिरातीमधूनही दिसली आहे.
पण सध्या मानुषीने तरुणांना दिलेला संदेश अत्यंत महत्वाचा आहे. याकडे सगळ्यांनीच लक्ष द्यायला हवे.
टीव्हीवर या कलाकारांनी निभावली आहे साक्षात श्रीकृष्णाची भूमिका