कोणत्याही कार्यक्रमांना आजही आपल्याकडे पारंपरिक कपड्यांना महत्त्व आहे. त्यातही साडी आणि शरारा अशा कपड्यांना तर आजही मागणी आहे. विशेषतः साडी. कोणत्या साड्या कोणत्या कार्यक्रमांना परिधान करायच्या. त्याची कशी स्टाईल करायची. त्यावर कोणते दागिने अधिक उठून दिसतील. तसंच त्या साड्यांची आणि कपड्यांची कशी काळजी घ्यायची या सगळ्याची इत्यंभूत माहिती तुम्हाला या विभागात मिळेल. लग्नातील साड्यांपासून बनवला जाणारा लेहंगा अथवा लग्नातील लेहंग्याचा पुढे कसा वापर करायचा या सगळ्याची माहिती तुम्हाला इथेच मिळेल.
मराठमोळी नवरी नऊवारीशिवाय सुंदर दिसूच शकत नाही. महाराष्ट्रीयन कोणताही सण म्हटला अथवा महाराष्ट्रीयन लग्न म्हटलं की सर्वात पहिलं समोर चित्र उभं राहतं ते नऊवारी साडीचं. नऊवारी साडी ही महाराष्ट्रातील साड्यांची शान आहे असं म्हटलं तर नक्कीच वावगं ठरणार नाही. कोणताही सण असला की, विशेषतः मराठी नवं वर्ष गुढीपाडवा की, सर्वच मुली अगदी लहान मुलींपासून ते मोठ्या महिलांपर्यंत नऊवारी साड्यांमध्ये सजूनधजून बाहेर पडलेल्या दिसतात. अगदी सण असो वा लग्न महाराष्ट्राच्या परंपरेत नऊवारी साडीला खूपच महत्त्व आहे. अर्थात या नऊवारी साड्या नेसण्याचेही अनेक प्रकार आहेत. हे नक्की प्रकार कोणते याची तुम्हाला माहिती आहे का? नऊवारी साडी कशी नेसतात हे माहीत आहे का? नऊवारी साडीचे प्रकार आणि कशा पद्धतीने या साड्या नेसल्या जातात, नऊवारी साडी नेसून कसे वावरायचे याची माहिती तुम्हाला या लेखाद्वारे आम्ही सांगणार आहोत. अगदी काष्टा साडी, ब्राह्मणी साडी कोणती नऊवारी साडी तुम्हाला नेसायची आहे आणि नऊवारी साडी किंमत काय, नऊवारी साडी प्रकार काय आहे इथपासून आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.
पदरावरती जरतारीचा नाचरा मोर सगळ्यांनाच आवडतो. तुम्हाला कळलं असेलच की, आम्ही कशाबद्दल सांगत आहोत. समस्त महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या पैठणीबाबत. आपल्या प्रत्येकीच्या वॉर्डरोबमध्ये एक तरी पैठणी नक्कीच असते. लग्नसराई असो वा एखादं फॅमिली फंक्शन असो पैठणीला पर्याय नाही. कारण पैठणीची सर इतर कोणत्याही साडीच्या प्रकाराला नाही. हे तुम्ही नक्कीच मान्य कराल. त्यामुळे आपल्या प्रत्येकीकडे एकतरी पैठणी असतेच. आजकाल बऱ्याचश्या ब्राईड्सही लग्नविधी किंवा अगदी रिसेप्शनलाही पारंपारिक किंवा डिझायनर पैठणीला पसंती देत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे पैठणीविषयीदेखील सर्व माहिती तुम्ही इथे मिळवू शकता.
कोणत्याही सणासमारंभाला साडी नेसायचं म्हटलं की घामाने भिजून कपडे खराब होण्याची भीती असते. त्यातही आपल्याला ब्लाऊज आणि साडी हे दोन्ही सांभाळताना नक्कीच दमछाक होत असते. पण तरीही आपल्याला साडी आणि ब्लाऊज हे कॉम्बिनेशन करायचं असेल आपण ब्लाऊजच्या वेगवेगळ्या स्टाईल्स नक्कीच करू शकतो. या गरमीच्या दिवसात स्टाईल आणि ड्रेसिंग सेन्समध्ये खूपच बदल होतो. यावेळी जास्तीत जास्त कूल आणि आरामदायी कपडे घालावे असं सगळ्यांनाच वाटतं. तसंच काहीही असलं तरी आकर्षक दिसणं आणि फॅशन आणि स्टाईल करणं हा प्रत्येक महिलेचा हक्क आहे. त्यामध्ये कुठेही कमीजास्त झालेले कोणालाही आवडत नाही. मग अशावेळी सणासमारंभाला तुम्ही स्टायलिश आणि आकर्षक ब्लाऊज वापरून पाहू शकता. साडी म्हटलं की सर्वात पहिले यावर कोणता आकर्षक आणि वेगळ्या स्टाईलचा ब्लाऊज घालायचा याचा विचार सुरू होतो. तो स्टायलिश,आकर्षक आणि तितकाच आरामदायीदेखील असायला हवा याची इत्यंभूत माहिती तुम्हाला मिळेल इथून.
नऊवारी साडी ही महाराष्ट्रातील साड्यांची शान आहे असं म्हटलं तर नक्कीच वावगं ठरणार नाही. कोणताही सण असला की, विशेषतः मराठी नवं वर्ष गुढीपाडवा की, सर्वच मुली अगदी लहान मुलींपासून ते मोठ्या महिलांपर्यंत नऊवारी साड्यांमध्ये सजूनधजून बाहेर पडलेल्या दिसतात. अगदी सण असो वा लग्न महाराष्ट्राच्या परंपरेत नऊवारी साडीला खूपच महत्त्व आहे. अर्थात या नऊवारी साड्या नेसण्याचेही अनेक प्रकार आहेत. हे नक्की प्रकार कोणते याची तुम्हाला माहिती आहे का? नऊवारी साडी कशी नेसतात हे माहीत आहे का? हल्ली ही साडी नेसवण्याची पद्धत फारच कमी जणांना माहीत असते. तर काही जण नऊवारी साड्या शिऊनही घेतात. पण खरी मजा आहे ते नेसण्यातच. नऊवारी साडीचे प्रकार आणि कशा पद्धतीने या साड्या नेसल्या जातात, नऊवारी साडी नेसून कसे वावरायचे याची माहिती तुम्हाला आमच्या या विभागामधून नक्कीच मिळेल.
लग्नामध्ये नक्की कोणती साडी नेसायची असा प्रश्न नेहमीच पडतो. ब्रायडल आऊटफिट म्हटलं की पैठणी, कांजिवरम या साड्या ठरलेल्या असतात. पण तुम्हाला काही वेगळं हवं असेल तर तुमच्यासाठी पारंपरिक भारतीय साडी म्हणून बनारसी साडी हा उत्तम पर्याय आहे. कधीही भारतीय साडी म्हटली की बनारसी साडी नक्कीच डोळ्यासमोर येते. अगदी पूर्वीपासून लग्नात बनारसी शालू नेसले जायचे. पण बनारसी शालू जड असल्यामुळे नंतर कालांतराने डिझाईनर साड्यांची मागणी वाढली. पण तुम्हाला पारंपरिक साडीमध्ये ब्रायडल लुक हवा असेल तर बनारसी हा अप्रतिम पर्याय तुमच्यासमोर नक्कीच आहे. लग्न, इतर कोणतं पारंपरिक कार्य घरात असेल अथवा कोणत्याही खास आणि शुभ दिवशी बनारसी साडी नेसणं महिलांना नक्कीच आवडतं.
फॅशनच्या जगामध्ये नेहमीच वेगवेगळे प्रयोग होत असतात, बदल होत असतात पण काही गोष्टी कधीच बदलत नाहीत. फॅशनमध्ये साडी ही सर्वांचीच आवडती आहे. साडी नेसण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. साडी नेसण्याच्या पद्धती आणि फॅशन कितीही वेगळ्या केल्या तरीही कांजिवरम आणि बनारसी साडीचं वेड हे कधीच कमी होणार नाही. प्रत्येक स्त्री ला आपल्या वॉर्डरोबमध्ये कांजिवरम आणि बनारसी साड्या हव्याच असतात. पण बऱ्याचदा खऱ्या आणि खोट्या कांजिवरम आणि बनारसी या साड्यांमधील फरक कळत नाही. असे फरकही तुम्हाला आमच्या साईटवरून जाणून घ्यायला मिळतील.