नेहमी विचारण्यात येणारे प्रश्न
Contact care@popxo.com for assistance.
तुमचे प्रोफाईल
POPxo वर मी लिहित असलेल्या गोष्टी कोण पाहू शकतं?
केवळ साईन इन केलेल्या व्यक्तीच तुमची पोस्ट पाहू शकतात
मी अज्ञात म्हणून लिहिलेल्या पोस्टदेखील इतर युजर्स पाहू शकतात का?
सर्व युजर्स अज्ञात म्हणून केलेल्या पोस्ट अर्थातच पाहू शकतात. पण नक्की कोणी पोस्ट केलं आहे हे त्यांना कधीही कळणार नाही. तुमचं नाव या पोस्टमध्ये कधीही दिसणार नाही आणि शिवाय ते तुमच्या प्रोफाईलमध्येही कधीही दिसणार नाही.
मी जतन केलेल्या आणि माझे बुकमार्क्स असलेल्या गोष्टी मी पाहू शकते का?
हो तुम्ही तुमच्या जतन केलेल्या गोष्टी तुमच्या प्रोफाईल पेजवर तुमच्या माय बुकमार्क्सवरदेखील पाहू शकता
मी माझे युजरनेम बदलू शकते का?
तुम्ही तुमच्या गुगल अथवा फेसबुक आयडीवरून लॉगइन केलं असल्यामुळे सिस्टिम तुमचं तेच नाव वापरते
मी माझे प्रोफाईल पिक्चर बदलू शकते का?
हो. तुम्ही नक्कीच तुमचे प्रोफाईल पिक्चर बदलू शकता. त्यासाठी तुम्हाला प्रोफाईल पेजवर जाऊन सेटिंग्ज मध्ये जावं लागेल. त्यावर क्लिक करून एडिट बटण वर जा आणि तुम्ही तुमचे प्रोफाईल पिक्चर बदला
मी माझी वाढदिवसाची तारीख कशी बदलू?
तुम्ही तुमच्या प्रोफाईल पेजवरील सेटिंग्ज आयकॉनवर जा आणि तुमच्या वाढदिवसाच्या तारखेवर क्लिक करा आणि तुमच्या योग्य तारखेवर क्लिक करून तुम्ही तारीख बदलू शकता
मी दुसऱ्या युजरला कसं फॉलो करू?
तुम्हाला कोणत्याही युजरला फॉलो करायचं असल्यास, तुम्ही युजरच्या प्रोफाईलवर जा त्यावर क्लिक करून उजव्या बाजूला फॉलो आयकॉन क्लिक करा.
दुसऱ्या युजरबरोबर मी कसं चॅट करू शकते?
दुसऱ्या युजरबरोबर चॅट करण्यासाठी, युजर्सच्या प्रोफाईलवर जा आणि उजव्या बाजूला असलेल्या चॅट आयकॉनवर क्लिक करा
अॅपवर मी पोस्ट केलेले प्रश्न आणि पोल्स मी कशी पाहू शकते?
तुमच्याद्वारे पोस्ट केलेले प्रश्न आणि पोल्स पाहण्यासाठी तुम्ही तुमच्या प्रोफाईलवर क्लिक करा आणि नंतर तुमच्या पोस्टवर क्लिक करा
एखाद्या युजरविषयी रिपोर्ट नोंदवल्यास काय होतं?
popxo चं जग हे आपल्या युजर्सच्या कम्यनिटीकरिता अतिशय खासगी सेवा पुरवतं आणि केवळ त्यांच्याशी बोलण्यातच नाही तर त्यांना चांगला पाठिंबा देण्यातही अग्रेसर आहे. महिलांकरिता अतिशय सुरक्षित आणि व्यवस्थित वातावरण या कम्युनिटीमध्ये निर्माण करण्यात आले आहे आणि आम्ही कोणत्याही प्रकारच्या सायबर क्राईम, ट्रोलिंग आणि स्पॅमिंगला आमच्या अॅपवर थारा देत नाही. आमच्या टीमकडून अतिशय काटेकोरपणे सर्व प्रोफाईल्सकडे लक्ष ठेवलं जातं. एखाद्या युजरविषयी बऱ्याचदा तक्रार करण्यात आल्यास, त्या युजरसंदर्भात योग्य ती कारवाई करण्यात येते. त्या युजरला कम्युनिटीमधून ब्लॉकही केलं जातं.
