ADVERTISEMENT
home / मनोरंजन
दयाबेनची रिप्लेसमेंट नाही पण सध्या ही दयाबेन होतेय हिट

दयाबेनची रिप्लेसमेंट नाही पण सध्या ही दयाबेन होतेय हिट

हिंदीमधील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेली कित्येक वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेत आतापर्यंत अनेक चेहरे बदलले. पण काही मुख्य चेहरे अजूनही तेच आहेत. या मालिकेचा मुख्य पात्र दयाबेन ही गेल्या काही वर्षांपासून मालिकेतून गायब आहे. दयाबेन येण्याच्या चर्चा या वरचेवर कायम होत असतात. पण अजूनही मालिकेत तिने रिएंट्री केलेली नाही. पण आता या मालिकेत नाही. पण सोशल मीडियावर एक नवी दयाबेन आली आहे जिचा व्हिडिओ खूपच व्हायरल होत आहे. तिला दयाबेनच्या रुपात पाहून हीच तर होणारी दयाबेन नाही ना? असा प्रश्नही चाहत्यांना पडला आहे. ही युट्युबर अभिनेत्री असून तिने या मालिकेत आधीही काही लहान सहान भूमिका निभावल्या आहेत. पण अशा प्रकारे दयाबेनच्या रुपात तयार होऊन ती या रोलसाठी ऑडिशन देते की काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

अभिनेत्री हिना पांचाळला झाली अटक, जाणून घ्या कारण

 

कोणी केला हा व्हिडिओ

यु्ट्युबवर गरिमा गोएल नावाच्या अभिनेत्रीचे एक युट्युब चॅनेल आहे ज्याचे नाव आहे गरिमाज गुडलाईफ. या चॅनेलच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचे काम ही युट्युबर करते. तिने एक नवा व्हिडिओ अपलोड केला आहे. यामध्ये ती दयाबेनच्या रुपात दिसत आहे. तिने हा व्हिडिओ खास तारक मेहताच्या फॅन्ससाठी केला आहे. कारण दयाबेनचे हे पात्र खूप दिवस अनेकांना दिसू शकलेले नाही. दयाबेनच्या याच रुपात राहण्याचे चॅलेंच गरिमाने या व्हिडिओमध्ये घेतले आहे. या व्हिडिओमध्ये ती दयाबेनसारखी साडी, ज्वेलरी, हेअरस्टाईलमध्ये दिसत आहे. ती अगदी सारखीच दयाबेनसारखीच बोलतना दिसत आहे. त्यामुळे तिला पाहणे अनेकांना खूपच मजेशीर दिसत आहे. म्हणूनच तिच्या या व्हिडिओला खूप लोकांना लाईक्स केले आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच हिट झाला आहे.

ADVERTISEMENT

दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर करिना कपूर पुन्हा झाली तख्तच्या शूटिंगसाठी सज्ज

दयाबेनची आहे का रिप्लेसमेंट

आता गरिमा ही दयाबेनच्या रोलसाठी ऑडिशन देत आहे का असा प्रश्न देखील अनेकांना तिला केला आहे. पण सध्या व्हिडिओ पाहून तिने हा खास त्याचसाठी केला असे काही दिसत नाही. ती तिच्या युट्युबवर असे काही वेगवेगळे चॅलेंज असलेले व्हिडिओ कायमच करत असते. अगदी तसाच व्हिडिओ तिने हा देखील केला आहे. पण खूप दिवसांनी लोकांनी दयाबेन अशापद्धतीत पाहिल्यामुळे प्रेक्षकांनाही आनंद झाला आहे. त्यामुळेच की काय तिचा व्हिडिओ हा चांगला व्हायरल झाला आहे.पण अद्याप तरी ही दयाबेनची रिप्लेसमेंट नाही हे मात्र नक्की!

संस्कृतीच्या सौंदर्याने केले चाहत्यांना घायाळ

तारक मेहता.. मध्ये केलेत रोल

 गरिमा गोएल ही एक उत्तम अभिनेत्री असून तिने तारक मेहता मालिकेत अनेक लहान लहान रोल साकारले आहेत. त्यामुळे तिला या आधी अनेकांनी वेगवेगळ्या मालिकांमध्ये वेगवेगळ्या रुपात आधीच पाहिलेले आहे. तारक मेहताच्या सेटवरील अनेक फोटो तिने आतापर्यंत शेअर केलेले आहेत. त्यामुळ हा चेहरा अनेकांनी या आधीही पाहिली आहे. या शिवाय तिने अनेक मालिकांमधून काम केले आहे.

ADVERTISEMENT

 

दयाबेन परतणार

दयाबेन साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी ही मालिकेत परतणार याची चर्चा होत होती. पण ती अद्याप मालिकेत परतली नाही. तिच्या रोलसाठी अन्य काही अभिनेत्रींची निवड केल्याचेही कळत होते. पण तसेही झालेले नाही. दरम्यान आता तिच्या परतीसाठी काही खास एपिसोड केला जाईल असे कळत आहे. पण याबद्दलही शाश्वती नाही.

तो पर्यंत सगळ्यांनी ही दयाबेन एन्जॉय करा.

29 Jun 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT