Advertisement

बॉलीवूड

‘राधे’ चित्रपटाच्या कमाईपेक्षाही चर्चेत आहे हा पॅरडी व्हिडिओ

Leenal GawadeLeenal Gawade  |  Jun 8, 2021
‘राधे’ चित्रपटाच्या कमाईपेक्षाही चर्चेत आहे हा पॅरडी व्हिडिओ

कधी कधी एखाद्या चित्रपटापेक्षा त्याचा पॅरडी व्हिडिओ हा लोकांना अधिक आवडतो. हो हे अगदी खरं आहे. एखादा कितीही बिग बजेट चित्रपट असला तरी त्याची खिल्ली उडवण्यासाठी युट्युबर्स अशा प्रकारे काही विनोदी व्हिडिओ बनवतात की, लोकांना त्या चित्रपटापेक्षाही असे व्हिडिओ जास्त लक्षात राहतात. आता दबंग खान सलमान खानचा आलेला राधे चित्रपटच बघा ना, आला कधी गेला कधी कोणालाही कळलं नाही. भाईचा चित्रपट येणार म्हणून अनेकांनी ओटीटीचे पैसेही भरले पण ते पैसे वाया गेले अशाच प्रतिक्रिया चित्रपटाविषयी उमटू लागल्या. पण आता पुन्हा एकदा भाईजानचा राधे चर्चेत आला आहे. पण हा तो राधे नाही हा एका युट्युबरने त्याच्या स्टाईलने केलेला राधे चित्रपट आहे. चला तर जाणून घेऊया नेमका त्याचा हा व्हिडिओ आहे तरी काय?

रिंकू राजगुरुच्या फिटनेसचे फोटो होतायत व्हायरल, असा झालाय बदल

बनवला पॅरडी व्हिडिओ

युट्युबर आदर्श आनंद याने हा राधे चित्रपटाचा स्पुफ व्हिडिओ बनवला आहे. त्याने त्याच्या पद्धतीने हा व्हिडिओ विनोदी करण्याचा प्रयत्न केला आहे जो त्याच्या फॅन्सना इतका आवडला आहे की, त्याच्यावर कमेंट्सचा पाऊस पडू लागला आहे.  खूप जणांनी त्याने  बनवलेला हा व्हिडिओ खऱ्या चित्रपटापेक्षा चांगला आहे असा म्हटला आहे. यामधील राधे पाहिल्यानंतर  तेरे नाम मधील राधे तुम्हाला नक्की आठवेल. यामध्ये लहान मुलांनी देखील काम केले आहे.  राधेचं काम ज्याने केलं आहे  त्याने तरुण सलमान साकारण्याचा प्रयत्न केला आहे. तसाच आवाज काढण्याचा प्रयत्न केला आहे. यामधील लहान मुलांची कामंही वाखाणण्यासारखी आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ 4 लाखांहून अधिकांनी पाहिला आहे. हा व्हिडिओ एक महिन्याआधी पोस्ट करण्यात आला आहे. आता या व्हिडिओबद्दल सगळं इथेच सांगण्यापेक्षा तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतरच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. 

पहिल्यांदाच एकत्र काम करणार सारा अली खान आणि अमृता सिंह, फोटो झाले व्हायरल

राधे केला रिलीज

राधे हा चित्रपट तयार होऊन बराच काळ लोटला होता. पण कोरोनामुळे हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज करता येत नव्हता. पण अखेर सलमानने यंदाच्या ईदचा मुहूर्त साधत चित्रपट परदेशातील सुरु असलेल्या थिएटरमध्ये रिलीज केला. तर भारातील प्रेक्षकांसाठी त्याने ओटीटीवर हा चित्रपट रिलीज केला. यासाठी त्याने ओटीटीवर खास स्किमही आणली. त्यामुळे हा चित्रपट अनेकांचा विरोध पत्करुन रिलीज करण्यात आला. या चित्रपटात दिशा पटनी, जॅकी श्रॉफ, रणदीप हुडा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. रणदीपने साकारलेला व्हिलन हा सलमानच्या भूमिकेच्या तुलनेतही अधिक चांगला आहे. हा चित्रपट अधिक चांगला असेल अशी अपेक्षा प्रेक्षकांना होती. पण हा चित्रपट फुसका बार निघाला अशीच प्रतिक्रिया सगळ्यांची उमटली. 

सलमानच्या चित्रपटाला नाही मिळाला प्रतिसाद

लॉकडाऊनमुळे सगळेच घरी बसून आहेत अशा वेळात लोकांना मनोरंजनाचे उत्तम साधन म्हणजे ओटीटी प्लॅटफॉर्म मिळाला आहे. यावर सीरिज आणि चित्रपटांचा भंडार असतो. असे असताना राधे सारख्या फारच क्षुल्लक स्टोरीलाईन असलेल्या चित्रपटाकडे बऱ्याच जणांनी पाठ फिरवली. त्यामुळे म्हणावा तितका फायदा सलमान खानला झाला नसावा हे नक्की!


आता तुम्ही हा स्पुफ व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पाहा

10 जणांच्या उपस्थितीत अभिनेता अंकित गेराने उरकले गुपचूप लग्न