तुमच्या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर मिळालं असं आम्हाला वाटत आहे. आम्हाला समजून घेतल्याबद्दल धन्यवाद!
माझ्या बॅजेस आणि स्कोअर्सचं काय?
आम्ही आता अजून काहीतरी नवं करण्याच्या मार्गावर आहोत. त्यामुळे वाट पाहा!
POPxo कम्युनिटी गाईडलाईन्स
popxo कशा प्रकारे साईन इन करता येतं?
popxo हे मुलींसाठी मुलींकडूनच बनविण्यात आलेलं आहे. भारतातील मुली अगदी मनमोकळेपणाने आणि समाधानकारकरित्या बोलू शकतील यासाठीच हे अॅप मुलींकरिता बनवण्यात आले आहे. त्यांच्या आयुष्यातील नक्की काय चढउतार आहेत, हे इथे त्यांना दर्शवता येईल. याच कारणामुळे गप्पाटप्पा या विभागात मुलांना प्रवेश देण्यात आलेला नाही. मुलं या संकेतस्थळावर येऊन आर्टिकल्स वाचू शकतात. तसंच आमचे व्हिडिओदेखील पाहू शकतात आणि पॉपएक्स शॉपवर शॉपिंगदेखील करू शकतात. त्यामुळे तुम्ही कोणत्याही गोष्टी अगदी मुक्तपणे विचारू शकता
popxo वर मी काय करू शकते आणि काय नाही?
करता येण्याजोगे:
 • - तुम्ही जसे आहात तसेच राहा. तुम्हाला काळजी वाटणाऱ्या विषयांवर तुम्ही कम्युनिटीमध्ये बोला
 • - नेहमी सकारात्मक आणि मदतीला तयार राहा. popxo कम्युनिटी ही मुलींकरिता असून त्यांना प्रत्येक गोष्टीला पाठिंबा देते आणि कोणत्याही नकारात्मकतेशिवाय इथे तुम्ही बिनधास्त बोलू शकता
 • - मदतीला तयार राहा. कोणीही प्रश्न विचारला तर तुमच्याकडे सल्ला असल्यास, योग्य सल्ला द्या
 • - दुसऱ्यांना वाचायला सोपं होईल अशाच भाषेमध्ये लिहा. (व्यवस्थित शब्द,पूर्ण वाक्य इत्यादी)
 • - कम्युनिटी सुरक्षित राहील यासाठी मदत करा. नियमावली भंग होईल असे पोस्ट अथवा युजर्सना काढून टाकण्यात येईल
करू नये:
 • - लोकांना पारखू नका. त्यांची मस्करी करून नका. त्यांच्या लिखाणावर कोणतंही असभ्य वर्तन करू नका
 • - दुसऱ्या युजर्सना सेक्सला प्रवृत्त करणारं कोणत्याही प्रकारे सेक्शुअल ग्राफिक अथवा लिखाण पाठवू नका
 • - कोणत्याही धर्म अथवा राजकीय पक्ष, युट्यूब, इन्स्टाग्राम हँडल्स अथवा बिझनेस या गोष्टी इथे प्रमोट करू नका
 • - बिझनेस, सेमिनार्स अथवा व्हॉट्स अप ग्रुपसंबंधी कोणत्याही पोस्ट इथे पोस्ट करू नये
 • - कोणताही प्रश्न सतत विचारू नका
 • - व्यक्तीगत भांडणं असल्यास युजर्सवर इथे व्यक्तीगत राग काढू नका
 • - बेकायदेशीर (पायरसी, ड्रग्ज, पोर्नोग्राफी इ.) गोष्टींना प्रवृत्त करू नका
 • - तुमचा फोन नंबर, ई-मेल आयडी, सोशल मीडिया प्रोफाईल लिंक्स इं. व्यक्तीगत तपशील तुम्ही पोस्ट करू नका अथवा अन्य कोणत्याही युजर्सना विचारू नका
popxo वरील पोस्ट वर लक्ष ठेवलं जातं का?
कम्युनिटीसाठी आखण्यात आलेल्या नियमावलींचं पालन करण्यात येतं की नाही याकडे मॉडरेडर्सचं व्यवस्थित लक्ष असतं. कोणत्याही अयोग्य पोस्ट शेअर केल्यास, त्या पोस्ट लपवल्या जातात. तसंच जो युजर नियमावलींचा भंग सतत करतो त्याला popxo वरून काढून टाकण्यात येतं.
मला माझे इमेज पोल्स अथवा इमेज प्रश्न का दिसत नाहीत?
सर्व इमेज सर्वात पहिल्यांदा आमच्या मॉडरेटर्सना दिसतात. आमच्या नियमावलीप्रमाणे तुमची पोस्ट आहे की नाही हे पाहून झाल्यानंतर साधारण 6-8 तासांनी या पोस्ट तुम्हाला दिसतात. पण तेही अपलोड व्हायला किती वेळ लागतो यावर अवलंबून आहे
मी प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला. पण अॅपवर कुठेही माझं उत्तर दिसत नाही. असं का?
आम्ही काही शब्दांवर बंधन ठेवलं आहे. आमच्या मॉडरेशन सिस्टिमप्रमाणे काही शब्द तुम्ही पोस्ट केल्यास, जर चुकीचे असतील तर ते डायरेक्टली मॉडरेशनच्या कक्षेत येतात आणि मग तुम्ही जे पोस्ट केलं आहे ते तुम्हाला दिसत नाही. तुम्ही दाखल केल्यानंतरही जर तुम्हाला तुमची पोस्ट दाखवत नसेल तर तुम्ही थोडी वाट पाहा. तुमच्या पोस्टद्वारे आमचं मॉडरेशन चालू असून ती पोस्ट आमच्या कम्युनिटी नियमावलींच्या नजरेखालून जात असेल हे नक्की
मी एखाद्या पोस्टविषयी रिपोर्ट करू शकते का?
तुम्हाला एखादी गोष्टी चुकीची वाटली अथवा स्पॅम वाटत असल्यास, तुम्ही कधीही कोणत्याही वेळी त्याची तक्रार करू शकता. त्याबद्दल मॉडरेटर नक्की दखल घेईल
दुसऱ्या युजर्सबद्दल तक्रार नोंदवू शकतो का?
popxo च्या कम्युनिटीमधील एखादा युजर नसल्यास, तुम्ही तुमच्या प्रश्नाच्या पुढे 3 डॉट्स देऊन अथवा उत्तरावर 'reporter user'वर जाऊन क्लिक करा. आमचे मॉडरेटर यावर नक्की दखल घेत योग्य ती कारवाई करतील
मी सध्या अगदी वाईट परिस्थितीतून जात आहे. मला popxo कम्युनिटीकडून काही मदत मिळेल का?
हो नक्कीच. तुम्हाला नक्की काय अडचण आहे अथवा तुम्हाला कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे याविषयी popxo कम्युनिटी नक्कीच जाणून घेईल आणि तुम्हाला इथे तुमच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर मिळेल. तुम्हाला कोणत्याही प्रकारची व्यावसायिक मदत हवी असल्यास, आम्ही तुम्हाला तुमच्या शिक्षणाशी संबंधित संस्थांचा संदर्भ देऊ
इथे असलेली एक पोस्ट मला अजिबात आवडलेली नाही. तुम्ही ती काढून टाकू शकता का?
आम्हाला तुमचा फिडबॅक मिळाला. चांगलं अथवा वाईट हा प्रश्न असल्यास, कम्युनिटीच्या एखाद्या सभासदाने पोस्ट केलेला प्रश्न, उत्तर वा कमेंट हे आमचा घटक नाही. पण तुम्हाला एखादी स्टोरी अथवा आर्टिकल न आवडल्यास, तुम्ही आम्हाला community@popxo.com वर लिहून कळवू शकता आणि कृपया त्यामध्ये आर्टिकल लिंक करायला विसरू नका. आम्ही त्याचा आढावा घेऊ आणि ते आर्टिकल पुन्हा एडिट करून तुमचा मुद्दा लक्षात घेऊन पोस्ट करू
popxo कडून मला नेहमी अपडेट्स कशा मिळत राहतील?
तुमच्या फोनमध्ये popxo कडून नेहमी अपडेट्स मिळण्यासाठी परवानगी देणं गरजेचं आहे.,तुम्ही आम्हाला आमच्या फेसबुक पेजवर फॉलो करू शकता [ http://www.facebook.com/popxodaily], आमचे इन्स्टाग्राम फीड [ http://www.instagram.com/popxodaily ] आणि आमचा युट्यूब चॅनेल [ http://www.youtube.com/popxotv] वर फॉलो करू शकता
मी कोणालाही डायरेक्ट मेसेजद्वारे रिपोर्ट करू शकते का ?
जर मला डायरेक्ट मेसेज आलेल्यासंदर्भात कोणालाही रिपोर्ट करायचं असेल तर कृपया community@popxo.com यावर डायरेक्ट मेसेजच्या स्क्रिनशॉटसह मेल करा आणि त्याचप्रमाणे यामध्ये त्या व्यक्तीविषयी नक्की काय तक्रार आहे याचं कारण स्पष्ट करा
आमच्याबद्दल
काय आहे POPxo?
popxo ही मुलींची काळजी घेणारी अशी एक कम्युनिटी आहे. स्टोरीज वाचण्यासाठी आणि व्हिडिओ पाहण्यासाठी, तसंच चर्चा करण्यासाठी आणि तुमच्या काम, नातं आणि सेक्ससंदर्भापासून ते अगदी फॅशन आणि सौंदर्याविषयी सर्व काही आपले अनुभव शेअर करण्यासाठी हा एक चांगला प्लॅटफॉर्म आहे
popxoटीम कशी जॉईन करता येईल?
प्रतिभासंपन्न लोकांनी popxo शी जोडेल जावे असे आम्हाला नेहमीच वाटते.popxo मध्ये असलेल्या नोकरी संदर्भातील माहिती तुम्हाला [http://popxo.breezy.hr]. वर मिळू शकेल. जर तिथे तुम्हाला काही संधी तुम्हाला दिसली नाही तरी निराश होई नका. jobs@popxobj आम्हाला तुमचा cv आणि तुमच्याबद्दलची अधिक माहिती पाठवून द्या.
मी माझ्या स्टोरी popxo वर टाकू शकते का?
हो नक्कीच तुम्ही तुमच्या स्टोरी आमच्या community@popxo.com वर मेल करु शकता.तुमचा मेल आम्ही आमच्या संपादकांकडे पाठवू, जर तुम्ही पाठवलेला लेख आमच्या कम्युनिटीसाठी योग्य असेल तर आम्ही तुमची स्टोरी आमच्या पेजवर घेऊ. जर हा लेख, स्टोरी तुमच्या स्वानुभवावर अवलंबून असेल तर तुम्ही #mystory असे लिहायला विसरु नका
popxo ब्रँडसोबत कसे काम करते?
काहीतरी वेगळे करायला आम्हाला नेहमीच आवडते. आम्ही ब्रँडसाठी काम करताना त्यांच्यासाठी खास लेख, काही मजेशीर स्पर्धा, कार्यक्रम, सोशल मीडिया कॅम्पेन, असं बरचं काही करतो.जर तुम्हाला आमच्यासोबत काम करायची इच्छा असेल तर तुम्ही संजना इपे यांना partner@popxo.com वर मेल करु शकता. तुम्हाला नक्की काय करायचे आहे ते आम्हाला जरुरु कळवा
इन्फ्लुएनसर्स popxo सोबत कसे काम करु शकतात?
जर तुम्हालाही वाटतं की तुम्ही प्रभावशाली आहात आणि popxo सोबत काम करु इच्छिता तर तुम्ही आमच्या मार्केटींग प्लॅटफॉर्म Plixxo वर साईनअप करा.तुम्हाला तुमच्या पेड पोस्टसाठी अनेक संधी तिथे मिळतील याशिवाय अन्यही संधी तुम्हाला त्या माध्यमातून मिळू शकतील.
ऑर्डर्स आणि माझे खाते
माझीऑर्डर confirmed झाली आहे का?
तुम्हाला या संदर्भातील एसएमएस किंवा मेल येईल. अन्यथा तुम्ही care@popxo.com वर देखील या संदर्भात मेल करु शकता किंवा मदत मिळवू शकता
तुम्ही कोणत्या स्वरुपात पेमेंट स्विकारता?
आम्ही सगळे visa आणि mastercard स्विकारतो.
मी कस्टमर केअरकडे माझ्या तक्रारीचा मेल केला होता पण मला उत्तर आले नाही,असे का?
आमच्या कामाची वेळ सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते संध्याकाळी 6 अशी आहे. या कालावधीत आम्ही 48 तासांत आलेल्या सगळ्या शंका दूर करण्याचे काम करतो. त्यामुळे थोडं थांबा आम्ही तुम्हाला लवकरच प्रतिसाद देऊ
popxo शॉपमधून खरेदी करण्यासाठी माझे अकाऊंट असण्याची गरज आहे का?
नाही. popxoशॉपमधून शॉपिंग करण्यासाठी तुम्हाला अकाऊंट असण्याची काहीच आवश्यकता नाही. जर तुमचे अकाऊंट असेल तर तुम्हाला खरेदी करताना फार वेळ लागणार नाही.
 • - जलदगतीने खरेदी करण्यासाठी
 • - तुम्ही मागविलेल्या वस्तुंचे स्टेटस चेक करा
 • - तुुमच्या मागील ऑर्डर्स
 • - तुमच्या अकाऊंटमध्ये बदल करण्यासाठी
 • - शिपिंगचे विविध पत्ते जतन करा
जर तुम्ही आमची वेबसाईट गेस्ट म्हणून पाहात असाल तर तुम्ही ऑर्डर केलेल्या वस्तूंचे सगळे अपडेट तुम्हाला इमेलच्या माध्यमातून मिळतील. जर तुम्हाला इमेल येत नसेल तर तुम��ही वेबसाईटमधूनही माहिती मिळवू शकता
तुमची वेबसाईट सुरक्षित आहे का?
हो अर्थात आम्ही वेबसाईट अगदी सुरक्षित आहे. आम्ही तुम्हाला जेव्हा तुमचा पत्ता, फोन नंबर किंवा क्रेडिट कार्ड या संदर्भातील माहिती विचारतो त्यावेळी आम्ही सिक्युअर सॉकेट लेअर(ssl)वापरतो. त्यामुळे तुमच्या आमच्यातील प्रत्येक संवाद सुरक्षित राहतो
शिपिंग आणि रिटर्न्स
तुम्ही माझी ऑर्डर कधी शिप कराल?
साधारण दोन दिवसांनी आम्ही ऑर्डर शिप करतो. त्यानंतर तुम्ही मागवलेली वस्तू डिलीव्हरी होण्यासाठी तुमच्या पत्त्यानुसार वेळ घेतला जातो
माझी ऑर्डर कधी डिलीव्हर होईल?
तुमच्या लोकेशननुसार वस्तू ट्रान्झिट व्हायला आणि तुमच्यापर्यंत पोहोचायला लागणारा वेळ वेगळा असू शकतो. तुम्ही तुमची मागवलेली वस्तू घरबसल्या ट्रॅक करु शकता. वेबसाईटवर जाऊन तुम्ही त्याची माहिती मिळवू शकता.tracklite.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही तुमचा ट्रॅकिंग id टाकून तुमच्या वस्तू ट्रॅक करु शकता.
तुम्ही वस्तूंवर अतिरिक्त शुल्क लावता का?
आम्ही सगळ्या वस्तूंची डिलीव्हरी फ्री करतो. पण त्यासाठी तुम्ही दिलेली ऑर्डरची शुल्क 350 रुपये असायला हवी. cod वस्तूंवर अगदी क्षुल्लक चार्जेस घेतले जातात.
माझी ऑर्डर कुठपर्यंत आली हे कसं पाहू?
तुम्ही ऑर्डर प्लेस केल्यानंतर तुम्हाला एक मेल येईल. त्यामध्ये तुम्हाला तुमच्या ऑर्डरचा ट्रॅकिग नंबर आणि अन्य माहिती दिलेली असेल .त्यावर क्विक करुन तुम्ही तुमची ऑर्डर कुठपर्यंत आली ते पाहू शकता. या शिवाय 'track your order' मध्ये जाऊन तुम्ही तुमचा ऑर्डर नंबर टाकू शकता.शिवाय tracklite.in वर जाऊन तुमचा ट्रॅकींग id टाकू शकता.
एकाचवेळी जास्त प्रोडक्टची खरेदी केली तर तुम्ही सूट देता का?
हो, तुम्हाला योग्य दरात वस्तू मिळण्याचाच आमचा अट्टहास आहे. तुम्ही आम्हाला care@popxo.com वर कॉर्पोरेट डिस्काऊंट आणि होलसेल सूटसाठी विचारणा करु शकता.
मी डॅमेज प्रोडक्ट रिसीव्ह केले आहे काय करु?
आम्ही तुम्हाला सगळ्याच प्रोडक्टवर रिप्लेसमेट गॅरंटी देतो. जर तुम्हाला तुम्ही घेतलेल्या प्रोडक्टचे रिप्लेसमेंट हवे असेल तर तुम्ही care@popxo.com वर मेल करु शकता आणि आम्ही अन्य कोणतेही चार्जेस न घेता तुम्हाला तुमचे प्रोडक्ट रिप्लेस करु. लक्षात असू द्या रिप्लेसमेट हे त्यावेळीच लागू होईल ज्यावेळी तुम्हाला मिळालेली वस्तू डॅमेज किंवा वेबसाईटवर दाखवली त्याप्रमाणे नसेल तर ती रिप्लेस होईल. जर तुम्हाला त्या वस्तूंची रिप्लेसमेंट नको असेल तर त्या वस्तूचे पैसे तुम्हाला रिफंड करण्यात येतील
तुम्ही माझी ऑर्डर रद्द करु शकता का?
जर तुम्हाला तुमची ऑर्डर रद्द करण्याची इच्छा असेल तर तुम्ही care@popxo.com वर मेल करा किंवा तुम्ही आम्हाला +91-9821519342 या क्रमांकावर संपर्क साधू शकता. जर तुमची ऑर्डर शिप झाली नसेल तर ती रद्द करता येऊ शकते.
तुमची शिपिंग पॉलिसी काय आहे?
350 रुपयांच्या खरेदीवर popxo.com फ्रि शिपिंग देते. ग्राहकांना त्यांनी ऑर्डर केलेल्या वस्तू 4 ते 6 दिवसांमध्ये मिळू शकतात. आम्ही 13हजारहून अधिक पिनकोड्स असलेल्या ठिकाणी आम्ही तुम्हाला वस्तू पुरवतो. जिथे आम्ही नाही तिथे लवकरच आम्ही येऊ. जर तुम्हाला तुमच्या वस्तूच्या डिलीव्हरी संदर्भात काही प्रश्न असतील तर तुम्ही care@popxo.com वर आमच्याशी संपर्क साधू शकता
तुमची रिर्टन पॉलिसी काय आहे?
तुम्ही विकत घेतलेली उत्पादने ऑर्डर केलेल्या तारखेपासून 14 दिवसांच्या आत, मूळ स्वरूपात आणि वापरलेली नसल्यास परत घेतली जातील. उत्पादने परत पाठवण्यासाठी तुम्ही care@popxo.com या मेल आयडीवर आम्हाला ईमेल करू शकता. लक्षात ठेवा उत्पादने स्वीकाराताना जर ती खराब झालेली असतील अथवा वेबसाईटवर दिसत आहेत तशा स्वरूपात नसतील तरच परत घेतली जातील. सूचनाः सौंदर्य उत्पादने परत घेतली जाणार नाहीत.
तुमची रिफंड पॉलिसी काय आहे?
तुम्ही परत केलेली वस्तू आमच्याकडे आल्यानंतर त्याची गुणवत्ता तपासली जाते. त्यानंतर आम्ही रिफंडची प्रक्रिया सुरु करतो. तुम्ही ज्या अकाऊंटमधून या वस्तूंसाठी पेमेंट केलेले आहे.(क्रेडिट कार्ड,डेबिट कार्ड आणि नेट बँकिग). त्या अकाऊंटमध्ये तुमचे पैसे परत केले जातात. जर तुम्ही cod केले असेल तर आम्ही तुम्हाला तुमच्या बँक डिटेल्स विचारु. तुम्ही रिफंड करत असलेल्या वस्तूवर तुम्हाला शिंपिंग (50 rs.) लागेल तर cod साठी (50rs.) (जर त्या वस्तूवर असेल तर) पण रिप्लेसमेंटच्या बाबतीत लागू होणार नाही.
तुम्ही परदेशात वस्तूंची डिलीव्हरी करता का?
नाही, सध्याच्या घडीला आम्ही फक्त भारतातच आहोत. पण पुढील काळात आम्ही इतर देशांमध्येही नक्की डिलिव्हरी कर
मी हे ब्युटी प्रॉडक्ट्स परत/एक्स्चेंज करू शकते का?
सर्व ब्युटी प्रॉडक्ट्स हे अंतिम विक्री म्हणून गृहीत धरण्यात आलेले आहेत त्यामुळे हे तुम्ही परत देण्याची अर्थात एक्स्चेंज करण्याची सुविधा उपलब्ध नाही.
ओपन ब्युटी प्रॉडक्ट्स एक्स्चेंज करण्यामध्ये काय समस्या आहे?
आमच्यासाठी सर्व ग्राहकांची सुरक्षा आणि स्वच्छ उत्पादनं ही सर्वात पहिली जबाबदारी आहे. त्यामुळे आम्ही एकदा विकण्यात आलेले उत्पादन जर ओपन झाले तर पुन्हा एक्स्चेंज करत नाही.
मला माझी ऑर्डर रद्द करायची, शोधायची अथवा त्यामध्ये अधिक अॅड करायचं असल्यास मला काय करावं लागेल?
आम्ही तुमच्याद्वारे करण्यात आलेल्या संशोधनाच्या बदलानुसार तुम्हाला तुमचं उत्पादन देण्याचा पूर्ण प्रयत्न करू. तुम्ही एखाद्या गोष्टीची शिफारस केल्यानंतर त्वरीत त्यामध्ये योग्य तो बदल करून वेळेत देण्याचा आमचा नेहमी प्रयत्न असतो. पण तरीही तुम्ही सांगितलेल्या बदलानुसारच आम्ही बदल करू शकतो या गोष्टीची आम्ही हमी देत नाही.
मी हे ब्युटी प्रॉडक्ट्स परत/एक्स्चेंज करू शकते का?
सर्व ब्युटी प्रॉडक्ट्स हे अंतिम विक्री म्हणून गृहीत धरण्यात आलेले आहेत त्यामुळे हे तुम्ही परत देण्याची अर्थात एक्स्चेंज करण्याची सुविधा उपलब्ध नाही.
ओपन ब्युटी प्रॉडक्ट्स एक्स्चेंज करण्यामध्ये काय समस्या आहे?
आमच्यासाठी सर्व ग्राहकांची सुरक्षा आणि स्वच्छ उत्पादनं ही सर्वात पहिली जबाबदारी आहे. त्यामुळे आम्ही एकदा विकण्यात आलेले उत्पादन जर ओपन झाले तर पुन्हा एक्स्चेंज करत नाही.
मला माझी ऑर्डर रद्द करायची, शोधायची अथवा त्यामध्ये अधिक अॅड करायचं असल्यास मला काय करावं लागेल?
आम्ही तुमच्याद्वारे करण्यात आलेल्या संशोधनाच्या बदलानुसार तुम्हाला तुमचं उत्पादन देण्याचा पूर्ण प्रयत्न करू. तुम्ही एखाद्या गोष्टीची शिफारस केल्यानंतर त्वरीत त्यामध्ये योग्य तो बदल करून वेळेत देण्याचा आमचा नेहमी प्रयत्न असतो. पण तरीही तुम्ही सांगितलेल्या बदलानुसारच आम्ही बदल करू शकतो या गोष्टीची आम्ही हमी देत नाही.